सिमला पोस्टिंग साधारण १ ते १ १/२ वर्षा होत. तिथे कमालीची थंडी! ८ ते ९ महिने थंडी असेल बहुतेक. अर्थात आम्ही दोघी नाशिकलाच राहिला होतो, पण एकदा ट्रिप करून आलो सिमल्याला. उन्हाळ्यात गेलो होतो तरी वातावरण थंड! रूम हीटर, जाड रझाई घेणार तेंव्हा झोप लागणार! पण तरी मजाआली .
सिमल्याच्या युनिट मध्ये ऑफिसेस, ऑफिसर क्वार्टर्स, सगळ्या बिल्डींग उंच_सखल भागात होत्या. आमच्या क्वार्टर्स उंचावर होत्या. बाहेर मोठी रिकामी जागा, तिथून समोर बघितल की बर्फाचे डोंगर दिसायचे. दुसऱ्या पाठारावर दुसरे ऑफिसेस, क्वार्टर्स वगैरे. ह्यामुळे कुठे जायचं म्हणजे trekking केल्या सारखं वाटायचं!
 |
| सिमला युनिट मध्ये बर्फच बर्फच! |
सिमल्या मध्ये एकदा हिमाचल प्रदेश च्या गव्हर्नरना भेटायचा योग आला. ते स्वतः मराठी होते आणि म्हणून ही भेट तशी थोडी खाजगी स्वरूपाचीच होती. रविवारी भेटीचा दिवस ठरला,त्या प्रमाणे आम्ही २_३ ऑफिसर्स गेलो, त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना भेटलो, रीतसर ओळख वगैरे करून दिली गेली, आणि तेवढ्यात त्यांच्या मिसेस पण आल्या, त्या कुठल्याश्या कार्यक्रमातून परतत होत्या त्यामुळे थोडा उशीर झाला होता त्यांना. आणि सांगायची गोष्ट म्हणजे नमस्कार वगैरे औपचारिकता झाल्या बरोबर त्यांनी गव्हर्नर साहेबांना विचारल," ह्यांच्या साठी चहाचं सांगितलंय का?" मला तिथे इतकं कौतुक मिश्रित हसू अलं! म्हणजे महिला कुठेही असल्या तरी त्याचं बाईपण लपत नाही हेच खर! अर्थात गव्हर्नर सारख्यान च्या ऑफिसेस मध्ये ह्या गोष्टी सांगाव्या लागतच नाहीत, त्या तिथल्या प्रोटोकॉल मध्ये अंतर्भूत असतातच, पण तरी ते दोन शब्द एकदम एक नात जोडून गेले, आणि क्षणभर आपुलकी निर्माण करून गेले, हा गुण घेण्या सारखा आहे अस मला वाटलं, आणि मी पण ते लक्षात ठेवलं आहे.
 |
| गव्हर्नर साहेबांच्या ऑफिस मध्ये! |
हिमाचल प्रदेश च्या तात्कालीन मुख्य मंत्र्यांना पण भेटण्याचा योग आला. आर्मीच्या एका कार्यक्रमा साठी ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेंव्हा चहापानाच्या वेळी त्यांच्या जवळ बसून त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला. मला आधी थोडं दडपण वाटलं, पण मग बराच वेळ त्यांच्याशी बोलले.
 |
| हिमाचलचे मुख्य मंत्री आणि कर्नल पेटकर व त्यांचे युनिट ऑफिसर्स |
 |
| मुख्य मंत्र्यासोबत चहापान. |
एक मात्र जाणवलं की ह्या उच्च पदस्त लोकांचा एक चरीस्मा असतो. ते सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात! समोरच्याला वाटत आपल्याला किती मान मिळतोय, आणि तो खुश होतो! पण दुसऱ्याला हा मान देण्याचीच कला त्यांच्या अंगी असते, आणि म्हणूनच ते यशस्वी होतात!
सिमल्यात सुट्टीवर गेलो होतो तेंव्हां, आम्ही एका हेलीपाद्वर गेलो होतो, आणि helicopter च्या cockpit मध्ये बसून तिथला अनुभव घेतला! मस्त वाटलं. समोरची मशिनरी बघून पायलटचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही! खरच, काय कमाल आहे!
 |
| i am the co _pilot ओके ! रेडी फॉर टेकऑफ ! |
ह्या सिम्ल्याच्या tenure मधला हा किस्सा फार मजेदार आहे! आम्ही नाशिकच्या घरात नुकतेच रहायला आलो होतो, आणि फारशा ओळखी पण नव्हत्या झाल्या. एक दिवस एक गृहस्थ आमच्या गेटवरून चालले होते, ते थांबले आणि आमच्याशी बोलायला लागले,कुठून आलात , कुठे नोकरीला होतात वगैरे. मी त्यांना सांगितलं की माझे मिस्टर आर्मी मध्ये ऑफिसर आहेत आणि सध्या सिमल्याला आहेत. तर त्यांनी मला विचारले,"ते अप_डाऊन करतात का?" मी "नाही म्हटलं खर, पण मी नंतर किती वेळ विचार करत होते की सिमला अप डाऊन कसं करता येईल? पण नंतर खूप दिवसांनी लक्षात आलं, की त्यांनी'सिमला ' ऐवजी 'सिन्नर ' ऐकले असावे, कारण सिन्नर नाशिक पासून एक दोन तासांवर आहे, त्यामुळे बरेच लोकं अप_डाऊन करतात! असो, हे कळल्या नंतर आम्हाला खूप हसू आलं होत.
रिटायर होण्याला आता १ १/ २ वर्षच राहिलं होत, त्यामुळे २००८ मध्ये देवळाली पोस्टिंग मिळालं म्हणजे होम पोस्टिंग होणार होत. त्यामुळे आता रिटायरमेंट चे वेध लागायला सुरुवात झाली होती. पुढे काय? पुढच्या वेळी !
No comments:
Post a Comment