जेवण बनवण्याच्या, जेवण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या , मेजवानी प्रसंगी पाळायचे शिष्टाचार वेगवेगळे ,बैठक व्यवस्था वेगळ्या वेगळ्या असतात. जेवणासाठी म्हणून खास वेशभूषा देखील शिष्टाचारात येतात. शिवाय, जेवणा दरम्यानच्या संभाषणाचे देखील शिष्टाचार असतातच. आता हे शिष्टाचार त्या त्या प्रांताच्या भौगोलिक,सामाजिक, राजकीय,नैमित्तिक आणि इतर अनेक वेगवेगळ्या निकषांवर बेतलेले असतात. कालांतराने त्यामध्ये बदल देखील होत असतात.
आपल्याकडे पूर्वी चुलीवर लाकूड किंवा कोळसा वापरून स्वयंपाक करण्याची पद्धत होती, आता ती fashion झाली आहे! मातीच्या जमिनीवर बसावे,चुलीवरचे गरम गरम जेवण पत्रावळीत, हातांनी खावे, हे सर्व त्याकाळी घराघरात व्हायचे,
तेच आज fashion म्हणून हॉटेल मध्ये पैसे खर्च करून होते आहे!
आजच्या भाषेत सर्व काही 'ईको फ्रेंडली' होते. सर्व साहित्य bio_degradable होते! म्हणजे थोडक्यात, निसर्गाचे निसर्गाला परत! पर्यावरणाला धोका नाही!
जेवणातील पदार्थ, त्यांची संख्या,त्यांची पाककृती, त्यात वापरल्या जाणारे अन्न घटक, मसाले, हे सर्व काही वेगवेगळे! जेवणाला बसण्याची पद्धत,जेवण करण्याची पद्धत,वेगवेगळी! म्हणजे राजे,महाराजे जेवणार,तर भल्या मोठ्या सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात.
जेवणात विविध पदार्थांची रेलचेल, पंचपक्वान्ने, दुध दुभ्त्याच्या पदार्थांची मेजवानी असे! शिवाय पाना भोवती फुलांची आरास, रांगोळी,बसायला चौरंग, समोर चौरंगावर ताट, समई, सुवासिक उदबत्तीचा सुवास, आणि जेवण वाढायला वाढपी!
ब्राह्मण मंडळी जेवणाला सुरुवात करण्या आधी आणि शेवटून तुपाची आपोष्णी (म्हणजे हात खोलगट करून,त्यात थोडेसे तूप घेऊन ते प्यायचे. ) घ्यायचे. त्यांना बाकी सरंजामाची आवश्यकता नाही.
कष्टकरी लोक बहुतेक वेळा हातावर भाकरी भाजी,चटणी घेऊन खात, आणि त्यांची उकिडवे बसून खायची पद्धत आहे,ह्यावरून त्यांचा सामाजिक दर्जा दिसून येत असे, कारण त्यांच्याकडे अन्न, वस्त्र,आणि निवारा सर्वच बाबतीत कमतरता.
आत्ता मध्यंतरी tv वर एका कार्यक्रमात एका आदिवासी घरातले जेवण दाखवले, त्या माणसाने गुलमोहोराच्या फुलांच्या पाकळ्यांची भाजी करून दाखवली! मला फार आश्चर्य वाटले! म्हणजे निसर्ग जे देतो,त्यांतूनच माणूस अन्न तयार करून खात आलेला आहे. आणि निसर्ग माणसाला तेच देतो जे त्या ऋतू मध्ये शरीराला मानवेल,मनाला भावेल, जिभेची तृप्ती करेल, सहज पचेल,आणि पोषक देखील ठरेल! माणसाने मात्र निसर्गाच्या सूचनांना किंबहुना निसर्गालाच धाब्यावर बसवलेलं आहे,त्याच्या सूचनांचे पालन करणे, त्याच्या ईशार्यांची दखल घेणे सोडूनच दिले आहे असे वाटते आहे. असो.
तर मी पाहिलेली गुलमोहोराच्या पाकळ्यांची भाजी _ खाली रेसिपी देत आहे.
साहित्य: गुलमोहोर फुलाच्या पाकळ्या १ वाटी, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा,१/२ वाटी चिरलेला टोमेट, १ टीस्पून तिखट,मीठ,१ टीस्पून गरम मसाला, तेल, मोहरी .
