Friday, 30 August 2013

SABRKA LPHAL MEETHA HOTA HAI!

एका मुलाने मुलीला propose केले. त्या मुलीने मुलाला धु धु धूतलं ! (बडवले!)
मुलगा उठला, हात, शर्ट झटकत विचारलं, 'तर मग, मी  'नाही'  समजू का?'

कठीण आहे ह्या प्रेमवीरांची! कित्ती पेशन्स असतो ह्यांच्यात! म्हणजे आपलं ट्राय  करत रहायचं, वाजली तर पुंगी, नाहीतर गाजर!

तसं  बघितलं, तर असा पेशन्स बऱ्याच गोष्टींसाठी लागतो. कुठलीही कला जसं  नात्य, नृत्य, चित्रकला, अभिनय किंवा एखादी कारीगरी शिकायची तर भरपूर पेशन्स हवा. वर्षानुवर्ष कठोर मेहनत, रियाज, कलेची उपासना केली तर ती कला आत्मसात करता येते. एखादी कारीगरी शिकायची म्हणजे पण नित्य सराव हवा, अभ्यास हवा, तेंव्हाच एखादी  उत्तम कलाकृती घडते.
एखाद्या मिठाईच्या दुकानातील कारागीर बघा. एक जण  मिठाई बनवतो, दुसरा रोल करतो, तिसरा त्यावर डेकोरेशन करतो, चौथा वर्ख लावतो, आणि मग ती मिठाई ट्रे भरून दुकानात येते. आपण ती मिठाई बघून खुश होतो, इतक्या  आकर्षकपणे ती   ठेवलेली असते!


पण  किती लोकांची मेहनत असते त्यात. आपल्याला वाटते, एवढी महाग मिठाई कशाला घ्यायची? घरीच करू. पण घरी हे सर्व complicated  काम होत नाही, कारण 'तेथे पाहिजे जातीचे.' म्हणतात ना, ' जेणो काम तेणोच ठाय, दुजो करे, तो गोतो खाय!' ह्या प्रेमवीरांच पण बहुधा असचं  आहे, तेथे पाहिजे जातीचे!

कच्छी दाबेली
 'कच्छी दाबेली ' असाच एक प्रकार जो stall वरच खायला मस्त लागतो, पण तितकीच टेस्टी घरी पण बनवता येते . दाबेली मसाला दुकानात मिळतो, पण मी घरी पण तयार करते. साहित्य मात्र बरच लागतं, पण एकदा हे सर्व साहित्य जमलं, की मग जी दाबेली बनते, वाह!

कृती:
 तेलावर मोहरी, हिंग, हळद, तिखट घलवे. लगेच उकडून mash केलेला बटाट्याचा लगदा घालून, नीट परतून घ्यावे. मीठ, दाबेली मसाला, तिखट, कोथिंबीर घालावी. भाजी  थंड करून घावी.
एका प्लेटमध्ये सर्व भाजी नीट दाबून बसवावी. त्यावर शेव पसरावी, नंतर सुकं खोबरं, नंतर कोथिंबीर, नंतर टूटीफ्रुटी, बेदाणे, काजू तुकडे,   डाळिंब दाणे, तिखट शेंगदाणे,सीजन मध्ये असल्यास काळी आणि हिरवी द्राक्ष तुकडे असे सर्व एकावर एक पसरून टाकावे. वरती एक चेरी मधोमध लावावी.
सर्व्ह करायच्या आधी ब्रेड मधोमध कापून, बटर वर गरम करावा, आत आधी चिंचेची  चटणी लावावी, नंतर भाजी स्प्रेड   करावी,( लाल  चटणी हवी कसेल तर लावावी ) आणि ब्रेड सर्व्ह करावा.


 ऑप्शन:  हवे असेल तर चीज, किंवा एक्स्ट्रा बटर लावून द्यावे. दोन चार दिवसात गणेशोत्सव सुरु होतो आहे. त्याची धमाल ती जादू  वेगळीच असते! माझ्याकडे हा  गणपतीचा सण फार महत्वाचा असतो. रोज सकाळ_ संध्याकाळ आणि दुपार _ रात्रीचा नैवेद्य वेगळा असतो, त्यामुळे रोजचं मेनू प्लानिंग आधीच करून ठेवावं लागतं. माझी आठ दिवसांची लिस्ट समोरच ठेवलेली असते. खरेदी, तयारी, पूजा, चटण्या, मसाले, मोदकाचे सारण सर्व काही वेळेवर तयार  हवं! तेंव्हाच स्वयंपाक वेळेत होतो. तोवर थोडा वेळ आहे, तर आणखी काही चटपटीत पदार्थ करून घेईन म्हणते आहे.


Thursday, 29 August 2013

SHRIKRISHNACHA GOPALKALAA AANI SAMAJIK BANDHILKICHA SANDESH

'गोविंदा आला रे आला, जरा मटकी स्म्भाल ब्रिजबाला!
अरे एक दो तीन चार, संग पांच  छे  सात हैं  ग्वाला!'


आज दहीहंडी,   गोपाळकाला , नुसती धूम! सगळ्या बाल गोपाळांचा कुतूहलाचा विषय असतो ही दहीहंडी. माणसांनी  उंच उंच मनोरे रचायचे,आणि एकाने  सर्वात वरती पोहोचून दहीहंडी फोडायची! थ्रिलिंग! डेरिंग! कमाल आहे  ह्या गोविंदांची ! हल्ली तर महिला आणि मुलींची पथकं देखील ह्या दहीहंडी मध्ये हिरीरीने, आणि  जय्यत तयारीने भाग घेताना दिसायला लागल्येत.Talk about women's  emancipation!

गो गो गोविंदा!
कृष्ण आपल्या सवंगड्यांना घेवून यमुनातीरी खेळायचा, तेंव्हा न्याहारीची वेळ झाली, की कृष्ण सगळयांना गोल बसवून घ्यायचा. सर्व  न्याहारीचे पदार्थ एकत्र करायचा, आणि मग सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घ्यायचा! हाच तो गोपाळकाला! ह्यामुळे व्हायचे काय, की कुणाचा पदार्थ जास्त चांगला, कुणाचा कमी, कुणाचा  हलका, कुणाचा भारी, कुणाचा स्वादिष्ट, कुणाचा बरा, कुणा गरीबाचा, कुणा श्रीमंताचा, असा कोणताही भेदभाव उरायचा नाही, किंबहुना हा भेदभावच   विसरायला लावणारा हा गोपाळकाला!
गोपाळकाला
भेदभाव विसरायला होतात, त्यातून सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि बंधुभाव वाढीस लागतो .  आणि सर्व स्वाद एकत्र   झाल्यामुळे हा गोपाळकाला लागायचा पण स्वादिष्ट! म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दोन्ही स्थरांवर स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा कृष्णाचा हा सोप्पा मार्ग होय! एकात्मतेचा संदेश  देणारा हा श्रीकृष्णाचा  गोपाळकाला! भाषणबाजी नाही, लेक्चर नाही, जड जड शब्द नाहीत, फक्त सहज, सोपी कृती!

ह्यावरून आठवलं, मध्यंतरी, एका शाळेत एका शिक्षकाने असाच काहीसा प्रयोग केला होता. त्यांच्या लक्षात आले  होते,की एक मुलगी वेगळी  बसून आपला डबा  खाते. त्यांनी तपास केला, तेंव्हा त्यांना कळलं, हिच्या डब्यात अगदीच काही नसतं  खायला! काही तरी सुकं पाकं आणायची, ह्याला कारण तिची नाजूक आर्थिक परिस्थिती. म्हणून तिला इतरांबरोबर बसून डबा  खायला  लाज वाटायची. मग, त्यांनी दुसऱ्या  दिवशी पासून एक प्रयोग सुरु केला. मधल्या सुट्टीत, त्यांनी वर्गातल्या सर्व मुलांना गोलाकार बसवून , आपल्या स्वतः च्या डब्यातला एक घास खाऊन, डबा पुढे सरकवायला सांगितला, आणि मग मागच्या डब्यातल्या खाऊची चव घेऊन तोही डबा  पुढे सरकवायचा. असा एक राउंड पूर्ण करायचा! त्यामुळे झाले काय, सगळ्यांना एकमेकांच्या डब्यातला खाऊ चाखता आला, आणि त्या मुलीची भीती पण कमी झाली! किती सहज, सोपी कृती! पण त्या मुलीसाठी खूप काही साध्य करून गेली ! मला फार आवडली ही गोष्ट! असे कल्पक शिक्षक आपल्या मुलांना मिळाले तर कितीतरी प्रोब्लेम समस्येचं उग्र किंवा गंभीर रूप धारण करण्या आधीच सुटतील, नाही?

गोपाळकाला करण्यासाठी:  मी चुरमुरे, भिजवलेले पोहे,  मीठ, साखर, हिरवी मिरची तुकडे,  पंढरपुरी डाळ, भाजलेले शेंगदाणे,  बेदाणे, टोमेटो तुकडे,, कांदा चिरून, काकडी तुकडे, सफरचंद तुकडे, पेरूचे तुकडे, केळीचे तुकडे,दही, दूध, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, खवलेला नारळ असे सर्व पदार्थ एकत्र करून, वरून मोहरी_ जीऱ्याची फोडणी देते, आणि सर्व्ह करते.

आणि नवीन जमान्यातला  म्हणाल तर STEW किंवा  HOTCH  POTCH सूप  हा मला  वाटतं गोपाळकाल्याच्या जवळपास जाणारा, त्याच्याशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. One dish meal म्हणता येईल अशी ही सोपी डिश आहे.  पोटभर, स्वादिष्ट, पचनास हलकी आणि पोषकतत्वांनी भरपूर!

vegetable  stew
STEW:  शिजवलेल्या मिक्स डाळी, शिजवलेला भात, शिजवलेली मक्रोनी, किंवा पास्ता, शिजवलेल्या मिक्स भाज्या, (हवे असल्यास शिजवलेले चिकनचे तुकडे), बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किंवा चिली फ्लेक्स, हवी असल्यास थोडी लसूण बटर वरती लाल करून, हे सर्व जिन्नस, किंवा ह्यातले हवे असतील ते जिन्नस एकत्र करावेत, त्यात बटर, मीठ, काळी मिरीपूड, कोथिंबीर किंवा पार्स्ले,टोमेटो सॉस आणि थोडे पाणी घालून पातळसर करावे.  गरम करून, थोडे क्रीम आणि bread  croutons, गार्लिक ब्रेड, किंवा सूप स्टिक्स घालून सर्व्ह करावे.

दहीहंडी एन्जॉय करा!     

Wednesday, 28 August 2013

KRISHNA JANMASHTAMI SOHOLA

जय श्रीकृष्ण!
आज गोकुळाष्टमी! श्री कृष्णाचा जन्मदिवस! हा दिवस  भक्तिभावाने, जाल्ल्लोशाने साजरा होतो. उद्या गोपाळकाला आणि दहीहंडी ची धूम असणार!

कृष्ण जन्माचा सोहळा
 रात्री १२ वाजताचा जन्म.  संध्याकाळपासून भक्त मंडळी मंदिरांमधून, घरांमधून भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमात रंगलेली दिसायला लागतात. मग रात्री कृष्ण जन्म, पाळणा, श्रीकृष्णाची आरती,  त्यानंतर पंजिरी, सुंठवडा, फळ, आदींचा नैवेद्य, आणि पुन्हा भजनांचा सूर टिपेला पोहोचतो!


श्रीकृष्णाचा पाळणा म्हण्यासाठी महिलांची चढाओढ  आणि पाळण्याची दोरी धरायला  मिळावी म्हणून मुलांच्यात चढाओढ! पाळण्याची दोरी ओढायची,  कृष्णाला जोजावायचं, म्हणजे सर्व मातांसाठी वात्सल्याचा महापूर! महिला आणि बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणी!

