भिकारी: 'माई, भाकरी वाढ'
आजी: 'अजून भाकरी तयार नाहीये, थोड्या वेळाने ये.'
भिकारी: 'माझा मोबाईल नंबर ठेव. भाकरी झाली, की मिस्ड कॉल दे.'
आजी: 'ते कशाला? भाकरी झाली की मी facebook वर status update करते. ते वाचून तूच ये!'
किती प्रगती झाली आहे बघा! technology advancement मुळे, चमत्कार घडून, क्रांती घडत चालली आहे. ज्या पिढीला Landline ची ट्रिंग ट्रिंग देखील एका जमान्यात अत्याधिक चैन होती, त्या पिढीच्या मंडळींना स्वतःचा मोबाईल म्हणजे एक गरज होत चालली आहे! माझे वडील सुद्धा, काही वर्षां पूर्वी त्यांच्यासाठी मोबाईल घेऊ म्हटलं, तर का_ कु करीत होते, म्हणजे कशाला मोबाईल, तो हरवला तर, वगैरे वगैरे. पण,कालांतराने त्यांना त्याची इतकी सवय झाली आणि आता ती त्यांची गरज आहे! (आणि मोबाईल कुठे विसरत नाहीत किंवा हरवतही नाहीत!)
रेडियो म्हणजे चैनीची गोष्ट होती, अशा काळात वाढलेली एखादी आजी, ' LCD टीव्ही वर कार्यक्रम छानच दिसतात हं, अगदी सिनेमा बघितल्या सारखे वाटते हो!' म्हणत मन लावून टीव्ही बघते! ह्या आजींनी तर Facebook ला आपलसं केलं आहे!
असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी नवीन टेक्नोलोजी आत्मसात करून, त्याचा वापर स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करून घेतला आहे. काहींनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जवळच्यांच्या सम्पर्कात राहण्यासाठी केला आहे, video chat वगैरे द्वारे आपल्या लांब असलेल्या नातवंडांना, पंतवंडांना पाहता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, आणि मायेची दुधाची तहान निदान videoच्या ताकावर का होईना भागवता येते. ह्यामुळे त्यांचा एकटेपणा दूर होतो, आणि मनाला विरंगुळा आणि आनंद मिळतो!
पण, हे सर्व करता यावे, आणि हे तांत्रिक काम नीट जमावे म्हणून आपली नवीन पिढीच तर ह्या पिढीला मदत करते आहे, नाही का? मग आपण ह्या पिढीला insensitive का म्हणतो? दुःखी होण्यापेक्षा, ह्या नवीन पिढी बरोबर घ्यावं , कधी कधी दहा पाउलं चालून त्यांच्या जवळ पोहोचावं, मग कळेल, की ही मुलं सुद्धा संवेदनशील आहेत, प्रेमळ आहेत, फक्त त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. वेळेचा अभाव आणि वेगवान जीवनशैली मुळे दुरावा वाटतो. पण दुरावा कमी व्हायला मागच्या पिढीनेच समजूतदारपणा दाखवायला लागेल, अन्यथा ही पिढी भरकटेल.
मनांमध्ये दुरावा असेल, तर कोणतेच तंत्रज्ञान मनांना जवळ आणू शकत नाही, पण मनं एक असतील, तर कोणतीही अडचण दुरावा उत्पन्न करू शकणार नाही, हे मात्र खरं!
सद्ध्या श्रावण चालू आहे, त्यामुळे अंडी घालून केक करता येत नाहीये. त्यासाठी, बिना अंड्याचा केक केला, तो पण microwave मध्ये (प्रगत तंत्रज्ञान म्हणत होते ना मी? ते हेच!)
साहित्य; ३/४ कप मैदा/ आटा , १/४ कप मिल्क पावडर, २ टेबलस्पून कोको पावडर, १ कप पिठी साखर, १/२ कप दही, १/४ कप बटर/मलई/तेल , १ १/४ tsp बेकिंग पावडर, ३/४ tsp सोडा, १/२ कप दूध.
कृती: सर्व साहित्य नीट whisk करून, microwave मध्ये ६०% वर, ७ ते ८ मिनिटे बेक करावे . सर्व्ह करताना, मिक्स फ्रुटचे तुकडे,किंवा ice cream सोबत द्यावे.

No comments:
Post a Comment