![]() |
| FREEDOM IS NOT FOR FREE |
मागे एकदा आमच्या आर्मीच्या लेडीज क्लब मध्ये १५ ओगस्ट ला एक गेम ठेवला होता _ flagखाली प्रत्येकाने एक slogan लिहायचा. मी लिहिलं होतं, 'freedom is not for free' (जे दीपक चोप्रांच्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव आहे. ) मला first prize मिळालं होतं.
मी ह्या ब्लोग मध्ये बेसिकली फूड आणि लाइफ़ बद्दल लिहिते,त्यामुळे आज मला आपला आहार, आपले जीवन, आणि आपले स्वातंत्र्य ह्या तिन्हीची सांगड घालीत काही लिहायचे आहे. In the context of food, Freedom does not mean eating whatever you want to eat, but it is the STRENGTH to understand what food is right for YOU! This strength needs to be garnered over a period of time, it needs to be cultivated, through perseverance and understanding of our body, age, needs, and other aspects of health and life .Once you have the strength to judge yourself, you will experience the real freedom from unnecessary cravings, and restrictions! Then you will experience BLISS AND CONTENTMENT!
काही काही लोकं म्हणतात, 'न खाता मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं. It is simply depressing to hear such statements. Is life so cheap? is it for free? No, life is neither cheap nor is it for free. हा दृष्टीकोन शारीरिक,मानसिक,आणि भावनिक आरोग्या साठी मारक आहे. कारण, मुळात अन्न, हा जगण्याचा, आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. 'Eat to live' किंवा 'live to eat' हे दोन्ही दृष्टीकोन टोकाचे भूमिका घेणारे आहेत, असं मला तरी वाटतं. आहाराचा सुवर्णमध्य साधण म्हणजेच, संतुलित, परिपूर्ण आयुष्याचा मार्ग सुकर आणि सुखाचा करणं! जगण्याची कला आत्मसात करायची असेल, आणि जीवनात आनंद उपभोगायचा असेल, तर हा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे.
काल सर्व देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहानी साजरा झाला! मी सकाळी झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला गेले,आणि तिरंग्याच्या,आपल्या झेंड्याच्या रंगांमधून प्रेरणा घेऊन घरी संध्याकाळी तिरंगी sandwiches,
आणि रात्री जेवणात मटर पनीर बनवले!
जर आपला आहार आणि आपले जीवन हे अतिरेकी वासनां पासून मुक्त असेल, तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र असू!

No comments:
Post a Comment