अनेक ठिकाणी ह्या दिवसात भागवत सप्ताह असतो, जिथे  आठ दिवस कृष्ण लीला आणि कृष्ण जन्माचे प्रयोजन ह्यावर प्रवचनातून लोकांपर्यंत कृष्णाचा उपदेश पोहोचवला जातो. 'राधाकृष्ण! गोपालकृष्ण!' आणि 'जय राधे, जय गोपाल!' च्या तालावर महिलावर्ग टिपऱ्या च्या ठेक्यावर फेर धरतात, आणि राधा कृष्णाची आराधना करतात. सगळ वातावरण कसं  रंगबिरंगी, उल्हासित, आणि भक्तीने भारलेलं!


आज अनेक महिला उपवास करतात. एकीकडे कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते, तर दुसरीकडे   तरुण मंडळींची उद्याच्या दहीहंडीची जय्यत तयारी चालू झालेली असते!

ह्या दहीहंडी फोडण्याच्या कृतीतून कृष्णाने मनुष्याला, आपल्यातील षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ,मद, मोह, मत्सर ह्यां चा नाश करून, म्हणजेच अवगुणरुपी  मटकी फोडून, लोण्याच्या रुपात असलेला निर्मळ परमानंद  मिळवण्याचा संदेश दिला आहे.

असो. तर संध्याकाळी भजनांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्या आधी सकाळी केलेला  मस्त, चमचमीत, झणझणीत आणि स्वादिष्ट चनाआलू पुरीचा ब्रेकफास्ट!

चना आलू पुरी
  




Tuesday, 27 August 2013

TANTRDNYANANE KARUYA JIVANAAT PRAGATI

भिकारी:  'माई, भाकरी वाढ'
आजी:    'अजून भाकरी तयार नाहीये, थोड्या वेळाने ये.'
भिकारी:  'माझा मोबाईल  नंबर ठेव. भाकरी झाली, की मिस्ड कॉल दे.'
आजी:     'ते कशाला? भाकरी झाली  की मी facebook  वर status  update करते. ते वाचून तूच ये!'

किती प्रगती झाली आहे बघा! technology  advancement  मुळे,  चमत्कार घडून, क्रांती घडत चालली आहे. ज्या पिढीला Landline  ची ट्रिंग ट्रिंग देखील एका जमान्यात अत्याधिक चैन होती, त्या पिढीच्या  मंडळींना स्वतःचा मोबाईल म्हणजे एक गरज होत चालली आहे! माझे वडील सुद्धा, काही वर्षां पूर्वी त्यांच्यासाठी मोबाईल घेऊ म्हटलं, तर का_ कु  करीत होते, म्हणजे कशाला  मोबाईल, तो हरवला तर, वगैरे वगैरे.  पण,कालांतराने त्यांना त्याची इतकी  सवय झाली आणि आता ती त्यांची गरज आहे! (आणि मोबाईल कुठे विसरत नाहीत किंवा हरवतही  नाहीत!)

रेडियो म्हणजे  चैनीची गोष्ट होती, अशा काळात वाढलेली एखादी आजी, ' LCD  टीव्ही वर कार्यक्रम छानच  दिसतात हं,  अगदी सिनेमा बघितल्या सारखे वाटते हो!' म्हणत मन लावून टीव्ही बघते! ह्या  आजींनी तर Facebook ला आपलसं केलं आहे!

असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी नवीन टेक्नोलोजी आत्मसात करून, त्याचा वापर स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करून घेतला आहे. काहींनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जवळच्यांच्या सम्पर्कात राहण्यासाठी केला आहे, video chat  वगैरे द्वारे आपल्या लांब असलेल्या नातवंडांना, पंतवंडांना पाहता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, आणि मायेची दुधाची तहान निदान videoच्या   ताकावर का होईना भागवता येते. ह्यामुळे त्यांचा एकटेपणा दूर होतो, आणि मनाला विरंगुळा आणि आनंद मिळतो!

पण, हे सर्व करता यावे, आणि हे तांत्रिक काम नीट  जमावे म्हणून आपली नवीन पिढीच तर ह्या पिढीला मदत करते आहे,  नाही का? मग आपण ह्या पिढीला insensitive का म्हणतो?  दुःखी होण्यापेक्षा, ह्या नवीन पिढी बरोबर  घ्यावं , कधी कधी दहा पाउलं  चालून त्यांच्या जवळ पोहोचावं, मग कळेल, की ही मुलं  सुद्धा संवेदनशील आहेत, प्रेमळ आहेत, फक्त त्यांचा   दृष्टीकोन वेगळा आहे. वेळेचा अभाव आणि वेगवान जीवनशैली  मुळे दुरावा वाटतो. पण दुरावा कमी व्हायला मागच्या पिढीनेच समजूतदारपणा दाखवायला लागेल, अन्यथा ही  पिढी भरकटेल.

मनांमध्ये दुरावा असेल, तर कोणतेच तंत्रज्ञान मनांना जवळ आणू शकत नाही, पण मनं  एक असतील, तर  कोणतीही अडचण दुरावा उत्पन्न करू शकणार नाही, हे मात्र खरं!

सद्ध्या श्रावण चालू आहे, त्यामुळे अंडी घालून केक करता येत नाहीये. त्यासाठी, बिना अंड्याचा केक केला, तो पण microwave  मध्ये (प्रगत तंत्रज्ञान म्हणत होते ना मी? ते हेच!) 

साहित्य;   ३/४ कप मैदा/ आटा ,  १/४ कप मिल्क पावडर, २ टेबलस्पून कोको पावडर, १ कप पिठी  साखर, १/२ कप दही, १/४ कप बटर/मलई/तेल , १ १/४ tsp बेकिंग पावडर, ३/४ tsp सोडा, १/२ कप दूध.

कृती: सर्व साहित्य नीट  whisk करून, microwave मध्ये ६०% वर, ७ ते ८ मिनिटे बेक करावे . सर्व्ह करताना, मिक्स फ्रुटचे  तुकडे,किंवा ice cream सोबत द्यावे.




Saturday, 24 August 2013

DAGINE GHARI AANI KANDE LOCKER MADHE! WAA! KYA BAAT HAI!

जैन  पध्दतीने स्वयंपाक करता येणाऱ्या मुलींची डिमांड अचानक वाढली आहे! का? त्यांना बिन कांद्याचा छान  स्वयंपाक करता येतो म्हणून! कांद्याचे गगनाला भिडलेले भाव, आणि कांद्याचा  रोजच्या स्वयंपाकातील अटळ वापर ह्यांची सांगड घालता घालता नाकीनऊ आली आहे अगदी! रोज  कांदा चिरताना डोळ्यात पाणी यायचं, आता रोज  चिरायला कांदाच  नाही म्हणून डोळ्यात पाणी येत आहे! एका नवरे महाशयांनी बायकोला सांगितले, 'अगं, लॉकरमधले दागिने काढून आण, आणि हे कांदे लॉकर मध्ये ठेवून ये!'

पण अशा नाजूक परिस्थितीत, आपण हार न मानता, ह्या कांद्यालाच मात द्यायला शिकलं  पाहिजे. इतर  वेळेस कांद्याच्या टोपलीत अगदी बापुडवाणा  राहणारा कांदा फारच मिजास मारतोय की!

तर ह्या कांद्याला फाटा देऊन केलेल्या काही रेसिपीज…।

lलसणीची आमटी  कोशिंबीर l

१) फोडणीच वरण: १ वाटी तूरडाळ   शिजवून घ्यावी. एका पातेलीत डाळ  गरम करायला ठेवावी. त्यात मीठ, आणि लाल तिखट घालावे. दुसरीकडे तेल  गरम करून, त्यात मोहरी, जिरे, लसूण, लाल सुकी मिरची, हिंग, कढीपत्ता, आणि हळद घालावी.  ही फोडणी डाळीवर ओतून, पातेल्यावर  लगेच झाकून ठेवावे, म्हणजे स्वाद lock  होतो. डाळ गरम झाली की, कोथिंबीर  घालून वाढावी ,

२) केळ्याची  दह्यातली कोशिंबीर: केळीचे छोटे तुकडे करावेत. बाउल मध्ये केळ्याचे  तुकडे, मीठ, मिरचीचे बारीक तुकडे, साखर, कोथिंबीर घालून,शेवटी घट्ट  दही घालून कोशिंबीर सर्व्ह करावी.  हवे असल्यास, डाळिंबाचे  दाणे  घालावेत, म्हणजे रंगसंगती साधली जाईल आणि कोशिंबीर छान  दिसेल.

३)  मटारची उसळ:  तेल गरम करून,त्यात जिरं, हिरवी मिरची तुकडे,कढीपत्ता घालावा. ह्यात थोडे उकडलेले मटार घालावेत, आणि मीठ, साखर घालावे. थोडे पाणी घालून शिजू द्यावे. शेवटी नारळाचा चव, आणि कोथिंबीर घालून  वाढावे.

आता कांदा खायचे सोडून चातुर्मास पाळूयात की!   

Friday, 23 August 2013

PREM MHNJE PREM MHNJE PRM ASTA!

पप्पूने एक लडकीसे कहा, 'आय लव्ह यु!'
लडकीने  गुस्सेमें  उसे एक चांटा मारा और पूछा, 'क्या बोला?'
पप्पूने  रोते हुए कहा, 'जब तुमने  सुनाही नहीं तो चांटा क्यूँ मारा?'


 हा विनोद वाचल्या नंतर मी इतक्या वेळा हसले कि बस!  खरचं,प्रेमात पडायचं, मग प्रेमभंग होतो, मग पुन्हा त्याच जोमाने, त्याच उत्साहाने, त्याच उत्कटतेने, प्रेमात पडायचे! (ह्या अजब प्रेमवीरांच्या चिकाटीला आपला प्रेमळ सलाम  बर का!) एका गाजलेल्या  मराठी गाण्याच्या   ओळी आठवल्या…।
'प्रेमात पडतो जो तो  येता जाता,
पण सावरतो तुझा होता होता. '

पण ह्या प्रेमा व्यतिरिक्त  प्रेमाच्या अनेक छटा असतात नाही का?
'प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच  असतं ,
तुमचं  आमचं सर्वांचं सेमच असतं !'
प्रेमाची व्याख्या करणारं ह्याहून अधिक बोलकं वाक्य कोणतं  असू शकेल? स्नेहभाव, माणुसकी, भूतदया, मैत्री, आपुलकी, दयाभाव, भक्ती, सेवाभाव हे सर्व ह्या प्रेमाचेच आविष्कार आहेत. आणि अजून बरीच नाती अशी असतात, की त्यांना कोणतेच नाव देता येत नाही, पण तरी  ही सर्व नाती प्रेमाचीच असतात!

नातं  असतं  तिथे प्रेम असेलच असे नाही, पण प्रेम असेल,तिथे नाते आपोआप तयार होते. प्रेम असतं तिथे समर्पण असतं, त्याग असतो, सेवाभाव असतो, विश्वास असतो, एकमेकांबरोबर विचारांची, घेतलेल्या निर्णयांची मोकळी  देवाण घेवाण असते. त्यासाठी एकमेकांबरोबर वाद नव्हे, तर संवाद असतो, कारण  समोरच्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे, त्याचा उत्कर्ष व्हावा,प्रगती व्हावी अशी प्रामाणिक तळमळ असते. 

