Sunday, 7 July 2013

SAMBA SE SIMLA TAK

  सांबाचा मुक्काम हलण्या आधी मी बर्फाचा आनंद घेण्यासाठी 'डलहौसी '(हिमाचल प्रदेश )ला जाऊन आले. एक ऑफिसर फमिली  होते आणि त्यांची३  छोटी  मुल होती. खूप मजा आली. बर्फात खेळले मुलांबरोबर! गोळे केले, आणि  एकमेकांच्या अंगावर फेकले, बर्फाचे घर बनवले, काही विचारू नका, खूप मजा आली! पण हिल स्टेशन मध्ये प्रवेश केला की कर्मकहाणी  सुरु होते ती तिथल्या अव्यवस्थेची! दुर्गंधी, कचरा, उघडी गटारे, अरे देवा, हे   हिल स्टेशन आहे की कचरा डेपो? कठीण आहे! असो, पण डोंगरावर चढून गेल, आणि बर्फ पाहिला  की , सगळ विसरून जायला होत!
बर्फाचा आनंद घेण्यात सगळे दंग!

तर अशा ह्या बिझी आणि इंटरेस्टिंग tenure  नंतर सिमला पोस्टिंग आले. हे त्या युनिटला जॉईन  झाले आणि आम्ही दोघी नाशिकला आमच्या घरी स्थायिक होण्याचा निर्णय घेवून इकडे आलो. इकडे२००७ मध्ये आल्या नंतर  भानुचेB.Com झाले, आणि नंतर  L.L.B आणि C.S चा अभ्यास एकाच वेळी सुरु झाला, ते २०१३ मध्ये आत्ता नुकतीच उत्तीर्ण होऊन हे सत्र पण संपुष्टात आलं ! Finally, अगदी मोठ्ठा पल्ला गाठून झाला आहे!
सगळा CS  चा ग्रुप! आता वेध पुढच्या टप्प्याचे! 
सिमल्याच्या गप्पा, गमती पुढच्या वेळी!     

No comments:

Post a Comment