२००९ मध्ये सिमल्याहून देवळालीत होम पोस्टिंगवर आल्यानंतर हे युनिट मधेच रूममध्ये रहायला लागले. ७ _ ८ दिवसांनी घरी येत होते, अधून मधून पण येण_ जाण चालूच असायचं. आम्ही पण कधी तिकडे रहायला जायचो,टिमीची खातर करण्या साठी तिकडे भैया पार्टी होतीच! तिथले जवान पण खूप लाड करायचे टिमीचे.(त्यात मी काय नवल सांगितलं म्हणा!) इथे त्याचा नवीन जानी दोस्त झाला सचिन भैया! फार आवडायचा टिमीला तो भैया! तो असला की हा अगदी खूष असायचा.
 |
| युनिच्या गार्डनमध्ये मस्त खेळायला मिळत! |
इथलं पण tenure ३१ जानेवारीला संपुष्टात आलं, आणि २५ वर्षांची नोकरी करून हे निवृत्त झाले. आणखीन एक महत्वाचं पर्व संपलं.!
 |
| युनिटचा मेमेंटो स्वीकारतांना! |
 |
| वन लास्ट टाईम_he is a jolly good fellow! so say all of us! |
आणि दुसऱ्या नवीन पर्वाला सुरुवात झाली! पोस्ट रिटायरमेंट चे नवीन प्लान आखावे लागणार होते. घरी आल्यावर टिमीनी मात्र नेहमी प्रमाणेच स्वागत केलं! भुंकतो , अंगावर उड्या मारतो , हात चाटतो , आणि मग आनंदाने घरभर पळत सुटतो! जणू सगळ्यांना सांगतो मला किती आनंद झाला हे!
 |
| सगळ्यात पाहिलं मीच भेटणार ! |
२०११ मध्ये पुन्हा जिल्हा सैनिक अधिकारी म्हणून नोकरी केली, त्यानंतर प्रि_कॅडेट ट्रेनिंग सेंटर,नाशिकलाच नोकरी केली,जी अजूनही चालू आहे. दोन्ही कडे आर्मीच्याच लोकांचे काम असल्यामुळे तिथे मन रमले. मध्यंतरी जेंव्हा घरी आराम करत होते तेंव्हा पण काही ना काही उद्योग चालूच होते. एक वर्षी पंढरपूरच्या वारीला पूर्ण चालत गेले. नंतर वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दर्शन करून आले, अनेक लांब पल्ल्याच्या ट्रीप केल्या. त्यांच्या सोबत आमच्या कोलोनीचे लोक असायचे. त्यांच्या बरोबर फिरायला जाणे वगैरे उद्योग चालू असतातच. सो, he is a happy man!
No comments:
Post a Comment