आपण प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला, संस्थेला, पशूपक्षांना किंवा एखाद्या छंदाला आपण आपलं  सर्वस्व अर्पण करतो.  खरं  प्रेम आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन असेल, तर समोरच्यावर विश्वास ठेवून त्याला उंच भरारी मारू दिली पाहिजे, म्हणजे मग तो पुन्हा त्याच विश्वासाने, विसाव्या साठी, प्रेमा साठी तुमच्या पाशी येईलच !  पण त्याला दडपण ठेवलं, हुकुमत गाजवून त्याला ताब्यात ठेवायला बघितलंत, तर मग मात्र तो संधी मिळताच जो भरारी घेईल, तो नेहमीकरिता तुमच्या कडे पाठ  फिरवेल, हे नक्की. आपलं  प्रेम,  हे खळाळून वाहणाऱ्या  पाण्या सारखं असायला हवं ….मध्ये  खड्डा आला,की पाणी तो खड्डा भरून काढत, आणि पुढे वहात राहत!

प्रेमाने बनवलेली अशीच एक छानशी रेसिपी _ chocolate log…. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, आणि बघताबघता प्लेट सफाचक!

chocolate log

साहित्य: १० ते १५ Marie  बिस्किटे, १/२ कप काळी  कॉफी , आणि २ _ ३  टेबलस्पून icing  sugar   मिक्स करून, फेटून घेतलेले १ कप क्रीम,  ५० ग्रॅम melted chocolate,  १ टीस्पून कोको पावडर 

कृती : साखर घालून बिना दुधाची कॉफी करून घ्यावी. १० ते १५  Marie  बिस्किटे एकेक करून ह्या  कॉफी decoction मध्ये बुडवून प्लेट मध्ये एकावर एक ठेवावीत. सगळी बिस्कीट ठेवून झाली,की,वरच्या भागावर,आणि गोलाकार क्रीम पसरावे. फ्रीज मध्ये ठेवावे. पुन्हा काढून, उलटे करावे,वरच्या बिस्कीटवर क्रीम पसरावे. पुन्हा फ्रीज मध्ये ठेवावे.  थोड्या वेळाने त्यावर melted  chocolate ओतावे,  फ्रीज मध्ये ठेवावे. पुन्हा काढून,दुसऱ्या बाजूवर  chocolate  ओतावे. थंड करून घ्यावे. आता log  काढून, त्याचे तिरके तिरके स्लाईसेस  सुरीने कापावेत. डिश मध्ये अरेंज करून,  बाजूने कोको पावडर भुरभुरावी, किंवा  chocolate  melt करून drizzle करून, थंड सर्व्ह करावे.  ,हवे असल्यास, किसलेले white किंवा dark chocolate घालावे.          





Thursday, 22 August 2013

KELYANE HOT AAHE RE, AADHI KELECHI PAHIJE!

'रूप लावण्य अभ्यासिता न ये।   सहजगुणास न चले उपाये।
काहीतरी धरावी सोयी।  आगंतुक गुणाची ।।'

खर आहे,रूप,उंची,रंग,इत्यादी गोष्टी आई वडिलां  मिळतात, जे आपल्याला जन्मतः मिळाले,  ते सर्व गुण म्हणजे सहजगुण, त्यांच्या वर आपले काहीच नियंत्रण नाही. पण रूप लावण्याची कमतरता  आपल्यातल्या उत्तम गुणांनी आयुष्यात यश आणि   सफलता मिळवून भरून काढता आली पाहिजे. त्यासाठी,  आपल्यातील क्षमता  आणि  कमतरता ओळखून, आपण आयुष्यात एखादी कला किंवा  विद्या अवगत करायला हवी, किंवा एखादा सदगुण अंगी बाणावा  ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ह्यामुळे वेळ सत्कारणी लागतो, आपला विरंगुळा पण होतो,व्यक्तीमत्वात सुधारणा होते, ज्ञानात भर पडते, आयुष्यात नैराश्य येत नाही. माझं  तर मत आहे,की आज आपण जे शिकू, त्याने आपला आयुष्याचा दर्जा हा कालच्या पेक्षा थोडा सुधारलेला वाटला, तर आपण काहीतरी प्रगती केली असे  समजावे! आणि असे सतत स्वतःला घडवीत जावे, जमले तर दुसऱ्यांनाही घडवीत जावे.   एखाद्या  क्षेत्रात प्राविण्य मिळवलं पाहिजे, म्हणजे मग ह्या प्राविण्याच्या बळावर नाव लौकिक आणि समाधान मिळतं.  

माझा स्वतःचा ह्या बाबतीत अनुभव आहे ,तो share करण्या सारखा आहे.    अनेक वर्ष( थोडी थोडकी नाही,२५ वर्ष!) इमाने इतबारे housewife चा role अदा केल्यानंतर, आयुष्यात एक वळण असं  आलं, जिथे पोकळी निर्माण झाल्यासारखी झाली, शारीरिक आणि मानसिक त्रासातून जाता जाता, एके ठिकाणी बसून, आयुष्याचं अवलोकन करण्याची वेळ आली.  तेंव्हा लक्षात आलं, की इतकी वर्ष गतिमान आणि प्रवाही आयुष्य जगल्यानंतर, पहिल्यांदाच अनुभवाला आलेल्या  रिकामपणामुळे हा कंटाळा, depression, नैराश्य आलेलं  आहे. मग ह्यातून बाहेर पडण्यासाठी हळू हळू  प्रामाणिक धडपड सुरु केली.  शोधता शोधता लक्षात आलं, की आपल्याकडे लिहिण्याची कला आहे,  विचारांना पद्धतशीरपणे मांडायची खुबी आहे. मग हा ब्लॉग लिहिण्याची कल्पना सुचली, किंबहुना सुचवली गेली. आजारपणाच्या काळात, स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी इंटरनेट चालवायला शिकले होतेच, त्यातूनच ही कल्पना पुढे आली, आणि खरं सांगते, माझे आयुष्यच बदलून गेले! आता मी Netizen  झाली आहे. म्हणजेच मी आधी म्हटलं  तसं, कालच्या पेक्षा आजचा दिवस आणखी  प्रगतीचा आहे!  रोज  काहीतरी नवीन  शिकायला मिळतं, फक्त जागरूक असलं  पाहिजे. आता, विरंगुळा म्हणून लावून घेतलेल्या ह्या छंदात मी इतकी गुरफटले आहे,की, पूर्वी जो वेळ मला खायला उठायचा, तोच वेळ आता मला पुरत नाहीसा झाला आहे! घरकामा इतकचं  ब्लॉग  लिहिणं, त्यासाठी नवीन विषय निवडणं, हे महत्वाचे वाटते. ह्या सर्वांतून मला आनंद तर  मिळतोच,पण माझ्या creativity ला वाव मिळतो, आणि आयुष्याला एक नवीन अर्थ प्राप्त झाला आहे, ह्याचं समाधान वाटतं!

माझं हे इंटरनेट मधलं ज्ञान जेंव्हा  दुसऱ्यांनाही उपयोगाला येतं, तेंव्हा ह्या ज्ञानाचं  चीज झाल्या सारखं वाटतं!
म्हणतात ना,'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!'


CADBURY  CHOCOLATE लहानां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं, हो ना? मग घरीच  केलं  तर?

 ५० ग्रॅम कोको पावडर, १०० ग्रॅम  मिल्क पावडर, १०० ग्रॅम  साखर, ३० ग्रॅम  बटर,  ३० मिली दूध pan  मध्ये  स्लो हीट वर शिजत ठेवावे.थोड्या  वेळाने, हाय फ्लेम करून ढवळत राहावे. घट्ट  होत आले, की प्लास्टिक  मोल्ड मध्ये सेट करून, किंवा tray मध्ये सेट करून तुकडे करून, foil wrap किंवा कलर्ड पेपर मध्ये wrap  करून द्यावे.

मी हे चॉकलेट माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला केलं  होतं. माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, त्यांच्या कडून मी ही शिकले होते. बऱ्याच  वेळा हे चॉकलेट  केलं  जातं, आणि आता तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना पण आवडतं!
         

Wednesday, 21 August 2013

BHAIYYA MERE RAKHIKE BANDHAN KO NIBHANA

भैय्या मेरे राखीके बंधनको निभाना!

काल राखी पौर्णिमा होती. काही  ठिकाणी आज देखील राखी पौर्णिमा साजरी केली   जाते आहे . नारळी पौर्णिमा  हा   कोळी लोकांचा महत्वाचा  सण.  नारळ वाहून समुद्राची पूजा करतात, जेणे करून समुद्र   त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवेल, भरपूर सागरी संपत्ती देईल,  दरीयात जाऊन मासेमारी करणाऱ्या त्यांच्या जीवलागांचे रक्षण करेल, आणि त्यांची प्रगती  होत  राहील.  कोळी नृत्य करीत आनंद साजरा करतात.

मी डोलकर डोलकर, डोलकर दरियाचा राजा!

प्रत्येक भावाच्या हातावर आजच्या दिवशी राखी सजलीच पाहिजे. भाऊ बहिणींची, आणि बहिणी भावांची आतुरतेने  वाट पाहतात  तो दिवस! भावाला राखी बांधून, त्याचे औक्षण करून, एकमेकां मधला स्नेहभाव आणि प्रेम वृद्धिंगत होते! बहिणीला आवडणारी भेटवस्तू भाऊ आनंदाने तिच्या हातात देतो, तेंव्हा बहिणीला होणारा आनंद   बहिणीच जाणतात! (मनासारखं गिफ्ट मिळवण्यासाठी कधी कधी खूप मेहेनत देखील घ्यावी लागते बरं का! म्हणजे भावाला  मस्का वगैरे……  मारावा लागतो, काय करणार?)


नारळी पौर्णिमेला साखरभात करतात, पण  ह्या वर्षी  मी खुरचंदवडी केली होती.

'खुरचंद वडी'  ही नाशिकची स्पेशालिटी आहे.
त्यासाठी २५० ग्रॅम खवा, ६० ग्रॅम बेसन, ६० ग्रॅम बारीक रवा,वेगळे वेगळे भाजून घ्यावे, आणि मग एकत्र करावे. एकीकडे २५० ग्रॅम साखरेचा घट्ट म्हणजे २ तारी पाक करून,लगेच खव्यात ओतावा, आणि हे मिश्रण थोडा वेळ सतत ढवळत राहावे. घट्ट होत आले  की वेलची पूड घालावी. कडेने सुटायला सुरुवात झाली की  मग pan खाली उतरवून,घोटत राहावे, आणि गोळा झाला की तूप लावलेल्या थाळीत थापून द्यावे. हवे असल्यास  ह्या वडीत चारोळ्या,ड्राय फ्रुट चे तुकडे,घालता येतात.
नारळ घालायचा असल्यास,१ वाटी नारळाचा चव तसाच खवा,बेसन,आणि रव्याच्या मिश्रणात घालावा. पण मग ही वडी जास्त दिवस टिकत नाही हे लक्षात ठेवावे.


 वड्या  करायच्या म्हणजे मिश्रण शेवटी शेवटी घोटावे लागते, त्यासाठी फारच कष्ट असतात, म्हणजे हात  भरून येतात अगदी! पण मनासारख्या  वड्या  झाल्या, की  मग जो आनंद होतो, त्याची तुलना मनपसंत गिफ्ट मिळाल्या नंतर होणाऱ्या  आनंदाशी होऊ शकते!  

  


Tuesday, 20 August 2013

MOOD AANI AAHARACHA SAMBANDH

 आपण अनेक सभा समारंभात जातो, तिथल्या कार्यक्रमात सहभागी होतो , संगीत, नाट्य, परिसंवाद, भाषणे, विविध कला दर्शन, इत्यादींचा मनमुराद आनंद घेतो, कधी लग्न, मुंज, वाढदिवस  इत्यादी घरगुती किंवा सामाजिक कार्यात शुभेच्छा देण्यासाठी जातो, तिथे भोजनाची व्यवस्था असते,आपण यथेच्छ जेवतो , आणि तिथून निघतो.

