पहाटेची रम्य वेळ . अल्पावधीतच सूर्योदय होतो. पाखरांचा चिवचिवाट, पाणवठ्यावर हळू हळू बायाबापड्यांची गर्दी होते, लोकांची कामासाठी बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. मंदिरात पुजारी पुजेची करतायत, घरां घरां मध्ये जात्याची घरघर सुरु झाली, ओव्यांचे सूर घुमायला लागलेत. गोठ्यात केंव्हाच जाग आलेली आहे,गाईंना आणि वासरांना! अशी सगळी लगबग चालू असतांनाच, वासुदेव दारात आला, की गृहिणीची घाई उडते कारण वासुदेवाला झोळीत दान घालायचं असतं!
डोक्यावर मोरपिसांची टोपी, घोळदार अंगरखा, गळ्यात माळ, हातात टाळ, पायात चाळ, दुसऱ्या हातात चिपळ्या, काखेमध्ये झोळी, पायापर्यंत सोडलेला रंगीत शेला, कमरेला खोचलेला पावा, हातातील टाळ आणि चिपळीच्या तालावर पावले टाकीत, नाचत वासुदेव गाऊ लागतो…
रात्र संपली दिवस उगवला। पूर्ण निशेचा नाश जाहला।।
नवतेजाने प्रफुल्ल होऊन। लागे जग हे कार्याला।।
रामप्रहरी स्मरा विठूला। शुद्ध मनीचा भाव।।
हेच सांगण्या आलो तुम्हासी।
वासुदेव माझे नाव। वासुदेव माझे नाव ।।
झोळीत दान घातलं, की गिरकी घेऊन, पावा वाजवून, वासुदेव पुन्हा म्हणतो….
दान पावलं दान पावलं।
भिमाशांकारी महादेवाला । कोल्हापुरात महालक्ष्मीला । ।
पंढरपूरला विठूरायाला। जीजुरीमध्ये खंडेरायाला। ।
आळंदीमध्ये ज्ञानदेवाला। । देहूगावात तुकरामला । ।
पैठणमध्ये एकनाथाला। स्ज्ज्नगडी रामदासला। ।
दान पावलं दान पावलं सदगुरूरायाला। ।
दान पावलं दान पावलं जनताजनार्दनाला। ।
ऐसा वासुदेव बोलतो बोल । ऐसा वासुदेव बोलतो बोल । ।
दान घेताना अंग वळवत, टाळ वाजवून ठेक्यात पद्न्न्यास करीत, गिरकी टाकुन, मधुर स्वरात वासुदेव दान स्वीकारतो, गिरकी घेउन पावा वाजवतो, तेंव्हा आपले हे दान खरोखरीच साऱ्या देवांना पोहोचलय ह्याचा सात्विक आनंद दान करीत असलेल्या माउलीच्या चेहरयावर उमटू लागतो!
पण, ह्या वासुदेवाचे, त्याच्या वेषभुशेचा काय अर्थ? समजुन घेतला फार गम्मत वाटेल, वासुदेवाच्या स्वरूपात मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. अविद्येला घालवून देऊन श्रीविद्येचा म्हणजेच मोरपिसांचा टोप डोक्यावर धारण केला आहे. पूर्ण ज्ञानरुपी घोळदार अंगरखा घातला आहे. हातातल्या दोन चिपळ्या म्हणजे 'माया' आणि 'ब्रह्म' किंवा 'प्रकृती' आणि 'पुरुष' ह्यांचे रूपच, तर ज्याप्रमाणे माया आणि ब्रह्म एकत्र आल्या शिवाय विश्वाची निर्मिती नाही, तसेच दोन चिपळ्या एकत्र आल्या शिवाय नाद नाही. नादब्रह्माचा पावा तो वाजवतो आणि लोकांना भोग सोडून त्यागाचे दान मागतो! आध्यात्मिक पातळीवर विषय_वासनांपासून मुक्त होण्याचा उपदेशही केलेला आहे. म्हणजे थोडक्यात, 'तत्वज्ञान' सोप्या भाषेत सांगणारे, वासुदेव हे सात्विक रूप आहे, आणि त्याचा हा वेशभूषेचा आविष्कार म्हणजे आपल्या संस्कृतीचा वारसा आहे.
(ही माहिती 'प्रबोधन यात्री संत एकनाथ' ह्या प्रोफेसर शिवाजीराव भुकेले ह्यांच्या पुस्तकातून घेतली आहे. )

No comments:
Post a Comment