एकदा अकबर बादशाह सकाळी झोपेंतून उठले, आणि शिपायाच्या अंगावर जोरात ओरडले,'बुलाव. ' शिपाई गडबडला, कारण बुलाव झालं, पण कुणाला ते कळलच नाही. तो घाबरून बाहेर गेला , आणि दुसरे अधिकारी,जामदार,एवढेच काय,परंतु वझीराला देखील बोलावले, पण कुणी समोर जायचे हेच कळेना! सगळे बिरबलाकडे गेले आणि हकीकत सांगितली. बिरबलाने शिपायाला विचारले,'महाराज झोपेतून उठले तेंव्हा नक्की काय करीत होते सांगशील?' शिपाई म्हणाला, 'त्यांच्या डोळ्यांवरची झोप सुद्धा उडाली नव्हती, आणि जोराजोरात डोक्यावरून हात फिरवत ओरडले बुलाव.' तेंव्हा बिरबलाने न्हाव्याला महाराजांकडे पाठवायला सांगितले. त्याप्रमाणे न्हावी गेला आणि त्याला पाहून महाराज खुश झाले. त्यांनी न्हाव्याला विचारले,'तुला कुणी पाठवले?' न्हावी उत्तरला,'बिरबलाचा शिपाई बोलवायला आला होता.' उत्तर ऐकून महाराज खुश झाले आणि हळूच हसले!( त वरून ताकभात ओळखता आला पाहिजे!)
समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेण ही एक कला आहे,जी फार थोड्यांना अवगत असते. आणि ज्यांना नसते, त्यांना फार अवघड जात, हे नक्की. ही कला मला फारशी अवगत नाही, ह्याचा मला अनेक वेळा पश्चात्ताप होतो.
तसचं काहीसं एखाद्या पदार्थाचं होत. म्हणजे, कधी कधी आपल्याला एखादा पदार्थ बघून, किंवा नुसता खाऊन अंदाज आलेला असतो, पण त्यातले सगळे घटक आणि त्याची संपूर्ण कृती लक्षात आलेली नसते. आणि मग हा पदार्थ करायचाच असं जर ठरवलं, तर मग त्या पदार्थाच्या अंतरंगात जाण आवश्यक होत, नाही का? अशा वेळी पाककलेतले आपले ज्ञान, कौशल्य,आणि सोबतच आपला अनुभव पणाला लागले पाहिजे. पण सर्वात जास्त गरज असते, ती पदार्थ बनवण्याच्या आपल्या तळमळीची आणि हि ओढच आपल्याला अनेक वेळा सामर्थ्य आणि सफलता देते. म्हणजेच पाककृतीच्या पण अंतरंगाचा ठाव घेण जरुरीचं आहे, हो ना?
पहिल्यांदा बंगलोरला एका plush restaurant मध्ये veg enchiladas खाल्ले, तेंव्हा मी खूप खुश झाले तो पदार्थ खाऊन! आणि घरी आले तरी त्या enchiladas ची चव माझा पिच्छा सोडत नव्हती. पण हे बनवायचे कसे हेही माहित नव्हत . मग पुन्हा सर्व काही आठवून बघितलं, आणि मनातली पाक कृती कागदावर अवतरायला लागली. करून बघितलं , बरे झाले होते, पण समाधान झाले नाही. पण आणखीन एक दोनदा केले आणि मग छान जमले! mexican salsa dip आणि mexican riceबरोबर सर्व्ह करावे, म्हणजे मस्त बेत जमेल!

| veg enchiladas |

No comments:
Post a Comment