कृती: तेल गरम करून ,त्यात मोहरी घालावी, कांदा परतावा, टोमेटो तुकडे घालुन परतावेत. तिखट,मीठ,गरम मसाला घालावा. नंतर गुलमोहोर च्या पाकळ्या टाकाव्यात. थोडे परतावे. सर्व्ह करावे.
एकदम खेडवळ टच असलेली भाजी आहे. आजच्या भाषेत rusticfeel असलेली भाजी. कमीतकमी साहित्य आणि कमीतकमी वेळ ! मस्त!
आपल्याकडे पूर्वी चुलीवर लाकूड किंवा कोळसा वापरून स्वयंपाक करण्याची पद्धत होती, आता ती fashion झाली आहे! मातीच्या जमिनीवर बसावे,चुलीवरचे गरम गरम जेवण पत्रावळीत, हातांनी खावे, हे सर्व त्याकाळी घराघरात व्हायचे,
तेच आज fashion म्हणून हॉटेल मध्ये पैसे खर्च करून होते आहे!
आजच्या भाषेत सर्व काही 'ईको फ्रेंडली' होते. सर्व साहित्य bio_degradable होते! म्हणजे थोडक्यात, निसर्गाचे निसर्गाला परत! पर्यावरणाला धोका नाही!
जेवणातील पदार्थ, त्यांची संख्या,त्यांची पाककृती, त्यात वापरल्या जाणारे अन्न घटक, मसाले, हे सर्व काही वेगवेगळे! जेवणाला बसण्याची पद्धत,जेवण करण्याची पद्धत,वेगवेगळी! म्हणजे राजे,महाराजे जेवणार,तर भल्या मोठ्या सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात.
जेवणात विविध पदार्थांची रेलचेल, पंचपक्वान्ने, दुध दुभ्त्याच्या पदार्थांची मेजवानी असे! शिवाय पाना भोवती फुलांची आरास, रांगोळी,बसायला चौरंग, समोर चौरंगावर ताट, समई, सुवासिक उदबत्तीचा सुवास, आणि जेवण वाढायला वाढपी!
| सात्विक जेवण |
ब्राह्मण मंडळी जेवणाला सुरुवात करण्या आधी आणि शेवटून तुपाची आपोष्णी (म्हणजे हात खोलगट करून,त्यात थोडेसे तूप घेऊन ते प्यायचे. ) घ्यायचे. त्यांना बाकी सरंजामाची आवश्यकता नाही.
आत्ता मध्यंतरी tv वर एका कार्यक्रमात एका आदिवासी घरातले जेवण दाखवले, त्या माणसाने गुलमोहोराच्या फुलांच्या पाकळ्यांची भाजी करून दाखवली! मला फार आश्चर्य वाटले! म्हणजे निसर्ग जे देतो,त्यांतूनच माणूस अन्न तयार करून खात आलेला आहे. आणि निसर्ग माणसाला तेच देतो जे त्या ऋतू मध्ये शरीराला मानवेल,मनाला भावेल, जिभेची तृप्ती करेल, सहज पचेल,आणि पोषक देखील ठरेल! माणसाने मात्र निसर्गाच्या सूचनांना किंबहुना निसर्गालाच धाब्यावर बसवलेलं आहे,त्याच्या सूचनांचे पालन करणे, त्याच्या ईशार्यांची दखल घेणे सोडूनच दिले आहे असे वाटते आहे. असो.
तर मी पाहिलेली गुलमोहोराच्या पाकळ्यांची भाजी _ खाली रेसिपी देत आहे.
साहित्य: गुलमोहोर फुलाच्या पाकळ्या १ वाटी, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा,१/२ वाटी चिरलेला टोमेट, १ टीस्पून तिखट,मीठ,१ टीस्पून गरम मसाला, तेल, मोहरी .
कृती: तेल गरम करून ,त्यात मोहरी घालावी, कांदा परतावा, टोमेटो तुकडे घालुन परतावेत. तिखट,मीठ,गरम मसाला घालावा. नंतर गुलमोहोर च्या पाकळ्या टाकाव्यात. थोडे परतावे. सर्व्ह करावे.
एकदम खेडवळ टच असलेली भाजी आहे. आजच्या भाषेत rusticfeel असलेली भाजी. कमीतकमी साहित्य आणि कमीतकमी वेळ ! मस्त!

No comments:
Post a Comment