अशा  वेळी बरेचसे अन्न वाया गेल्याचे विदारक दृश्य   आपल्याला दिसते. समर्थांनी म्हटलेले आहेच….

'आपण यथेष्ट जेवणे।  उरले ते  अन्न वाटणे।
परंतु वाया दवडणे।    हा धर्म नव्हे । ।'


असो, आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा परिणाम आपल्या आहारावर . अनेक  आपल्या मूड प्रमाणे वागत असतो. म्हणजे कधी रागात असलो, रागावतो, कधी आनंदात असलो,तर सगळ्यांशी जरा जास्तच गोडीनं आणि आनंदात बोलतो. कधी संकटात असू, किंवा प्रॉब्लेम असेल, तर ते टेन्शन आपल्या चेहऱ्यावर लगेच दिसून येते, आणि मग समोरच्याशी धडपणाने आपण बोलत नाही, किंवा कधी कधी वडाचं तेल वांग्यावर निघतं! मूडचा परिणाम आपल्या  तर होतोच,पण आपल्या आहारावर पण होतो.

 आपण चार लोकात असलो,आणि  मंडळी आपल्या आवडीची  असली,मित्र परिवार  असेल, नातलग असतील आणि  त्यांची कंपनी आपल्याला आवडत असेल,तर अशा ठिकाणी प्रसन्न मनःस्थितीत आपल्याला चार घास जास्तच जातात, हो ना? हेच जर आपण एकटच  बसून  खायची वेळ आली, तर पाहिलं तर  मूडच रहात नाही, आणि मग कमीच  खाल्लं  जातं.  शिवाय मूड पण चांगला रहात नाही. म्हणजेच मूडचा  परिणाम शारीरिक,मानसिक,भावनिक अशा सर्व पातळींवर होतो.  तेंव्हा जास्त मूडी बनू नये, ह्यातच आपलं हीत आहे हे लक्षात   घ्यायला हवं.


ज्यांना नेहमीच एकट खावं लागतं ना,त्यांना तर असं मूडी बनून चालणारच नाही, कारण ते अतिशय घातक आहे. असे लोक जर मूडी असतील, तर त्यांनी स्वतःची मानसिकता त्वरित बदलायचा प्रयत्न करायला हवा. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते कि, अशा व्यक्तीने जे काही अन्न त्याच्याकडे असेल,ते अन्न ताटात नीट   वाढून घ्यावे, एकदा अन्नाला नमस्कार करावा, आणि लक्ष जेवणात ठेवून, एकाग्र चित्ताने जेवावे. आणि आपल्या समोर आपली आवडती व्यक्तीच बसली आहे अशी कल्पना केली तर जेवण केंव्हाच होतं! जेवण तर    पोटभर होतंच , मन देखील तृप्त होतं! अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे महत्व कशाला द्यायचं? जेवण जेवण्याला,  की कुणा बरोबर जेवतोय ह्याला, की जेवणात काय काय पदार्थ आहेत ह्याला, हे एकदा ठरवलं, की पुढच काम सोप होतं.  अर्थात, आपल्या जेवणालाच  महत्व द्यायला शिकलं पाहिजे.

सांज्याची पोळी आणि वर साजूक तूप! वाह!वाह!

 
काल सांज्याची पोळी केली होती, मस्त झाली होती! कित्ती तरी पोळ्या करून खाल्ल्या कालपासून, अगदी तूप लावून खरपूस भाजून, पण मन काही भरत नाहीये अजून! पेट भर गया, पर मन नहीं भरा! माझी  तर बहुतेक वेळा अशीच अवस्था असते!(खरच आहे,खोटं नाही सांगत!)































   

   

Friday, 16 August 2013

FREEDOM IS STRENGTH

FREEDOM  IS NOT FOR FREE
झंडा ऊन्चा  रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा!

 मागे एकदा आमच्या आर्मीच्या लेडीज क्लब मध्ये १५ ओगस्ट ला एक गेम ठेवला होता _ flagखाली  प्रत्येकाने एक slogan लिहायचा. मी लिहिलं होतं, 'freedom is not for free' (जे दीपक चोप्रांच्या प्रसिद्ध  पुस्तकाचे  नाव आहे. ) मला first prize मिळालं होतं.

मी ह्या ब्लोग मध्ये बेसिकली फूड आणि लाइफ़ बद्दल लिहिते,त्यामुळे आज मला आपला आहार, आपले  जीवन, आणि आपले  स्वातंत्र्य ह्या तिन्हीची सांगड घालीत काही लिहायचे आहे. In the context of food, Freedom  does not mean  eating whatever you want to eat, but it   is the STRENGTH  to understand what food is right for YOU! This strength needs to be garnered over a period of time, it needs to be cultivated, through perseverance and understanding of our body, age, needs, and other aspects of health and life .Once you have the strength to judge yourself, you will experience the real freedom from  unnecessary cravings, and restrictions! Then you will experience BLISS AND CONTENTMENT!

काही काही लोकं म्हणतात,  'न खाता मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं.  It is simply depressing to hear such statements. Is life so cheap? is it for free? No, life is neither cheap nor is it for free. हा दृष्टीकोन शारीरिक,मानसिक,आणि भावनिक आरोग्या साठी मारक आहे. कारण, मुळात अन्न, हा जगण्याचा,  आपल्या  जीवनाचा  मूलभूत आधार आहे. 'Eat to live' किंवा 'live to eat'  हे दोन्ही दृष्टीकोन टोकाचे भूमिका घेणारे आहेत, असं मला तरी  वाटतं. आहाराचा सुवर्णमध्य साधण म्हणजेच, संतुलित, परिपूर्ण आयुष्याचा मार्ग सुकर आणि सुखाचा करणं! जगण्याची कला आत्मसात  करायची असेल, आणि जीवनात आनंद उपभोगायचा असेल, तर हा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे.
 
काल सर्व देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहानी साजरा झाला! मी सकाळी झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला गेले,आणि  तिरंग्याच्या,आपल्या  झेंड्याच्या रंगांमधून प्रेरणा घेऊन घरी  संध्याकाळी   तिरंगी sandwiches,


आणि रात्री जेवणात  मटर पनीर बनवले!

जर आपला आहार आणि  आपले जीवन हे अतिरेकी वासनां  पासून मुक्त असेल, तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र असू!  

            


Thursday, 15 August 2013

VASUDEV AALA HO VASUDEV AALA

पहाटेची रम्य वेळ . अल्पावधीतच सूर्योदय होतो. पाखरांचा चिवचिवाट, पाणवठ्यावर हळू हळू बायाबापड्यांची गर्दी होते,  लोकांची कामासाठी बाहेर पडायला  सुरुवात झाली आहे. मंदिरात पुजारी पुजेची करतायत, घरां  घरां मध्ये जात्याची घरघर सुरु झाली,  ओव्यांचे  सूर घुमायला लागलेत. गोठ्यात केंव्हाच जाग आलेली आहे,गाईंना आणि वासरांना!  अशी सगळी   लगबग चालू असतांनाच, वासुदेव दारात आला, की गृहिणीची घाई उडते कारण  वासुदेवाला  झोळीत दान  घालायचं असतं!


डोक्यावर मोरपिसांची टोपी, घोळदार अंगरखा, गळ्यात माळ, हातात टाळ, पायात चाळ, दुसऱ्या हातात चिपळ्या, काखेमध्ये झोळी, पायापर्यंत सोडलेला रंगीत शेला,  कमरेला खोचलेला पावा, हातातील टाळ आणि चिपळीच्या तालावर  पावले टाकीत, नाचत वासुदेव गाऊ लागतो…

रात्र संपली दिवस उगवला।  पूर्ण निशेचा नाश जाहला।।
नवतेजाने प्रफुल्ल होऊन।   लागे जग हे कार्याला।।
रामप्रहरी स्मरा विठूला।  शुद्ध मनीचा भाव।।
हेच सांगण्या आलो तुम्हासी।
वासुदेव माझे नाव।  वासुदेव माझे नाव ।।

झोळीत दान घातलं, की गिरकी घेऊन, पावा वाजवून, वासुदेव पुन्हा म्हणतो….

दान पावलं दान पावलं।
 भिमाशांकारी महादेवाला ।  कोल्हापुरात महालक्ष्मीला । ।
पंढरपूरला विठूरायाला।  जीजुरीमध्ये खंडेरायाला। । 
आळंदीमध्ये ज्ञानदेवाला। ।  देहूगावात  तुकरामला । ।
पैठणमध्ये एकनाथाला।   स्ज्ज्नगडी रामदासला। । 
दान पावलं दान पावलं सदगुरूरायाला। । 
दान पावलं दान पावलं जनताजनार्दनाला। ।
ऐसा वासुदेव बोलतो  बोल ।  ऐसा वासुदेव बोलतो  बोल । ।

दान घेताना अंग वळवत, टाळ वाजवून ठेक्यात पद्न्न्यास करीत,  गिरकी टाकुन, मधुर स्वरात वासुदेव दान स्वीकारतो,  गिरकी घेउन पावा वाजवतो, तेंव्हा आपले हे दान खरोखरीच साऱ्या देवांना पोहोचलय ह्याचा सात्विक आनंद दान  करीत असलेल्या माउलीच्या चेहरयावर उमटू लागतो!

पण, ह्या वासुदेवाचे, त्याच्या वेषभुशेचा काय अर्थ? समजुन घेतला  फार गम्मत वाटेल, वासुदेवाच्या  स्वरूपात मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. अविद्येला घालवून देऊन श्रीविद्येचा म्हणजेच मोरपिसांचा टोप डोक्यावर धारण केला आहे. पूर्ण ज्ञानरुपी  घोळदार अंगरखा घातला आहे. हातातल्या दोन चिपळ्या म्हणजे 'माया' आणि 'ब्रह्म' किंवा 'प्रकृती' आणि 'पुरुष'  ह्यांचे रूपच, तर ज्याप्रमाणे माया आणि ब्रह्म एकत्र आल्या शिवाय  विश्वाची निर्मिती नाही, तसेच दोन चिपळ्या एकत्र आल्या शिवाय नाद नाही. नादब्रह्माचा पावा तो वाजवतो आणि लोकांना भोग सोडून त्यागाचे दान मागतो! आध्यात्मिक  पातळीवर विषय_वासनांपासून मुक्त होण्याचा उपदेशही केलेला आहे. म्हणजे थोडक्यात, 'तत्वज्ञान' सोप्या भाषेत सांगणारे, वासुदेव हे सात्विक रूप आहे, आणि त्याचा हा वेशभूषेचा आविष्कार  म्हणजे आपल्या  संस्कृतीचा वारसा आहे.

(ही माहिती 'प्रबोधन यात्री संत एकनाथ' ह्या प्रोफेसर शिवाजीराव भुकेले ह्यांच्या पुस्तकातून घेतली आहे. )      
 

Wednesday, 14 August 2013

GLOBALISATION CHA POSITIVE IMPACT

एका व्यापाऱ्याला  डॉक्टरांनी सांगितले' प्लास्टिक सर्जरी करावी लागेल, ७०,००० रुपये खर्च येईल.'
व्यापारी म्हणाला, डॉक्टर, प्लास्टिक मी आणतो, तुम्ही फक्त मजुरी सांगा!'

