Wednesday, 3 July 2013

JAMMU CHE POSTING

 २००५ मध्ये भानूची दहावी झाली, आणि आम्ही सांबाला निघायची तयारी सुरु केली.  नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे जवानांच्या फ़मिलिसचानिरोप घेतला,  सर्व ऑफिसर्स कडे लंच, डिनर, ब्रेकफास्ट, अशा सर्व प्रकारच्या जेवणा नंतर त्यांचा आणि मग बंगलोर शहराचा निरोप घेतला.

जवानांच्या families चा निरोप घेण !खूप आठवणी राहतात मागे !



भानू चा बर्थडे!

फेअरवेल पार्टी !
मी कशी दिसते?

माझी बंगलोरची मैत्रीण भावना गद्रे














जुन्या, पारंपारिक चाली रिती सांभाळणारे, त्याबरोबरच आधुनिक आचार_ विचार आत्मसात करून प्रगती करणारे शहर पहिले. जुन्या   पद्धतीचे कॉफी हाऊसेस, लंच होम्स,बाजारपेठा , पारंपारिक  मिठाई,  वस्त्र आणि दागिने ह्यांची रेलचेल असलेले, मॉडर्न वेशभूषे बरोबर सर्व अत्याधुनिक सुख सुविधांचा लाभ घेणारे,   काही ठिकाणी संथ चालणारे तर काही ठिकाणी सुपर फास्ट  गतीने चालणारे शहर पहिले. मंदिर आहेत, तसेच पब्ज,डिस्को पण आहेत. मोठ्या दिग्गज कलाकारांचे शास्त्रीय संगीताच्या मैफिली रंगतात, तिथेच पाश्चात्य संगीताचे जलसे पण भरतात!   दोन्हीला तेवढीच अलोट गर्दी! अशा दोन्ही  संस्कृतींचा मेळ  साधणारे शहर पहिले, मन भरून गेले! आणि आमचा मोर्चा जम्मू जवळील "सांबा " ह्या अगदी छोट्याशा गावाकडे वळला.




आणि हो , बंगलोर मध्ये मला  एक अगदी जीवाभावाची मैत्रीण मिळाली 'भावना' आमची मैत्री आजही तशीच टिकून आहे. जेंव्हा की ती दिल्लीला असते आणि मी नाशिकला. हा बंगलोरमध्ये काढलेला फोटो!









भावनाची दोन्ही मुल अंगद आणि अनुज, सोबत भानुप्रिया.
सांबा  अतिशय संवेदनशील इलाका! इथून ५ किलोमीटर वर बॉर्डर  आहे. इथे लष्कराच्या छोट्या मोठ्या चकमकी नेहमीच  घडत असतात. असे ह्या गावाचे वैशिष्ट्य. लखनौ सारख्या ऐतिहासिक आणि पुष्कळशा पारंपारिक आणि  छोट्या शहरातून बंगलोर सारख्या महानगरात आणि आता सांबा सारख्या छोट्याशा गावात! सगळे विरोधाभास होते. एकाच देशातले हे विविध भाग! वेगळे भाग, वेगळी रूपं, वेगळ्या संकल्पना, वेगळे लोक, वेगळ्या परंपरा, चाली रिती!  खरच खूप गम्मत वाटते!

सांबा  गावाची वस्ती थोडीच आहे. सगळी वर्दळ आहे ती आर्मीचीच. गाव छोटसच, आणि भोवती आर्मीचीच युनिट्स,  क्वार्टर्स, ऑफिसेस वगैरे. मध्य वस्तीत सांबा  गाव. national  highway च्या दोन्ही बाजूला हे गाव वसलेलं  आहे. आणि १/ २  किलोमीटर मधोमध रस्ता आणि बाजारपेठ दोन्हीही ! छोटसं  रेल्वे स्टेशन, जिथे जा_ये बहुतेक आर्मीच्याच लोकांची. गाड्या पुढे जम्मूला  terminate  होतात, त्यामुळे फारशी गर्दीही नाही.

हा सर्व पहाडी इलाका. इथली माणस  डोगरी  भाषा बोलणारी, संथ आणि laid  back वृत्तीची. जो काही व्यापार होता, तो मुख्यत्वे  आर्मीच्याच  जोरावर चाललेला दिसतो.तरी लोक मनमिळाऊ, प्रेमळ आणि तरी व्यवहारचतुर.!बाजारात बेतास बात क्वालिटीच्या वस्तू, पण आवश्यक सामान मिळणार एवढेच. पण इथे गरम कपडे, शाली छान मिळायच्या. सुती, रेशमी कापड अतिशय स्वस्त आणि चांगल्या प्रतीचं. आणि त्याच प्रतिबिंब इथल्या महिला वर्गाच्या पेहरावावर पडतच! फार fashion  नाही पण छानशौकी करणाऱ्या   महिला आणि मुली दिसतात. पंजाबी ड्रेस   जास्त वापरला जातो, आणि  नखशिखांत matching  आहेच! साड्या मात्र फारशा नाहीत.

