माझ्या ह्या ब्लॉग चे नावच 'food is life ' आहे, त्यामुळे आता मी 'आपला आहार आणि आपले जीवन' ह्यांचा संबंध कसा आहे हेच इथे सांगणार आहे, काही किस्से, काही रेसिपीज, काही माहिती च्या आधारे.
भोजन करणे म्हणजे फक्त 'पोट भरणे' असं बरीच लोकं मानत असतात., पण असं म्हणण चुकीचं आहे. आहारशास्त्र सांगत की अन्नाचा प्रत्येक कण आपल्या शरीराला काही ना काही घटक देत असतो_ चांगला अथवा अपायकारक . तेंव्हा प्रत्येक घास जपून खायला हवा कि नाही? समाजशास्त्र सांगत कि स्नेहभोजन केल्याने समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम, स्नेहभाव, आणि बंधुभाव लागतो! धर्मशास्त्र सांगत कि घरातील किंवा कुटुंबातील सर्वांनी मिळून,एकत्र बसून, हसत खेळत, आनंदाने भोजन केल्यास, संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते, स्वास्थ्य लाभते, कुटुंबात जिव्हाळा, प्रेम, वाढून संबंध बळकट होतात, ज्यायोगे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य प्रत्येकाच्या अंगी येते. अन्नाचे मानसशास्त्र देखील आहे बर का, कारण माणसाच्या मानसिक स्तिथीचा आणि भोजनाचा गहिरा संबंध आहे , हे आपण रोजच बघतो, अनुभवतो देखील.
प्रत्येक धर्मात, भोजना पूर्वी त्या जगतनियंत्याला नमन करून, त्याचे आभार मानण्याचा रिवाज आहे हे आपण जाणतोच. शिवाय अन्नदान पण करण्याचा प्रघात आहे. ख्रिश्चन समाजात भोजन पूर्व अशी prayer म्हणायचा रिवाज आहे कि…thank you God for the food we eat .
हिंदू धर्मात अनेक ठिकाणी 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म, उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. ' म्हणजे भोजन हा यज्ञ, आणि प्रत्येक घास ही यज्ञातील आहुती! जेवण करण्यापूर्वी,ताटाच्या बाहेर,उजव्या बाजूला , अन्नाचे, वरून खाली, असे पाच घास एकाखाली एक ठेवण्याची रीत आहे. ह्याचा अर्थ समजून घेतला तर फार नवल वाटेल, पण पटण्यासारखंच आहे. ह्यातला एकेक घास हा प्रत्येक देवतेला अर्पण केला जातो,'चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमदुताय स्वाहा, सर्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा!'(चित्र,चित्रगुप्त,यम,यमदूत,आणि सर्व देवता) आणि त्यांना तृप्त केल्या नंतर आपण भोजन ग्रहण करतो. ताटाभोवती डावी कडून उजवी कडे पाण्याने तीनदा प्रोक्षण (पाणी उजव्या हातात घेवून ताटा भोवती गोलाकार घालणे ) करण्या मागे अर्थ हा कि पूर्वीच्या मातीच्या जमिनी असल्याने कीड मुंगी ताटात येवू नये म्हणून हे पाणी, आणि अन्न!
मुस्लिम बांधवा मध्ये एकाच थाळीतून सर्वांनी एकत्र बसून भोजनाला सुरुवात करण्याची आणि त्याआधी प्रार्थना करून , 'बिस्मिल्लाह' म्हणण्याची पद्धत आहे.
बौद्ध बांधवा मध्ये 'झेन' गुरुंच्या म्हणण्या प्रमाणे स्वयंपाक करणे म्हणजे आत्मबोधाचा मार्गच आहे. आणि भोजना पूर्वी, हे भोजन आपल्यापर्यंत पोहचविणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानण्याची रीत आहे!(शेतकऱ्या पासून वाढप करणाऱ्या पर्यंत!) म्हणजे किती उदात्त विचार आहे बघा.
तर स्वयंपाक करणे हा अध्यात्मिक उन्नत्तीचा मार्ग आहे. कारण आध्यात्मिक उन्न्ती साठी जेवढी साधना,एकाग्रता,नियमित उपासना लागते, तितकीच पाकसिद्धी साठी लागते. पाकसिद्धी च्या साधनेतून एकमेकांसाठी प्रेमभाव, सहिष्णुता, आणि एकजूट वाढते आणि त्या परमात्म्याचे आशीर्वाद मिळतात ते वेगळेच! उत्तम अन्न तयार करणे म्हणजे स्वतःला तयार करणे, शुद्ध, सात्विक,परिपूर्ण आहार घेणे म्हणजेच स्वतःला शुद्ध,सात्विक,आणि परिपूर्ण करणे होय!
म्हणजे प्रपंच आणि परमार्थ, दोन्हीला जोडणारा दुआ म्हणजे आपले भोजन. तेंव्हा हा दुआ अगदी भक्कमच असायला हवा, होय ना?
हा दुआ भक्कम करण्याची सुरुवात एका गोड पदार्थाने करूयात….
खव्याची पोळी: १ वाटी खवा कोरडा परतून घ्यावा. मिक्सर मधून गुळगुळीत करून घ्यावा. थंड झाल्यावर,त्यात १ वाटी पिठीसाखर, १ टीस्पून वेलची पूड ,१ टीस्पून भाजलेली खसखस पूड,घालून सारण तयारकरावे . साड्या पोळीची कणिक घेवून गोळी घ्यावी, सारण भरावे, पोळी लाटून, तव्यावर तूप घालून भाजावी.

No comments:
Post a Comment