हल्ली  म्हटलं जातं,की चंगळवाद वाढला आहे. पण त्याची कारणं बघितली पाहिजेत. ८० च्या दशकापर्यंत आपला देश   फारसा प्रगतीशील देश मानला जात नव्हता. पण ९० च्या दशकात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले,  आणि हळू हळू  इतर  देशातील वस्तू, सेवा आपल्या देशात येण्यास  सुरुवात झाली.  तेंव्हा सुरुवातीला थोडा विरोध  झाला.  पण ,त्या वस्तूंची, सेवांची आकर्षकपणे केलेली जाहिरातबाजी, त्यांच्या गुणवत्तेची दिलेली खात्री आणि त्यांच्या वापरामुळे आपली  होणारी वैयक्तिक,आर्थिक,सामाजिक,आणि देशाची प्रगती ह्यांची सुरेख गुंफण घालणारी दिलखेचक मार्केटिंग,  ह्यामुळे आता अनेक विदेशी सेवा, माल, ह्यांची  मागणी वाढली   आणि म्हणून हे सर्व आपल्याकडे सहज उपलब्ध झाले आहेत.

एकीकडे   सरकारी यंत्रणेतील अटी शिथील  करीत, आणि अडथळे दूर करीत, हळू हळू दुसरीकडे   customer base बनवत बनवत,  अनेक विदेशी  दुकानदारांनी आपले बस्तान आपल्या देशात   बसवले , आणि ह्या जागतिकीकरणाचे पडसाद आपल्या जनतेवर पडायला लागले. हळू हळू चंगळवादाकडून भोगवादा कडे आपला प्रवास सुरु झाला आहे म्हणायला हरकत नाही!  चंगळवाद आणि भोगवाद  ह्यात सूक्ष्म फरक आहे, तो ओळखता पाहिजे. आपल्या आवाक्यात असलेल्या वस्तूंचा,सेवांचा, मजेत,आनंदात,पण शिस्तीत घेतलेला आस्वाद म्हणजे  चंगळ. परंतु, आपल्या शक्ती पलीकडे, आसक्तीच्या आहारी जाऊन केलेली चंगळ म्हणजे भोगवाद. आणि आसक्तीच्या सीमारेषा ओलांडून,कुणाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली  करून ,सक्तीने घेतलेला हा  भोग पराकोटीला गेला, की मग अराजक सुरु होते, ज्याच्या पाऊलखुणा दिसायला
केंव्हाच सुरुवात झालेली आहे.

सर्व क्षेत्रात जागतिक दर्जाची सेवा पुरवण्याचा चंग बांधलेल्या, आणि त्यातून मिळणाऱ्या प्रचंड फायद्यावर लक्ष केंद्रित केलेल्या देशांकडून, खाद्य पदार्थां पासून अवकाशयाना पर्यंत सर्व वस्तू, दळणवळणाच्या  नवीन साधनां पासून संरक्षण क्षेत्रातल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रां पर्यंत सर्व काही मिळणे सोप्पे आणि कमी गुंतागुंतीचे झाले आहे.

त्यामुळेच की काय,पैसा अमाप झाला आहे,आणि  म्हणून, कुठेही जा, काहीही खा, काहीही विकत घ्या, असा विचार बळावतो  आहे. 'किती झाले?'असे विचारायचे,आणि लगेच payment करायचे! ते पण hard cash ची जरूर नाही, प्लास्टिक मनी आहे ना! मग काय? दे दना  दन खर्च करायचा!

८०च्या दशकापर्यंत कर्ज घेणं कमीपणाचं मानलं  जातं होतं!पण  नंतरच्या काळात हप्ता भरून वस्तू विकत घेण्याची मुभा मिळायला लागली, आणि कर्जाबाबतचा लोकांचा दृष्टीकोनच बदलला!  वस्तूंची  विक्री वाढली, उद्योगधंदे वाढीला लागले. कर्ज हा शब्द तर आता परमावालीचा झाला आहे. आवाक्यात नसलेली वस्तू हप्त्यावर मिळते आहे? घेवून टाका! ह्यालाच भोगवाद वाढला आहे असे म्हणते.

असो, सर्व काही E M I पदार्थ  वर मिळायला लागले आहे, चांगली गोष्ट आहे. (फक्त कुटुंबातील सदस्य, मुलं, आई,वडील,बायको तेवढे E M I वर उपलब्ध नाहीत तेवढे  बरे!)

बाहेरच्या देशातल्या वस्तूंचे आकर्षण प्रचंड वाढले आहे. हल्ली अनेक  पेस्ट,मसाले,मिक्सेस,दुग्धजन्य पदार्थ,  मांसाहरी पदार्थ, वेगवेगळ्या स्वरूपात,पाकीटबंद,  सीलबंद पद्धतीने मिळत आहेत, त्यामुळे स्वयंपाक करणे अत्यंत सोप्पे झाले आहे . शिवाय वेगवेगळे   cuisines  try करता येतात.

आता पास्ताच घ्या ना! दूध उकळून,त्यात चीज किसून घालायचं, घट्ट झालं म्हणजे सॉस तयार ! मीठ,मिरेपूड, herbs,  paprika, पास्ता सॉस, आणि उकडलेला पास्ता घालायचा.  वरून parsley, घालून बेक करा, किंवा नुसते खा!

हव तर ह्याच  उकडलेल्या पास्ता मध्ये उकडलेल्या मिक्स भाज्या,आणि  white sauce घालून बेक करून खा.   थाय स्वीट  चिल्ली सॉस घालून सर्व्ह करा. आणखीन लज्जत वाढते!

white sauce मध्ये मीठ,मिरेपूड, उकडलेल्या मिक्स भाज्या, , tomato sauce घालून रशियन सलाड तयार करावे. गार्लिक ब्रेड बरोबर सर्व्ह करावे. ही डिश  आर्मी सर्कल्स मध्ये रशियन सलाड ह्या नावाने खूप फेमस आहे .
आपण देखील ह्या मुबलकतेचा, सोयीसुविधांचा भरपूर लाभ घेतला पाहिजे, नाही का ?       

Monday, 12 August 2013

MANGALAGAURICHE MANGAL VRAT

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते!

उद्या अनेक नवविवाहित मुलींची मंगळागौरपूजा, जागर!  आणि त्या निमित्ताने , तिच्या माहेरी मैत्रिणींचा , सुवासिनींचा  मस्तपैकी घोळका जमणार! मग पूजा,आरती, जागर, खेळ,एकमेकींची थट्टा मस्करी,सुग्रास भोजन, नुसती धमाल!

मंगळागौरी ही पार्वती आहे,शिवाची शक्ती आहे, सौभाग्यलक्ष्मी आहे, आदिशक्ती आहे. आपल्याला  सर्व सुखे देणाऱ्या पतीचे कल्याण व्हावे, आयुष्य,आरोग्य,आणि ऐश्वर्य संपन्न व्हावे, तसेच माहेर आणि सासरचे पण  कल्याण व्हावे  ह्या हेतूने मुली हे व्रत ५ वर्ष भक्तिभावाने करतात

मंगळागौरीची एक कथा अशी पण आहे…।

उज्जैनीत एक वैश्य,त्याच्या बायको बरोबर राहत होता. त्याला पुत्र नव्हता,त्यामुळे ते  दुःखी होते. एका साधू  बाबांच्या सांगण्यावरून वैश्याने   देवीची आराधना केली.  देवीने विचारले, तुला दीर्घायुषी पुत्र हवा  असेल,तर तो जन्मांध होईल, आणि अल्पायुषी पुत्र   विद्वान असेल,तर तुझी इच्छा सांग. वैश्याने अल्पायुषी पुत्र मागितला, त्याप्रमाणे त्यास पुत्रप्राप्ती झाली.  पण साधूने  सांगितले होते की, तो काशीला जाऊन आल्याशिवाय  त्याचे  लग्न करू नका.

तेंव्हा त्याच्या मामा बरोबर त्याला काशीला पाठवण्यात आले. वाटेत  एका ठिकाणी मुक्काम  केला असता,त्या मामा_भाच्याला एका लग्नाला बोलावणे आले. मंडपात एक मुलगी तिच्या भांडणाऱ्या मैत्रिणींना सांगत होती, 'माझी आणि माझ्या आईची मंगळागौरीवर अपार श्रद्धा आहे,तेंव्हा माझे कधीच वाईट होणार नाही.' ह्या गुणी मुलीचेच लग्न होते,आणि नवरा मुलगा पळून गेला म्हणून लग्न थांबले! पण लग्न तर त्याच  मांडवात व्हायला हवे! मग योग्य वराचा शोध सुरु झाला, आणि हा मुलगा तिला पसंत   पडला, लग्न ही झाले!मामाला भाच्याचे अल्पायुषी असण्याचे गुपित माहित होते,त्यामुळे अशी श्रद्धाळू मुलगी  नक्कीच त्याचं  कल्याण करेल, असे त्याला वाटले,आणि तो  खुश झाला.

 नवरा बायको रात्री गौरीहरा जवळ झोपले होते. नवऱ्याला भूक लागली म्हणून तिने त्याला  लाडू दिले आणि ताट भेट म्हणून ठेवायला सांगितले. झोपेत, मुलीच्या स्वप्नात देवी आली आणि म्हणाली, 'तुझ्या  नवऱ्याला एक साप  दंश करायला आत्ता येईल, तेंव्हा नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू त्या सपासाठी चांदीच्या वाटीत  दूध ठेव, आणि एक कऱ्हा रिकामा  ठेव. तो साप दूध पिउन, क्ऱ्ह्यात जाऊन बसेल. तू तो कऱ्हा तुझ्या चोळीने बंद कर आणि तुझ्या आईला दे. त्याप्रमाणे झाले, आणि आईला दिलेला कऱ्हा उघडून बघितला असता,त्यात सोन्याचा हार निघाला! आई  खुश झाली.सकाळी नवरा काशीला जाण्यास निघाला. जाताना त्याने बायकोला अंगठी भेट दिली.

काशीला गेल्यावर मुलगा खूप शिकला,पंडित झाला. पण मध्ये पाच वर्ष गेली,त्यामुळे मुलीचे आई वडील चिंता करीत होते. मुलगी म्हणाली, 'मी पाच वर्ष मनोभावे मंगळागौरीचे पूजन केले आहे, तेंव्हा माझे पती नक्की परत येतील, तुम्ही काळजी करू नका.'

इकडे मामा भाच्चे काशीत होते,आणि पाच वर्ष पूर्ण होत आली होती.  एके रात्री मुलाला  स्वप्नात दिसले, की त्याचा जीव घ्यायला यमदूत आले असता, देवीने त्या यमदूताचा वध केला आणि त्याचे प्राण वाचवले. हे मामला सांगितले असता,मामा बोलले,ही तुझ्या बायकोच्या मंगळागौरीवरच्या अपार श्रद्धेचेच फळ  आहे! आता आपण घरी जाऊ. ते मुलीच्या घरी परत आले.

त्या वेळी, मुलीच्या घरी मंगळागौरीचे पूजेचे उद्यापन सुरु होते. त्या दोघांनी मुलीची,आई वडलांची भेट घेतली,मुलीला ताट  दाखवले,तिने अंगठी दाखवली,ओळख पटली! सगळे खुश झाले! आणि पाहुणचार घेऊन तिघे उज्जैनीला परत निघाले.

उज्जैनीला आल्यावर मुलाचे आई वडील दोघांना पाहून खुश झाले! तेंव्हा तेच साधू महाराज तिथे आले,आणि सर्व पाहून आनंदित झाले. त्यांना मुलाच्या आईने भिक्षा घातली . ह्याच साधू बाबांनी, काही  वर्षापूर्वी , ती निपुत्रिक म्हणून तिच्या कडून भिक्षा घेण नाकारलं होत! पण त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती.साधू बाबांनी सर्वांना आशीर्वाद दिला, आणि त्यानंतर  दोघे सुखाने नांदू लागले!    