इथली माणस परंपरा प्रिय, साधी, पण गावावर आधुनिकतेचा  असर दिसायला लागला होता.  युवा वर्गावर हा परिणाम कॉम्पुटर क्लासेसची वाढती संख्या, स्पर्धा  परीक्षासाठी  बसणाऱ्या  मुलांची वाढती संख्या ह्यातून दिसत होता. आणि हो, मोबाईल फोन ! ह्या  मोबाईलचा असर पडायला सुरुवात झाली होती. आम्ही पण आमचा पहिला मोबाईल फोन इथेच विकत घेतला! (जम्मूला जावून बर का!)

आम्ही आपले आमच्या नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे इथेही रमलो. २ वर्ष मजेत गेली. पण इथे एक झालं   की आमच्या मुक्त हिंडण्या फिरण्यावर थोडा अंकुश बसला होता. ह्याचं  कारण,  इथे सरकारी गाडी शिवाय कुठे ही जाण्यास मज्जाव होता. (मी म्हटलं  होत ना की संवेदनशील इलाका आहे म्हणून !)त्यामुळे सरकारी गाडीतून जायचं आणि सोबतबंदूकधारी   जवान असायचा, जो को_ ड्रायव्हर पण असायचा. तो सगळीकडे सोबत येणार. सुरुवातीला  थोडं  प्रशस्त नाही वाटलं , पण मग सवय करून घेतली. एवढ्या तणावात देखील मी एकदा रिक्षानी घरी आले  होते! म्हणजे बघा! ते मला स्वस्थच बसता येत नाही ना! जम्मू, पठाणकोट असे जावून खरेदी   केली आहे, आणि सरकारी गाडीची तैनात पण अनुभवली!   कुक होता, छान  जेवण बनवायचा, बाकी सर्व कामाला जवान तैनात होते! जवळ जवळ रोज पार्टी, कार्यक्रम असायचेच. ऑफिसर्स चा ग्रुप छोटा होता त्यामुळे मजा पण खूप केली.  आमचा  चार जणींचा ग्रुप होता, आम्ही फार धमाल केली, चहा पार्टी,जेवण, शोप्पिंग सर्व काही! आणि  त्या ग्रुपमधून मी पहिली पोस्ट आउट झाले, तेंव्हा  आम्ही चौघींनी एकाच प्रकारची क्रोकरी' मेमेंटो' म्हणून खरेदी केली होती!

इथे थंडीत  आणि उन्हाळ्यात हालत खराब व्हायची, लखनौची सवय झाली होती म्हणून ठीक निभावलं! थंडीत सकाळचे आठ आणि रात्रीचे आठ हे फक्त घड्याळ बघतो म्हणून समजते, नाहीतर बाहेर ढगाळ आणि  काळोखी दाटलेली दिवसभर. झोपायला जाड रझाई,blankets लागतातच, तसेच रूम हीटर पण आवश्यक होते. पण तरी कधी कधी ऊन पडलं  की बाहेर गार्डन मध्ये बसून जेवायची मजा काही औरच! आणि रात्री शेकोटी करून बसायचं, आणि 'अंगीठी'  घेवून बेडरूम मध्ये,  drawing room मध्ये बसायचं.!



पण उन्हाळा असो किंवा थंडी असो, कार्यक्रम चालूच असायचे.पण, आर्मी मध्ये एक छान असत, कार्यक्रम कोणताही असो,खानपानाची व्यवस्था उत्तम असते! कोणाच्या घरी असो, कुठे ऑफिस मध्ये असो, ऑफिसर्स मेसमध्ये असो, चहा, snacks, ब्रन्च, लंच, कॉकटेल, डिनर,कुठल्या ना कुठल्या रुपात खाण्याची चंगळ  असते., एवढं  नक्की! तर आता खाण्याचा मुद्दा निघालाच आहे तर सांबा मधली एक खास डिश  'भल्ला चटनी'

भल्ला चटनी: १ वाटी उडद डाळ  रात्री भिजत घालून, सकाळी वाटून घ्यावी. ५ ते ६ तास अंबू  द्यावी. नंतर मीठ घालून निट  फेसून, छोटे वाडे डीप फ्राय करूनघ्यावेत . मुळा  जाडसर किसून, त्यात मीठ, तिखट, कोथिंबीर घालून कालवून ठेवावे. थोडे पाणी सुटते, ते तसेच ठेवावे. डिश  मध्ये हे गरम भल्ले आणि सोबत मुळ्याची चटणी सर्व्ह करावी.       
                          

No comments:

Post a Comment