'गोविंदा आला रे आला, जरा मटकी स्म्भाल ब्रिजबाला!
अरे एक दो तीन चार, संग पांच छे सात हैं ग्वाला!'
आज दहीहंडी, गोपाळकाला , नुसती धूम! सगळ्या बाल गोपाळांचा कुतूहलाचा विषय असतो ही दहीहंडी. माणसांनी उंच उंच मनोरे रचायचे,आणि एकाने सर्वात वरती पोहोचून दहीहंडी फोडायची! थ्रिलिंग! डेरिंग! कमाल आहे ह्या गोविंदांची ! हल्ली तर महिला आणि मुलींची पथकं देखील ह्या दहीहंडी मध्ये हिरीरीने, आणि जय्यत तयारीने भाग घेताना दिसायला लागल्येत.Talk about women's emancipation!
कृष्ण आपल्या सवंगड्यांना घेवून यमुनातीरी खेळायचा, तेंव्हा न्याहारीची वेळ झाली, की कृष्ण सगळयांना गोल बसवून घ्यायचा. सर्व न्याहारीचे पदार्थ एकत्र करायचा, आणि मग सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घ्यायचा! हाच तो गोपाळकाला! ह्यामुळे व्हायचे काय, की कुणाचा पदार्थ जास्त चांगला, कुणाचा कमी, कुणाचा हलका, कुणाचा भारी, कुणाचा स्वादिष्ट, कुणाचा बरा, कुणा गरीबाचा, कुणा श्रीमंताचा, असा कोणताही भेदभाव उरायचा नाही, किंबहुना हा भेदभावच विसरायला लावणारा हा गोपाळकाला!
भेदभाव विसरायला होतात, त्यातून सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि बंधुभाव वाढीस लागतो . आणि सर्व स्वाद एकत्र झाल्यामुळे हा गोपाळकाला लागायचा पण स्वादिष्ट! म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दोन्ही स्थरांवर स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा कृष्णाचा हा सोप्पा मार्ग होय! एकात्मतेचा संदेश देणारा हा श्रीकृष्णाचा गोपाळकाला! भाषणबाजी नाही, लेक्चर नाही, जड जड शब्द नाहीत, फक्त सहज, सोपी कृती!
ह्यावरून आठवलं, मध्यंतरी, एका शाळेत एका शिक्षकाने असाच काहीसा प्रयोग केला होता. त्यांच्या लक्षात आले होते,की एक मुलगी वेगळी बसून आपला डबा खाते. त्यांनी तपास केला, तेंव्हा त्यांना कळलं, हिच्या डब्यात अगदीच काही नसतं खायला! काही तरी सुकं पाकं आणायची, ह्याला कारण तिची नाजूक आर्थिक परिस्थिती. म्हणून तिला इतरांबरोबर बसून डबा खायला लाज वाटायची. मग, त्यांनी दुसऱ्या दिवशी पासून एक प्रयोग सुरु केला. मधल्या सुट्टीत, त्यांनी वर्गातल्या सर्व मुलांना गोलाकार बसवून , आपल्या स्वतः च्या डब्यातला एक घास खाऊन, डबा पुढे सरकवायला सांगितला, आणि मग मागच्या डब्यातल्या खाऊची चव घेऊन तोही डबा पुढे सरकवायचा. असा एक राउंड पूर्ण करायचा! त्यामुळे झाले काय, सगळ्यांना एकमेकांच्या डब्यातला खाऊ चाखता आला, आणि त्या मुलीची भीती पण कमी झाली! किती सहज, सोपी कृती! पण त्या मुलीसाठी खूप काही साध्य करून गेली ! मला फार आवडली ही गोष्ट! असे कल्पक शिक्षक आपल्या मुलांना मिळाले तर कितीतरी प्रोब्लेम समस्येचं उग्र किंवा गंभीर रूप धारण करण्या आधीच सुटतील, नाही?
गोपाळकाला करण्यासाठी: मी चुरमुरे, भिजवलेले पोहे, मीठ, साखर, हिरवी मिरची तुकडे, पंढरपुरी डाळ, भाजलेले शेंगदाणे, बेदाणे, टोमेटो तुकडे,, कांदा चिरून, काकडी तुकडे, सफरचंद तुकडे, पेरूचे तुकडे, केळीचे तुकडे,दही, दूध, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, खवलेला नारळ असे सर्व पदार्थ एकत्र करून, वरून मोहरी_ जीऱ्याची फोडणी देते, आणि सर्व्ह करते.