मंगळागौरी आपल्या सर्वांना प्रसन्न व्हावी म्हणून हे व्रत! व्रताचे उद्यापन ५ वर्षांनी करतात,त्या वेळी आईला सोन्याच्या नागाची प्रतिमा,साडी_चोळी, वायन दिले जाते,  वडिलांचा पण आदर सत्कार केला जातो, आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.




Sunday, 11 August 2013

DUNIYA GOL HAI

एका महिलेने आधुनिक ड्रेसेस  खरेदी केले ,आणि नवऱ्याला  दाखवीत विचारले 'आवडली का खरेदी?' नवरा म्हणाला, 'आवडली,पण किती पैसे खर्च केलेस?' तर बायको म्हणाली , ' फक्त ५ लाख.'  नवरा उडालाच! '५ लाख?  एवढे जास्त?'

हं, थोडेसे पैसे खर्च केले तर एवढा राग आला? इतर वेळेस तर ऐटीत म्हणता कि 'तुझ्यासाठी मी जीव पण देऊ शकतो!'

नवरा म्हणाला, 'अगं, मग जीव घे ना!   कपड्यांपेक्षा तर  स्वस्तच आहे माझा जीव!'

हा! हा! हा!

पण खर सांगायचं तर आजकाल परत ethnic किंवा traditional  चा जमाना आला आहे. मध्यंतरीच्या काळात western wear was 'IN' and anything  traditional was an absolute 'NO NO' Now, the world seems to have come full circle, with the west following the east in everything from food to yoga!   कहते हैं ना 'दुनिया गोल है!'

भाजी बाजारात गेलं, की भाजीवाले सांगतात,ताई, भेंडी गावठी आहे,गवारी  गावठी आहे! म्हणजे गावठीला इतकी   नावं ठेवली जायची, आता त्याच गावठीला पुरस्कृत करीत आहेत. अरे हो,organic चं अजून एक फॅड!

फॅड  अशासाठी की,पूर्वी पासून आपल्याकडे शेती प्रधान  असल्यामुळे, शेती organic पद्धतीनेच होत होती. पण मागणी वाढली,आणि म्हणून मग केमिकल्स चा वापर करून उत्पादन वाढवण्यात येऊ लागले, आणि तेंव्हा पासून सत्व गेलेलं अन्न खाऊन अनेक रोगांना आमंत्रण मिळायला सुरुवात झाली.  मग पुन्हा केमिकल्स विरहित शेती म्हणजे organic farming च प्रस्त आलं. organic फार्मिंग अगदी अल्प प्रमाणात व्हायला     लागलं, मग काय,मागणी जास्त,आणि उत्पादन कमी म्हणून organic उत्पादनांना किंमत जास्त! म्हणजे गम्मत बघा हां, केमिकल वाला माल स्वस्त   आणि organic  महाग!  what an irony! मग आपले शेतकरी पूर्वी काय करीत होते ? असो ,म्हटल नां, दुनिया गोल आहे!

आता नव्याने उत्सव, सणवार, अगदी पारंपारिक पद्धतीनं साजरे करायची जणू चढाओढच लागली आहे.आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या मुली,जुन्या चालीरीतींना फाटा देऊन आधुनिकतेचा बाज लेऊन धन्यता मानणाऱ्या महिला ,परंपरा,रूढी अगदी  शोधून शोधून काढतायत, आणि त्या पाळण्याची एक नवीन fashion येऊ पाहते आहे! चांगली  गोष्ट आहे! कारण , त्या निमित्ताने का होईना, घरातल्या जुन्या जाणत्या, वडीलधारी मंडळींना त्या परंपरा,रिती रिवाज विचारले जातायत, त्यांचा सल्ला, आणि मार्गदर्शन घेतलं  जातय! आणि ह्या निमित्ताने का होईना, lets hope and   pray that they will be cared for, and looked after well  in their twilight years, in their own homes, and will not be left to the mercy of the old age homes!

असो, मिळणाऱ्या ताज्या भाज्या, फळं, ह्यांना कडधान्य,डाळी, तांदूळ,ज्वारी,बाजरी ह्या सारख्या धान्यांची जोड देऊन, जास्तीत जास्त सकस आणि पोषक अन्नपदार्थ तयार करणं क्रमप्राप्तच आहे!

microwave मधल्या सुरळीच्या वड्या

अशीच एक पारंपारिक डिश म्हणजे सुरळीच्या वड्या. आजकाल microwave मुळे  काम अगदी सोप्प झालं   आहे.

दालपकवान

कालच एक पारंपारिक डिश केली होती 'दाल पकवान'.  फक्त कडक पुऱ्या घरी करायच्या ऐवजी बाजारातून आणल्या.
तेंव्हा आधुनिकते मधून प्रगती  असतांना आपल्या परंपरेची कास सोडणार नाही, एवढे केले तरी पुरेसे आहे!

  

Saturday, 10 August 2013

NAGPANCHAMI CHA UTSAV

नरसोबा  आणि नाग
 उद्या नागपंचमी , नागाच्या पूजेचा दिवस! मातीचा नागोबा किंवा कुंकू अथवा गंधाने नऊ नागकुळे काढून(नऊ नागांची चित्र ) त्यांची पूजा करतात. किंवा नागनरसोबाची चित्र मिळतात, त्यातल्या नागोबाची  पूजा नागपंचमीला करतात.नागोबाच्या चांदीच्या टाकाची देखील पूजा करता येते.  मान्यता आहे, की, महिला नागोबाला आपला भाऊ मानतात, आणि त्याची पूजा करून, त्याला आपल्या मुलाबाळांचे, परिवाराचे   रक्षण करण्याचे साकडे घालतात. किती सुंदर विचार आहे हा!   त्या दिवशी भाजी चिरू  नये, चुलीवर तव्यावर काही पदार्थ करू नये, आणि कोणताही पदार्थ तळू नये अशी मान्यता आहे.  ह्या दिवशीचे पक्वान्न म्हणजे  'पुरणाचे दिंड'.

 पुरणाचे दिंड करण्यासाठी ……
१)पुरण भरून कारंजी बनवावी

२)  दोन्ही  कोन  जोडावेत
पुरणपोळीसाठी करतो ते पुरण तयार करावे. पोळीची कणिक भिजवून, एक छोटी गोळी घ्यावी, त्याची  पुरी लाटून, पुरण भरावे, आणि पुरीला फोल्ड करून करंजीसारखे करावे. त्यानंतर करंजीची दोन्ही टोकं हळूच वरती   घेवून   एकावर एक  दाबून घ्यावे. (मोमो सारखा आकार होतो.) हे दिंड कुकर मध्ये उकडून तुपा बरोबर सर्व्ह करावेत.





सोबत मिक्स भाज्यांची कोशिंबीर करावी….

कोबी, काकडी, बीट, सिमला मिरची, मुळा, गाजर, टोमेटो,  पालकाची पाने, अशा सर्व कच्च्या भाज्या बारीक   घेऊन,त्यात मीठ,,मिरेपूड,लिंबूरस, आणि कोथिंबीर घालून द्यावे.







 ३)असे दिसतात दिंड
 नागोबाचे दर्शन घ्यायचे, त्याची पूजा करायची, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा, आणि आपले रक्षण करण्याची प्रार्थना करायची!  ह्या प्रथेमागे शास्त्रीय कारण दिसून येते. नागोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे घरा बाहेर पडायचे, मैत्रिनी बरोबर रानावनात जायचे! म्हणजे मग मोकळ्या हवेत,  हिरव्या वनराईत,पावसात,  झोक्यांवर झोके घेतघेत, थट्टा मस्करी करीत, खेळ खेळायचे, झिम्मा फुगडी घालायची, नागोबाचे वारूळ शोधायचे,आणि नागोबा  दिसला, की मग त्याची पूजा करायची, म्हणजे सामुहिक आनंदोत्सवच साजरा होतो जणू! आणि चुलीवर तवा ठेवायचा नाही, भाजी चिरायची नाही,  हे सर्व नियम कशासाठी ? तर थोडक्यात सासुरवाशिणींना त्या दिवशी धार्मिक सणाच्या नावाखाली थोडी मोकळीक हो! ( आजकाल अनेक लोकं  ओरडा करतात की पूर्वीच्या बायकांना मुळी मोकळीकच नव्हती!)

म्हणजे बघा हं, शारीरिक स्वास्थ्य आणि उन्नत्ती, मानसिक आनंद ,  सामाजिक बांधिलकी, आणि  धार्मिक एकात्मता , अशा सर्वच स्तरांवर माणसाचा विकास घडवणारा सण! आणि नागाला मारू नये हा महत्वाचा  पर्यावरण संरक्षण संदेश पण   होता! पण हल्ली आपण काय म्हणतो? नागोबाला कसलं  पुजता? आणि हल्ली तर गारुडी नागोबाला  पकडून आणतात, त्यांना टोपलीत ठेऊन, सगळीकडे त्यांचा खेळ मांडतात, त्यांना काठीने ढोसून ढोसून टोपलीतून  बाहेर फणा काढून उभ करतात, त्यांना उपाशी देखील ठेवतात, कारण बायकांनी दिलेलं नागोबासाठीचं  दूध ते एका भांड्यात साठवतात हे मी स्वतः बघितलेलं आहे., (ते दूध  बहुधा ही   लोकचं पीत असतील)  असे हे हाल करून कोणती पूजा सफल होईल? कोणता देव प्रसन्न होईल? भूतदया हा हिंदू  धर्माचा पायाभूत संस्कार आहे, आणि ह्या सणातून हाच  संस्कार मनी रुजवला जातो.
 ह्याच नागनरसोबाच्या चित्रातल्या ' नरसोबा'ची पूजा चार शनिवारी करतात. नरसोबा म्हणजे नृसिंह, ज्यांनी हिरण्यकश्यपू चा वध केला. ह्या हिरण्यकश्यपूने शंकराकडे वर मागितला होता,  'मला ना  मनुष्य ना देवता वध  शकतील, ना रात्री मृत्यू येईल ना   दिवसा, ना  आकाशात मृत्यू ना   जमिनीवर, न कोणत्याही शस्त्राने,वा अस्त्राने, ना घराच्या आत, ना बाहेर, मला  कुठेही,  कसाही मृत्यू  येणार नाही. '  म्हणजे थोडक्यात अमरत्वाचे वरदान मागितले. पण मग मृत्यू अटळ आहे, त्यामुळे ह्या नरसिंहाचा, म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह असा अवतार धारण करून, भगवंताने ह्या राक्षसाचा वध संध्या समयी, त्याच्या घराच्या उंबरठ्यावर, स्वतःच्या मांडीवर त्याला घेवून, नखांनी  वार करून केला, म्हणजे त्याच्या  अटी पूर्ण झाल्या,  पण  त्याचा मृत्यू  मात्र टळला नाहीच. (  आपण देवाकडे  मागणं मागतांना सावधगिरी बाळगली पाहिजे! कारण मागे वळून  पाहतांना लक्षात  येतं, की,आपण जे  मागितलं  ते तर  देवानं दिलं, पण जे   मिळालंय, त्यात थोडं  आपण न मागितलेलं  पण आहे! आणि हे न मागितलेलं जे असतं, ते नेहमीच आपल्या आवडीचं असेल असं  नाही!)    

जिवत्या
 दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करतात.  मंगळवारी पण  केली तरी चालते. हल्ली जीवत्यांचे चित्र मिळते त्यावर आई आणि लहान  बाळांचे चित्र असते. मुलाबाळांच्या सुखरुपते साठी जीवत्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे.  कसं  असत ना, आपण रोजच आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, पण हे सण आणि त्या निमित्ताने  होणारे विधी हे सांकेतिक असतात., हे लक्षात घेतलं, तर हे सणवार समजण सोपं होईल, नाहीतर उगीचच बाऊ केला जातो.

