God saw man hungry, he created food,
God saw man thirsty,he created water,
God saw man lonely,he created Friends,
God saw man with no problems, he created… WIFE !
बायको बद्दल काय काय कल्पना असतात ह्या नवरेमंडळींच्या! तरी बर बायकोच काळजी घेते ह्या नवरोबांची! नवऱ्याचीच नव्हे,तर घरातील सर्व सदस्यांचं खाण _पिण, पथ्यपाणी, मूड्स, लहरी, अनेक demands, पै पाहुणा, सणवार, सर्व प्रकारे परिवार मेन्टेन करण्याची जबाबदारी असते गृहिणीवर.
आता कालच शेजारीण म्हणत होती,'रोज रोज ब्रेकफास्टला काय करायचं प्रश्नच असतो बाई!' संध्याकाळी करण्यासाठी पदार्थ पण बरेच असतात आणि वेळ पण असतो. पण सकाळी घाई असते. हे खरं आहे, पण थोडी पूर्व तयारी केली, तर ब्रेकफास्ट साठी पण बरेच सोपे पदार्थ करता येतात, आणि व्हरायटी पण मेन्टेन करता येते. माझ्या काही हमखास रेसिपीज आहेत ज्या तुम्ही पण ट्राय करून बघा.
१) पंचामृत डोसे: १ वाटी दूध,१/२ वाटी दही, १/२ वाटी साखर, २ टेबलस्पून तूप,२ टेबलस्पून मध एकत्र करून त्यात मावेल एवढी कणिक घालून डोसे बनवावेत. तूप घालून किंवा गरम दुधा बरोबर सर्व्ह करावेत/ टिफिन बॉक्स मध्ये foil _wrap करून द्यावेत.
२) मिक्स डाळींचे डोसे किंवा pancakes: १ १/२ वाटी तांदूळ,१/२ वाटी उडद डाळ,१/४ वाटी प्रत्येकी मुगडाळ,मसूरडाळ,हरबराडाळ, आणि तुरडाळ.
सर्व डाळी सकाळी भिजवून, संध्याकाळी बारीक वाटून ferment होण्यास ठेवाव्यात. सकाळी त्यात मीठ,हिरवी मिरची तुकडे,कोथिंबीर, आलं,आणि हवी असल्यास हळद घालून डोसे किंवा pancakes बनवावेत. हे लंच बॉक्स मध्ये पण नेता येतात.
३) सिंधी सेवरी ब्रेड : १ वाटी टोमेटो प्युरी, आणि १/२ वाटी लसूण,कांदा,हिरवी मिरची,कोथिंबीर आणि पुदिना एकत्र वाटून तयार केलेली पेस्ट,हे साहित्य तयार ठेवावं.गार्निशसाठी शेव,लिंबू रस,कोथिंबीर.
तेल गरम करून, टोमेटो प्युरी घालून परतावी. लगेच हिरवी पेस्ट परतावी.मीठ तिखट घालून पातळसर ठेवावे.
सर्व्ह करताना, प्लेट मध्ये ब्रेडचे स्लाइस ठेवून,त्यावर हा तयार रस्सा ओतावा, वरून कोथिंबीर आणि लिंबू रस घालून द्यावे.

No comments:
Post a Comment