सांबा मध्ये भानूची ११ वी आणि १२ वी ची महत्वाची वर्ष फार पट्कन, ;खूप मेहनत करण्यात, अभ्यास करण्यात, आणि तेवढीच मजा करण्यात गेली!एक तर शाळा फारच छोटी होती. म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त नव्हती. मिसेस राव प्रिन्सिपल होत्या, खूप चांगल्या, कडक शिस्तीच्या, आणि शाळेवर एकदम कंट्रोल.
 |
| मध्ये आहेत त्या मिसेस राव, शेजारी भानुला बक्षीस देतांना प्रमुख पाहुण्या |
आणि दुसरं म्हणजे शाळा घरापासून फार लांब नव्हती, आणि स्कूल बस असल्यामुळे ते ही टेन्शन नाही. ह्या शाळेत भानुला सांस्कृतिक कार्यक्रम खूप करायला मिळाले. शाळेतल्या काही हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होती. म्हणजे अभ्यास आणि कार्यक्रम सर्वातच तिचा सहभाग असायचा . तशी ती बंगलोरच्या आर्मी स्कूल मध्ये vice captain होती. इथे ह्या शाळेत ती १२वीत होती तेंव्हा 'Miss Army school' म्हणून निवडली गेली होती! पथनाट्य, रांगोळी, नाटक, पाककला, अशा नानाविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, आणि बक्षीस पण जिकली आहेत. तिला मी एक शिकवलं होत, आपल काम चोख करायचं, आपल्याला जे येत, ते पूर्णपणे करायचं, आणि बाकीच सोडून द्यायचं. हरलं की जिंकलं, ह्यावर अजिबात विचार करायचा नाही .
 |
| बक्षीस काय आपल्याला नवीन आहेत का? नाही! |
मी नेहमी एक गोष्ट म्हणते, आणि त्यावर विश्वास पण ठेवते की, Its not about the destination, its about the journey! Enjoy the journey, and the destination will become worthy of the journey made!
 |
| दुल्हनही दहेज है _ पथनाट्य |
 |
| डोगरी नृत्य |
| |  |
| | | ह्या नाटकात भानू झाली आहे सासू ! |
अभ्यास भरपूर होता, तरी इथे ग्रुप छोटा असल्यामुळे सगळे भेटत होते, आणि मजा पण खूप करायला मिळत होती. work hard and party harder! आता इथून पुढे तिला हा मंत्रच उपयोगी पडणार होता ना?मोठी झाली! तिच्या law आणि CS चा अभ्यास पूर्ण होईपर्यंत, म्हणजे अक्षरशः कालपरवा पर्यंत, इतकी वर्ष तिला ह्याच तत्वावर राहिलेलं बघितलं आहे, त्यामुळेच ह्या सुंदर, फुलपाखरा सारख्या दिवसांच्या रंगीत आणि रम्य आठवणी पण राहिल्या, आणि अभ्यासाचे, मेहनतीचे गोड फळ पण आज चाखायला मिळते आहे!
 |
| teachers समोर अगदी अदबीने बसलोत फोटोसाठी! |
 |
| teachers नाहीत, मग काय? आता धमाल! |
 |
| आता तर teachers चा काही प्रश्नच नाही! नुसतीच धमाल! CS च्या मित्र_मैत्रिणीचा ग्रुप. |
९ वी पासून हे अभ्यासाचे सत्र चालू होते आणि टीचर्स चे मार्गदर्शन, हिची मेहनत, आणि देवाच्या कृपेने १२ वी उत्तम मार्कांनी पास झाली, आणि आणखी एक महत्वाचा टप्पा पार! मला खूप आनंद झाला! आता नवीन पर्वाला सुरुवात होणार होती, college life च्या वेगळ्याच वळणावर येउन ठेपली होती गाडी!
No comments:
Post a Comment