बुध आणि बृहस्पती
ह्यातल्या तिसऱ्या  चित्रात बुध आणि बृहस्पती ह्यांचे  चित्र आहे. तेंव्हा बुधाची  पूजा बुधवारी, आणि बृहस्पतीची गुरुवारी पूजा करायची.  थोडक्यात काय,प्रत्येक वारी, प्रत्येक देवाची पूजा होते!(शनिवार आणि रविवार सोडून) असो,  किती विचारपूर्वक ह्या सणांची रचना केली आहे,  हो ना?


आत्ताच माझ्या मुलीचा लहानपणीचा आवडता पदार्थ केला _ ब्रेडचा गोड उपमा! एकदम आठवण ताजी झाली! खूप आवडायची तिला हि डिश, पण आता आलेल्या नवीन पदार्थां मुळे थोडी  मागे पडली. But  many  dishes do   make me   nostalgic!

ब्रेडचा गोड उपमा
 



Friday, 9 August 2013

BRAND VALUE AANI VASTUSTHITI

एका माणसाला  हाताला लागले, म्हणून तो डॉक्टर कडे गेला. डॉक्टरांनी हात तपासला,  आणि सांगितले कि टाके घालावे लागतील.
माणूस:'किती खर्च येईल?'
डॉक्टर : 'सात  हजार रुपये.'
माणूस:  'अहो डॉक्टर,टाके घालताय कि  इम्ब्रोयडरी करताय?'

पुष्कळ वेळा आपल्याला हे जाणवत की एखाद्या  वस्तूची किंमत किंवा मिळत असलेल्या एखाद्या  सेवेचा मोबदला हा आपल्या अंदाजा पेक्षा पुष्कळच जास्त असतो. आणि हे जेंव्हा जाणवतं, तेंव्हा आपण आश्चर्य व्यक्त करतो, आणि म्हणतो 'एवढी किंमत?'

पण ह्या  किमती फक्त त्या वस्तूच्या किंवा सेवेच्या उत्तम  दर्जा साठी  नसतात,तर ,ती वस्तू /सेवा जिथे उपलब्ध होते, तिथला ambience, तिथल्या सेवेचा  दर्जा , तिथे येणाऱ्या गिऱ्हाईकांचा दर्जा आणि सर्वात  म्हत्वाचं  म्हणजे  त्या   वस्तू किंवा सेवेची brand value! 

आपण जेंव्हा आपल्या फ्रेंड्स,किंवा family  बरोबर  जातो, तेंव्हा आपण  त्यांना उत्तमच देऊ इच्छितो, मग अशा वेळी चांगल्या, standard  सेवेची अपेक्षा करतोच. पुष्कळ  वेळा लोकांना privacy आणि exclusivity साठी फार मोठी किंमत मोजावी लागते. म्हणजे brand, privacy, exclusivity, quality, ambience   does come with a price!

अशीच एक exclusive रेसिपी म्हणजे passion fruit pudding.

 passion fruit pudding

१ वाटी   बिस्कीटचा चुरा, आणि १ tbsp बटर एकत्र करून,एका बाउल मध्ये खाली दाबून बसवावे. १/२तास फ्रीज मध्ये ठेवावे. १/२ वाटी मिल्कमेड,whisk  करून light करून घ्यावे. त्यात १/२ वाटी क्रीम whisk करून light करून मिल्कमेड मध्ये मिक्स करावे. १/२ वाटी pass ion fruit चा  पल्प गाळून  मिक्स करावा,१/२ tsp   लिंबू रस घालून , आता बिस्कीटच्या वरती हे मिक्श्चर ओतावे,  थोडे passion fruit पल्प पसरावे. थंड करून सर्व्ह करावे.

but, हे तर झालं  रेसिपीज बाबत. पण रोजच्या जेवणात आपण काय खातो?  आज मी  मुगाची उसळ  केली होती,  आणि उसळ,भात,सलाड,सगळ मिक्स करून प्लेटमध्ये अरेंज केलं, आणि गरम गरम खाल्लं! इथे brand value काही नाही, पण मनास आनंद देणारं जेवण जेवतो हेच महत्वाचं!
  
माझ्या सर्व  मुस्लिम बांधवांना 'ईद मुबारक!'

Thursday, 8 August 2013

PADARTHACHYA ANTRANGACHA THAAV GHYAVA

एकदा अकबर बादशाह सकाळी झोपेंतून उठले, आणि शिपायाच्या अंगावर जोरात ओरडले,'बुलाव. '  शिपाई गडबडला, कारण बुलाव झालं, पण कुणाला ते कळलच  नाही. तो घाबरून बाहेर गेला , आणि दुसरे अधिकारी,जामदार,एवढेच काय,परंतु वझीराला देखील बोलावले, पण कुणी समोर जायचे हेच कळेना! सगळे बिरबलाकडे गेले आणि  हकीकत सांगितली. बिरबलाने शिपायाला विचारले,'महाराज झोपेतून उठले तेंव्हा नक्की काय करीत होते   सांगशील?' शिपाई म्हणाला, 'त्यांच्या डोळ्यांवरची झोप सुद्धा उडाली नव्हती, आणि जोराजोरात डोक्यावरून हात  फिरवत ओरडले बुलाव.' तेंव्हा बिरबलाने न्हाव्याला महाराजांकडे पाठवायला   सांगितले. त्याप्रमाणे न्हावी गेला आणि त्याला पाहून महाराज  खुश झाले.  त्यांनी न्हाव्याला विचारले,'तुला कुणी पाठवले?' न्हावी उत्तरला,'बिरबलाचा शिपाई बोलवायला आला होता.'  उत्तर ऐकून महाराज खुश झाले आणि हळूच हसले!( त वरून ताकभात ओळखता आला पाहिजे!)

 समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेण ही  एक कला आहे,जी फार थोड्यांना अवगत असते. आणि ज्यांना नसते, त्यांना फार अवघड जात,  हे नक्की.   ही कला मला  फारशी अवगत नाही, ह्याचा मला अनेक  वेळा    पश्चात्ताप होतो.

तसचं  काहीसं  एखाद्या पदार्थाचं होत. म्हणजे, कधी कधी आपल्याला एखादा पदार्थ बघून, किंवा नुसता खाऊन अंदाज आलेला असतो,  पण त्यातले सगळे  घटक आणि त्याची संपूर्ण कृती लक्षात आलेली नसते. आणि मग हा पदार्थ करायचाच असं जर ठरवलं, तर मग त्या पदार्थाच्या अंतरंगात जाण आवश्यक होत, नाही का? अशा वेळी  पाककलेतले आपले  ज्ञान,  कौशल्य,आणि  सोबतच आपला अनुभव पणाला लागले पाहिजे. पण सर्वात जास्त   गरज असते,  ती पदार्थ बनवण्याच्या आपल्या  तळमळीची आणि हि ओढच आपल्याला अनेक वेळा सामर्थ्य आणि सफलता देते. म्हणजेच पाककृतीच्या पण अंतरंगाचा ठाव घेण जरुरीचं  आहे, हो ना?


veg  enchiladas

पहिल्यांदा बंगलोरला एका   plush  restaurant मध्ये veg enchiladas खाल्ले, तेंव्हा मी खूप खुश झाले तो पदार्थ खाऊन! आणि घरी आले तरी त्या enchiladas ची चव माझा पिच्छा सोडत नव्हती. पण हे बनवायचे कसे हेही माहित   नव्हत . मग पुन्हा सर्व काही आठवून बघितलं, आणि मनातली पाक कृती कागदावर अवतरायला लागली. करून बघितलं , बरे झाले होते, पण समाधान झाले नाही. पण आणखीन एक दोनदा केले आणि मग छान  जमले!  mexican salsa dip आणि mexican riceबरोबर सर्व्ह करावे, म्हणजे मस्त बेत जमेल!

      













    

Wednesday, 7 August 2013


हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला!

 आज श्रावणाचा पहिला दिवस ! श्रावणाचा निसर्ग जितका रम्य,लोभस,रंगबिरंगी छटांनी  नटलेला, तितकेच श्रावणातील सणउत्सव हि रंगबिरंगी छटांनी भरलेले! पावसाचा लपंडाव चालू असतो,त्यातच सणांच्या  तयारीची लगबग चालू असते. सणवार, व्रतवैकल्य,,थोडी मजा,थोडी नाचगाणी, कडक  उपास, आणि नंतर भरपूर खाण्याचा आनंद!

शिवाय भाजीपालाम भरपूर,फळफळावळ मुबलक, मग सणाच्या निमित्ताने, उत्सवाच्या निमित्ताने काय काय कर असे होऊन जाते.आनंदाने,हर्षाने भरलेला हा महिना! म्हणतात ना,'श्रावण मासी हर्ष मानसी!'






श्रावणी सोमवारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार  शिवभक्तांना  पर्वणीच! श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक केला जातो. महिलां साठी सोमवारचे फार महत्व असते.सकाळी शंकराची मनोभावे पूजा करायची, अभिषेक करायचा, बेलपत्री व्हायची, आरती करायची,आणि मुख्य म्हणजे प्रत्येक सोमवारी वेगळ्या धान्याची शिवामूठ व्हायची. तांदूळ,जवस,मूग,तीळ, ह्यापैकी एक. संध्याकाळी आरती करून,सोमवारची कथा ऐकायची,आणि उपवास सोडायचा .

 उपवासाला सारखी सारखी खिचडी,भगर खाऊन  कंटाळा येतो.  वेळेस उपवासाची मिसळ कशी वाटते?
 उपवासाची मिसळ:

तूप गरम करून, त्यात जिर, हिरवी मिरची  ठेचा घालून, नंतर  बटाट्याचे हातानी केलेले छोटे छोटे तुकडे   घालून परतावेत. (बटाटा mash करू नये, आणि फोडीही करू नयेत.)  घालून नंतर त्यात  तिखट,मीठ,जिरेपूड,घालून रस्सा तयार करावा. नंतर डिश मध्ये बटाट्याचा चिवडा,तळलेले दाणे ,घालून, रस्सा ओतावा. वरून कोथिंबीर, चिप्स चे तुकडे,काजू,, बेदाणे,मनुके,हिरवी मिरचीचा ठेचा, आणि लिंबाचा रस  घालून द्यावे.सोबत राजगिरा भाकरी, काकडीची कोशिंबीर,दह्यातली  भाजलेली हिरवी मिरची आणि दाण्याचे लाडू   द्यावेत.

श्रावणात बऱ्याच वेळा सात्विक अन्न खाल्ल  जात, त्यामुळे आपली प्रकृती पण सात्विक राहते,कोणतीही विकृती जवळ येत नाही, त्यामुळे मन प्रसन्न आणि धार्मिक विचारांनी भरलेले राहते.

सण , उत्सव,मजा आत्ता  तर कुठे सुरुवात आहे!       

Tuesday, 6 August 2013

PADARTHACHA AATMA GAVASNE......

न पीनेका शौक था,न पिलानेका शौक़  था।
हमें तो सिर्फ़ नजरें मिलानेका शौक़ था।
लेकिन नजरें मिला बैठे उन्हींसे,
जिन्हें नजरोंसे पिलानेका शौक़ था।

कधी कधी एखादा पदार्थ  करायला जातो, तो बिघडतो!  म्हणजे करायला जातो एक पदार्थ,आणि बनतो   दुसराच! कधी कधी तो नवा पदार्थ योजलेल्या पदार्था पेक्षा जास्त चांगला  झालेला असतो!