आणि नवीन जमान्यातला म्हणाल तर STEW किंवा HOTCH POTCH सूप हा मला वाटतं गोपाळकाल्याच्या जवळपास जाणारा, त्याच्याशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. One dish meal म्हणता येईल अशी ही सोपी डिश आहे. पोटभर, स्वादिष्ट, पचनास हलकी आणि पोषकतत्वांनी भरपूर!
STEW: शिजवलेल्या मिक्स डाळी, शिजवलेला भात, शिजवलेली मक्रोनी, किंवा पास्ता, शिजवलेल्या मिक्स भाज्या, (हवे असल्यास शिजवलेले चिकनचे तुकडे), बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किंवा चिली फ्लेक्स, हवी असल्यास थोडी लसूण बटर वरती लाल करून, हे सर्व जिन्नस, किंवा ह्यातले हवे असतील ते जिन्नस एकत्र करावेत, त्यात बटर, मीठ, काळी मिरीपूड, कोथिंबीर किंवा पार्स्ले,टोमेटो सॉस आणि थोडे पाणी घालून पातळसर करावे. गरम करून, थोडे क्रीम आणि bread croutons, गार्लिक ब्रेड, किंवा सूप स्टिक्स घालून सर्व्ह करावे.
दहीहंडी एन्जॉय करा!
अरे एक दो तीन चार, संग पांच छे सात हैं ग्वाला!'
आज दहीहंडी, गोपाळकाला , नुसती धूम! सगळ्या बाल गोपाळांचा कुतूहलाचा विषय असतो ही दहीहंडी. माणसांनी उंच उंच मनोरे रचायचे,आणि एकाने सर्वात वरती पोहोचून दहीहंडी फोडायची! थ्रिलिंग! डेरिंग! कमाल आहे ह्या गोविंदांची ! हल्ली तर महिला आणि मुलींची पथकं देखील ह्या दहीहंडी मध्ये हिरीरीने, आणि जय्यत तयारीने भाग घेताना दिसायला लागल्येत.Talk about women's emancipation!
![]() |
| गो गो गोविंदा! |
| गोपाळकाला |
ह्यावरून आठवलं, मध्यंतरी, एका शाळेत एका शिक्षकाने असाच काहीसा प्रयोग केला होता. त्यांच्या लक्षात आले होते,की एक मुलगी वेगळी बसून आपला डबा खाते. त्यांनी तपास केला, तेंव्हा त्यांना कळलं, हिच्या डब्यात अगदीच काही नसतं खायला! काही तरी सुकं पाकं आणायची, ह्याला कारण तिची नाजूक आर्थिक परिस्थिती. म्हणून तिला इतरांबरोबर बसून डबा खायला लाज वाटायची. मग, त्यांनी दुसऱ्या दिवशी पासून एक प्रयोग सुरु केला. मधल्या सुट्टीत, त्यांनी वर्गातल्या सर्व मुलांना गोलाकार बसवून , आपल्या स्वतः च्या डब्यातला एक घास खाऊन, डबा पुढे सरकवायला सांगितला, आणि मग मागच्या डब्यातल्या खाऊची चव घेऊन तोही डबा पुढे सरकवायचा. असा एक राउंड पूर्ण करायचा! त्यामुळे झाले काय, सगळ्यांना एकमेकांच्या डब्यातला खाऊ चाखता आला, आणि त्या मुलीची भीती पण कमी झाली! किती सहज, सोपी कृती! पण त्या मुलीसाठी खूप काही साध्य करून गेली ! मला फार आवडली ही गोष्ट! असे कल्पक शिक्षक आपल्या मुलांना मिळाले तर कितीतरी प्रोब्लेम समस्येचं उग्र किंवा गंभीर रूप धारण करण्या आधीच सुटतील, नाही?
गोपाळकाला करण्यासाठी: मी चुरमुरे, भिजवलेले पोहे, मीठ, साखर, हिरवी मिरची तुकडे, पंढरपुरी डाळ, भाजलेले शेंगदाणे, बेदाणे, टोमेटो तुकडे,, कांदा चिरून, काकडी तुकडे, सफरचंद तुकडे, पेरूचे तुकडे, केळीचे तुकडे,दही, दूध, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, खवलेला नारळ असे सर्व पदार्थ एकत्र करून, वरून मोहरी_ जीऱ्याची फोडणी देते, आणि सर्व्ह करते.
आणि नवीन जमान्यातला म्हणाल तर STEW किंवा HOTCH POTCH सूप हा मला वाटतं गोपाळकाल्याच्या जवळपास जाणारा, त्याच्याशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. One dish meal म्हणता येईल अशी ही सोपी डिश आहे. पोटभर, स्वादिष्ट, पचनास हलकी आणि पोषकतत्वांनी भरपूर!
![]() |
| vegetable stew |
दहीहंडी एन्जॉय करा!

No comments:
Post a Comment