Tuesday, 2 July 2013

BANGLORE DARSHAN

आता बंगलोर मधल्या" commercial  street"  बद्दल सांगायचं तर बंगलोरचा व्यापारी उलाढालीचा हा भाग. शहराच्या मध्यवस्तीत भरपूर दुकानं  आणि सर्व वस्तू मिळण्याचे हे ठिकाण. सर्व प्रकारच्या वस्तू मिळणार. इथे शोप्पिंग ची खरी मजा येते, आणि शोप्पिंग किंवा विंडो शोप्पिंग झाल्या नंतर पेटपूजा करण्याची पण अनेक , ठिकाणे आहेत, जिथे साउथ  इंडिअन  खाद्य पदार्थ मिळतात . इडली, डोसा, वडा _सांभर, सेट डोसा, केसरीभात, पोंगल राइस, इमली राइस, बिसिबेलेभात, असे अनेक पदार्थ जिभेचे  पुरवायला सज्ज असतात. उभे राहून खाण्या साठी गोल टेबल असतात,  अगदी नम्रपणे  सेवा पुरवणारा स्टाफ, सगळ  अगदी नेटक, आवाज, गोंगाट बिलकुल नाही. शिवाय, सांबार, चटणी मुक्तपणे पुन्हा पुन्हा मागितले तरी हसतमुखाने देतात!(नाही तर आपल्या कडे म्हणजे वाटी सांबार_चटणीची आहे का नैवेद्याची तेच कळत  नाही!) आणि हो, ह्या सांबार  चटणीचे  वेगळे पैसे लावत नाहीत बर का!



 लखनौला अदबशीर भाषा असते तर  इकडे दक्षिणेत आदराने आणि नम्रपणे बोलताना आढळतात. महिलांना " अम्मा" आणि पुरुषांना "ऐया" म्हणतात, आणि ह्याला कुणी अपवाद नाहीत, म्हणजे सगळीच लोक एकमेकाला अशी संबोधतात. स्त्रियांना विशेष आदर दिला जातो.   स्त्रियांसाठी बस मध्ये एक बाजू "राखीव" असते आणि विशेष म्हणजे पुरुष तिथे बसत नाहीत म्हणजे बसत नाहीत, कंडकटर  ओरडतो. आणि समजा बसलेच, तरी महिला बसमध्ये चढल्या की लगेच उठतात! नाहीतर आपल्याकडे म्हणजे "राखीव "पाटी खालच्याच सीटवर पुरुष बसलेले असतात आणि उठवल तर उठणार तर नाहीतच, पण वर अरेरावी करतील, किंवा तोंड दुसरीकडे फिरवून निर्लज्ज सारखे बसून राहतील!
बंगलोरचे हाय कोर्ट 


विधान सौधा  म्हणजे विधान  भवन 




लाल बाग _botanical  garden 
















मी ३ वर्ष बंगलोरला होते. बसनी भरपूर प्रवास केला, रिक्षानी प्रवास केला, तिथे कॅब सर्विस चांगली आहे, कॅबनी पण प्रवास केला आहे,पण अरेरावी, शिवीगाळ, असभ्य वर्तन कुठे आढळले नाही. ट्रेफिक जॅम असला तरी! आणि  यंत्रणा अतिशय चांगली आहे म्हणून कदाचित ही शिस्त पाळत असतील. पण हे गुण   स्वभावतःच असतीलच असे वाटते. 


मंदिरांमध्ये देखील महिलान साठी वेगळी रांग असते. मला आठवतंय, माझ्या हाताला fracture  झालं  होत,आणि प्लास्टर घातल होत. स्लिंग होती गळ्यात. तेंव्हा एका सुप्रसिद्ध मंदिरात जायचा योग आला. आम्ही ज्यांच्या बरोबर गेलो होतो, त्यांनी तिथल्या पोलिसांना हे सांगितल, आणि वेगळ  जाऊ द्यायची विनंती केली.आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब  एका बाजूने आत सोडले!  आणि विशेष म्हणजे, त्या लांबच लांब रांगेतले कुणीच काहीच बोलले नाही! हेच आपल्या कडे झाले असते तर,"आम्ही सकाळ पासून रांगेत उभे आहोत ते कशा साठी?"   , किंवा "अरे, असतील कुणी तरी त्यांचे!" वगैरे ऐकू आले असते.(हे आपल्याकडे    पण सगळ स्वभावतःच असेल, नाही?) 


उल्सूर  लेक, विधान सौधा नंदी हिल्स, botanical  garden, टिपू सुलतान पलेस, अशी अनेक प्रेक्षणीय  ठिकाण आहेत ती पाहिली. कॅब सर्विस मुले सहज शक्य होत. 
अनेक बागांपैकी एका बागेतले दृश्य!

टिपू सुलतानची हवेली 






























बंगलोरला खरेदी फारशी नाही केली पण मजा भरपूर केली. आजच्या नवीन पिढीच्या आवडीच्या अनेक गोष्टींचा  इथे परिचय झाला. हाय_एंड लाईफ स्टाईल काय असते हे जवळून पहायला मिळालं, कारण ह्या ultra modern  life style चे नुकतेच भारतात पडसाद उमटायला लागले होते, आणि ह्याचा सर्व प्रथम  स्वीकार करणाऱ्या महानगरांमध्ये  बंगलोर हे एक होते.
अत्याधुनिक जीवनशैलीचे विस्मयकारक उदाहरण!




मैसूर, उटी पण बघितल. मैसूरचा वाडियार पालेस दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा पहिला,  टिपू सुलतानची हवेली बघितली. उटीला भरपूर भटकंती केली.  थंडगार हवा, चटकदार गरमागरम चहा, मस्त' काप्पी', आणि उडुपी खानपान ह्या सर्वांचा मुक्त आस्वाद घेतला.
रात्रीचा  झगमगता वोडीयार  महाल, मैसूर  
  
उटी मध्ये बोटिंगची मजा!
              

No comments:

Post a Comment