काल सुरणाचे कबाब केले होते, yummy! नॉन व्हेज कबाबला टक्कर आहेत हे कबाब. सोया चंक्सचे कबाब पण असेच बनतात, एकदम मटन कबाब वाटतात.
सुरण कबाबची रेसिपी शेअर करते आहे. जरूर करून बघा.
साहित्य: १ वाटी शिजवलेले सुरण, १/२ वाटी बेसन, मीठ, २ टीस्पून तिखट,किंवा हिरवी मिरची ठेचा, ३ टीस्पून कोथिंबीर चिरलेली, थोडं आलंलसूण पेस्ट हवी असेल तर घालावी.
कृती: सर्व साहित्य एकत्र करून नीट मळून घ्यावे. त्याचे कबाब करून डीफ्राय करावेत. हिरवी कोथिंबीर_पुदिना चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करावे.(लागले तर बेसन घालावे.)
आपण जेंव्हा ,स्वयंपाक करतो,तेंव्हा कधी कधी आपली कसोटीची वेळ येते हा अनुभव बऱ्याच वेळा येतो. दुसर कुणीतरी आपल्याला विचलित करायला बघत, कधी आपल्याला अवास्तव टीका ऐकावी लागते. पण आपण जर थोडसं स्वतःला ट्रेनिंग दिलं, तर आपण आपलं लक्ष विचलित न होऊ देता, आपलं काम चोख करू शकू, आणि ह्याचा फायदा आपल्यालाच होतो!
इथे समर्थ रामदासांची एक गोष्ट सांगावीशी वाटते _ एकदा समर्थांच्या गुडघ्याला फोड किंवा गळू झाल. तर सगळे शिष्य आले आणि म्हणाले आम्ही तुमची सेवा काय करू? तर समर्थ म्हणाले,"हे गळू जे आहे, ते जर कुणी तोंडाने चोखले, तर ते गळू लगेच बर होईल. कोण करतय?" सगळे शिष्य एकमेकां कडे पाहू लागले. त्यांचा पट्ट शिष्य उभा राहिला आणि म्हणाला मी करेन हे काम. आणि त्याने गळू चोखायला केली. आणि काही वेळातच तो अगदी खूष होऊन ते गळू चोखायला लागला! बाकीच्यांना काही कळेना, हा असा खूष का झालाय ते. काही वेळाने त्याने इतर मित्रांना सांगितलं, "अरे,ते गळू नव्हतच मुळी! आंबा होता तो! किती रुचकर होता! म्हणून मी खूष होतो!"
हे होते कल्याणस्वामी ,समर्थांचे पट्ट शिष्य! अशी असते श्रद्धा! अढळ, अविचलित श्रद्धा! अशीच श्रद्धा आपली आपल्या कामावर हवी,! मग आपण प्रत्येक कसोटीवर खरे उतरतो!
काल चतुर्थीचा उपवास होता, वरई (भगर) केली होती ती थोडी उरली, म्हणून मग त्यात अंदाजाने उकडलेले बटाटे, थोडी उपवासाची भाजण, मीठ,मिरची, कोथिंबीर, घालून थालीपीठ लावली, आणि काय बघता बघता संपली की!
भगरी पेक्षाही ही थालीपीठ जास्त रुचकर लागली ! कधी कधी उरलेल्या पदार्थातून केलेला नवीन पदार्थ हा आधीच्या पदार्था पेक्षा जास्त रुचकर होतो, असा माझा अनुभव आहे.
मी शिळे अन्न शक्यतो त्याच स्वरूपात पुन्हा वाढायचं टाळतेच. त्याच रुपांतर करून नवीन पदार्थ पानात वाढला म्हणजे,खाणारा खुश, कुणाला कळतही नाही आणि खायला वेगळा पदार्थ पण तयार होतो! मला शिळ अन्न दिसलं की टेन्शन येत आणि मग नवीन पदार्थ लगेच सुचतो!
पण शक्यतो अन्न उरू नये ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या साठी जेवणाचा म्हणजे, जेवणारी मंडळी किती आणि काय काय जेवतील, ह्याचा अंदाज येण फार गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर १ वाटी साबुदाणा भिजवला तर २ ते२ १/२वाट्या खिचडी होते, किंवा १ वाटी तूरडाळ शिजवली तर ५ ते ६ वाट्या आमटी तयार होते.
happy cooking!
![]() |
| सुरणाचे कबाब ! |

| समर्थ रामदास स्वामी |

No comments:
Post a Comment