अंबाडीच्या भाजीच्या वड्या

 कालच मी एका शोवर अळूवड्या प्रमाणेच अंबाडीच्या वड्या केलेल्या पाहिल्या. त्यातच माझ्याकडे अंबाडीची शिजवलेली भाजी फ्रीज मध्ये  होती,ज्याची मी फोडणी करून परतून भाजी  करणार होते,.  त्या रेसिपीत अंबाडीची पानं सांगितली होती. तरी मी ह्या वड्या करून  बघितल्या, आणि छान  झाल्या की!

 पूर्वी मला रव्याचे लाडू नीट येत नव्हते.  कधी पाक जास्त घट्ट, कि मग लाडू हातोड्याने तोडायची वेळ! आणि कधी पाक पातळ झाला तर लाडू वळले जात नसत, आणि लाडूचा चुरा वाटीत घेऊन चमच्याने खायची वेळ! पण मग ठरवलं,कि येत नाही म्हणजे काय?  आणि होता  होता एक दिवशी लाडवाचा पाक exact एकतारी झाला,आणि लाडू मस्त वळले आणि तितक्याच पटकन संपले पण!  नंतर मात्र  लाडू बिघडले नाहीत! मी ह्या सर्व प्रक्रियेला 'पदार्थाचा आत्मा गवसणे' असंच मानते. प्रत्येक वेळी असा पदार्थाचा आत्मा गवसतोच असं  नाही, पण प्रयत्न करीत रहायला हवेत.

खरतर, कुठल्याही  कामाचा 'आत्मा' गवसण हेच  त्या कामातील आपल्या यशाच गमक असत. पूर्वी उकडीचे मोदक जमत नसत, आणि जेंव्हा त्यां उकड करण्याचा 'आत्मा'गवसला, तेंव्हा उकड  चांगली झाली!  तोपर्यंत उकडीचे मोदक म्हणजे टेन्शन होते.

थोडक्यात काय, भरमसाठ रेसिपीची पुस्तकं नुसती   असून चालत नाही, ती नुसती वाचून भागत नाही, शोज बघून   उपयोग नाही, जोपर्यंत आपण त्या  रेसिपी मध्ये स्वतःला शोधत  नाही, तिला गवसणी घालत नाही, तोवर ती आपल्याला वश  नाही.

उद्या पासून श्रावण महिना सुरु होतो आहे. श्रावणाची तयारी करायला हवी, नाही का?                 

Monday, 5 August 2013

SHITAAVARUN BHATAACHI PARIKSHA

 समर्थ म्हणतात ….
"येक शीत चांचपावे ' म्हणिजे वर्म पडे ठावे'
तैसे थोडे अनुभवे ' बहुत जाणावे"

आपण  म्हणतो की शितावारून भाताची परीक्षा होते,  ह्या  ओवीत तेच  सांगितले आहे.थोड्या अनुभवाने   देखील बरेच कही जाणता येते. स्वयंपाकाचे पण हेच मर्म आहे. तुम्ही किती जास्त घटक पदार्थ वापरले,किती महागडे घटक घातलेत,किंवा किती exotic म्हणतो तसे घटक वापरलेत, ह्यापेक्षा, तुम्ही आहे त्या सामग्रीमधून,कोणता  पदार्थ बनवता आणि तो किती रुचकर,स्वादिष्ट,आणि सर्वात म्हत्वाच किती पोषक बनवता ह्याला महत्व आहे !

माणूस आधी डोळ्यांनी खातो,मग तोंडानी! असं  म्हणतात ते  खर आहे. डोळ्यातून तो आस्वाद मनात शिरतो, आणि मनाला भावला, तर मग खाऊन आस्वाद घेतला जातो.  त्यामुळे,कितीही कमी पदार्थ असले,तरी प्लेट मध्ये वाढताना  त्यांची रचना नेत्र सुखद हवी, आणि अनेक स्वाद त्यातून मिळायला हवेत.

म्हणजे तिखट_गोड , असा combo असावा. किंवा पदार्थांची रंगसंगती साधावी, म्हणजे लाल रस्सा आणि हिरवी किंवा रंगीत कोशिंबीर. पदार्थांचा  आकार देखील एकमेकांना पूरक असावा, म्हणजे चौकोनी शंकरपाळे आणि गोल लाडू, किंवा प्लेट मध्ये   पसरलेला चिवडा  आणि गुलाबजाम किंवा बर्फी. त्यामुळे होत काय कि साधीशीच डीश, पण appealing ,tempting,वाटते, आणि स्वादिष्ट असेल तर लगेच गट्टम होतेच! आणि स्वाद जरी उन्नीस बीस असला तरी आपण घातलेली माया दिसते आणि पदार्थ पटकन खाल्ले जातात, हा माझा अनुभव आहे ,तसाच  अनेकांचा असणारच !


सांज्याची पोळी,अळूची भाजी !

काल सांज्याची पोळी केली होती, सोबत अळूच फदफद (हा अळूच्या भाजी साठीचा खास  नाशिकचा शब्द!), काकडीची कोशिंबीर, वरणभात (तो तर हवाच!), छान बेत जमला होता. कसं  आहे,आपण कितीही पंचपक्वान्न बनवली ,तरी,  जोपर्यंत पानात वरणभाताची मूद पडत नाही तोपर्यंत पान पूर्णच वाटत नाही!असो.

सांज्याची पोळी अगदी सोपी आहे करायला.  म्हणजे पुरणपोळी करायला  वेळ नसेल किंवा करून कंटाळा आला तर हि पोळी अगदी पटकन होते. साखर घालून रव्याचा करतो तो   ' शिरा', आणि गूळ घालून करतो तो 'सांजा'.

सांज्याची पोळी:

१ वाटी रवा  २ tbsp तुपावर चांगला लालसर  भाजून घ्यावा. १ ते १ १/ ३ वाटी गूळ १ वाटी पाण्यात विरघळून घ्यावा, आणि  रवा गरम असतानाच हे गरम पाणी हळू हळू  ओतावं, लागले तर थोडे आणखीन  पाणी घालावे, आणि शिरा बनवून घ्यावा. स्वादा साठी वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी. हा शिरा कोरडाच  राहिला पाहिजे.

आता साधी पोळीची कणिक मळून , त्याची छोटी गोळी घ्यावी, त्याची चपटी पुरी करावी,थोडं  तूप लावून,कणिक भुरभुरावी. त्यानंतर सांजा  भरून, उंडा बंद करून, थोडा आटा लावीत, हळूहळू पातळ पोळी लाटावी, आणि तूप किंवा तेल न घालता भाजून घ्यावी. वाढताना पुन्हा गरम करून तूप घालून खरपूस भाजावी.(ह्या पोळ्या करून ठेवता येतात, आणि प्रवासाला पण न्यायला सोयीच्या आहेत.



     

Saturday, 3 August 2013

What is a race? A real race is when you try to finish off the panipuri in your plate ,before the  panipuri boy puts the next one into your plate!

हा जोक होता, पण   वस्तूस्थिती काही ह्याहून वेगळी नाही, ह्यावर अनेक मंडळी सहमत होतील. मी  हा जोक  ऐकला, खूप हसू आलं, आणि म्हटल सगळ्यांना सांगावा. आणि कसं  आहे,पाणीपुरी टेस्टी असेल तर,हि रेस पण टेस्टी होते, नाही?

५_६मित्र मैत्रिणी  एकत्र कोंडाळ करून पाणीपुरी खात असतात तेंव्हा,अगदी चांगले मित्र सुद्धा, पुढची पुरी आपल्या प्लेट मध्ये पडावी म्हणून, एकमेकांचे  शत्रू बनू शकतात,नाही? just  joking yaar!


मला तर ६  पुऱ्या केंव्हा  गट्टम केल्या ते  समजतच नाही, आणि वर  शंका येते कि  भैयानी एखादी पुरी कमी तर नाही दिली? इतक्या पटकन ६ कशा संपतील? आणि वेड्या आशेने भैया कडे बघावं, तर तो लगेच दुसरीकडे पुरी देण्यात बिझी झालेला असतो! (ह्याला कसं समजत आपल्या ६ पुरी पूर्ण झाल्या ते?) असो, बिचारी मी! 

बऱ्याच जणांना असं वाटत असावं, नाही?

जालमुरी पण असाच  चमचमीत पदार्थ आहे. 'जाल' म्हणजे तिखट आणि 'मुरी' म्हणजे मुरमुरे 


चुरमुरे,जाड शेव,तळलेली चणाडाळ, भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे,बारीक चिरलेले कांदा,टोमेटो,काकडी, चिंच चटणी,आलं, हिरवी मिरची,मीठ, चाट मसाला,गरम मसाला,कोथिंबीर, तुकडे,लिंबू  रस, आणि थोडे मोहरीचे तेल.हे सर्व साहित्य एकत्र  करून,  कोन, किंवा बटाटा बास्केट मध्ये द्यावे.

महाराष्ट्रात चौपाटी पोहे प्रकार फार आवडतो.अतिशय  चटपटीत, रुचकर आणि पावसाळ्यात एकीकडे पाउस बघत खायला मस्त डीश!


जाड पोहे तळून घ्यावेत. त्यात फरसाण,शेव,तळलेले शेंगदाणे,टोमेटो,कांदा, वाफवलेले कडधान्य, कोथिंबीर,चिंच चटणी,हिरवी चटणी,,लाल चटणी, मीठ घालून,आणि लिंबू रस पिळून लगेच सर्व्ह करावेत.

आज पावसाने  थोडी विश्रांती घेतली,आणि  ऊन पडलेलं  बघून आनंद वाटत आहे! पण अजून पावसाळा संपलेला नाही, त्यामुळे बऱ्याच खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा राहिला आहे!  


                 

Friday, 2 August 2013

VEDH SHRAVANACHE!

 आतां दोन चार दिवसातच श्रावण आणि   अनेकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा चातुर्मास सुरु होतो आहे . सणवार, व्रतवैकल्य,पूजा,नेम, कुलधर्म, पंचपक्वान्ने, नैवेद्य, उपास तपास, आणि अर्थात ह्यातून मिळणारा आनंद आणि मनःशांती!

पण चातुर्मास सुरु होण्या आधी काही मंडळी एकदा नॉनव्हेज खाऊन  घेतात. चिकन, मटन,अंडी ह्या सर्वां पासून बनणारे पदार्थ   खाऊन घेण्याचे थोडेच दिवस उरलेत.

तंदुरी चिकन बरोबर एक dip फार छान ,टेस्टी लागत, करून बघा ….

बटाटे उकडून किसून घ्या,  smooth पेस्ट तयार होईल. त्यात बटर,थोडं  क्रीम,किसलेलं चीज,मीठ,मिरेपूड,  मिरची बारीक तुकडे किंवा paprika powder, पार्स्ले घालून नीट मिक्स करून घ्यावे.


बटर चिकन किंवा ग्रेव्ही वाली चिकन बनवायला वेळ नसेल, तर पंजाबी चिकन मसाला चे रेडी टू कुकचे packet  आणून ग्रेव्ही तयार करावी,आणि त्यात मार्केट मधले रेडी तंदुरी चिकन आणून त्याचे तुकडे करून घालावेत आणि सर्व्ह करावे झटपट चिकन! किंवा व्हेज  कोल्हापुरी चे packet आणावे, करी तयार करावी आणि त्यात तंदुरी चिकन चे तुकडे टाकून सर्व्ह करावे कोल्हापुरी चिकन! मी   प्रकार करून पहिले आहेत, छान ,टेस्टी लागतात.

microwave मध्ये( कांदा_टोमेटो_आलं लसूण )ची पेस्ट शिजवली, तर  अगदी काही मिनिटात शिजते, आणि फक्तं तंदुरी   चिकनचे तुकडे टाकायचे, कि चिकन तयार!

आता वेध लागलेत ते  श्रावणाचे!