'रूप लावण्य अभ्यासिता न ये। सहजगुणास न चले उपाये।
काहीतरी धरावी सोयी। आगंतुक गुणाची ।।'
खर आहे,रूप,उंची,रंग,इत्यादी गोष्टी आई वडिलां मिळतात, जे आपल्याला जन्मतः मिळाले, ते सर्व गुण म्हणजे सहजगुण, त्यांच्या वर आपले काहीच नियंत्रण नाही. पण रूप लावण्याची कमतरता आपल्यातल्या उत्तम गुणांनी आयुष्यात यश आणि सफलता मिळवून भरून काढता आली पाहिजे. त्यासाठी, आपल्यातील क्षमता आणि कमतरता ओळखून, आपण आयुष्यात एखादी कला किंवा विद्या अवगत करायला हवी, किंवा एखादा सदगुण अंगी बाणावा ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ह्यामुळे वेळ सत्कारणी लागतो, आपला विरंगुळा पण होतो,व्यक्तीमत्वात सुधारणा होते, ज्ञानात भर पडते, आयुष्यात नैराश्य येत नाही. माझं तर मत आहे,की आज आपण जे शिकू, त्याने आपला आयुष्याचा दर्जा हा कालच्या पेक्षा थोडा सुधारलेला वाटला, तर आपण काहीतरी प्रगती केली असे समजावे! आणि असे सतत स्वतःला घडवीत जावे, जमले तर दुसऱ्यांनाही घडवीत जावे. एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलं पाहिजे, म्हणजे मग ह्या प्राविण्याच्या बळावर नाव लौकिक आणि समाधान मिळतं.
माझा स्वतःचा ह्या बाबतीत अनुभव आहे ,तो share करण्या सारखा आहे. अनेक वर्ष( थोडी थोडकी नाही,२५ वर्ष!) इमाने इतबारे housewife चा role अदा केल्यानंतर, आयुष्यात एक वळण असं आलं, जिथे पोकळी निर्माण झाल्यासारखी झाली, शारीरिक आणि मानसिक त्रासातून जाता जाता, एके ठिकाणी बसून, आयुष्याचं अवलोकन करण्याची वेळ आली. तेंव्हा लक्षात आलं, की इतकी वर्ष गतिमान आणि प्रवाही आयुष्य जगल्यानंतर, पहिल्यांदाच अनुभवाला आलेल्या रिकामपणामुळे हा कंटाळा, depression, नैराश्य आलेलं आहे. मग ह्यातून बाहेर पडण्यासाठी हळू हळू प्रामाणिक धडपड सुरु केली. शोधता शोधता लक्षात आलं, की आपल्याकडे लिहिण्याची कला आहे, विचारांना पद्धतशीरपणे मांडायची खुबी आहे. मग हा ब्लॉग लिहिण्याची कल्पना सुचली, किंबहुना सुचवली गेली. आजारपणाच्या काळात, स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी इंटरनेट चालवायला शिकले होतेच, त्यातूनच ही कल्पना पुढे आली, आणि खरं सांगते, माझे आयुष्यच बदलून गेले! आता मी Netizen झाली आहे. म्हणजेच मी आधी म्हटलं तसं, कालच्या पेक्षा आजचा दिवस आणखी प्रगतीचा आहे! रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं, फक्त जागरूक असलं पाहिजे. आता, विरंगुळा म्हणून लावून घेतलेल्या ह्या छंदात मी इतकी गुरफटले आहे,की, पूर्वी जो वेळ मला खायला उठायचा, तोच वेळ आता मला पुरत नाहीसा झाला आहे! घरकामा इतकचं ब्लॉग लिहिणं, त्यासाठी नवीन विषय निवडणं, हे महत्वाचे वाटते. ह्या सर्वांतून मला आनंद तर मिळतोच,पण माझ्या creativity ला वाव मिळतो, आणि आयुष्याला एक नवीन अर्थ प्राप्त झाला आहे, ह्याचं समाधान वाटतं!
माझं हे इंटरनेट मधलं ज्ञान जेंव्हा दुसऱ्यांनाही उपयोगाला येतं, तेंव्हा ह्या ज्ञानाचं चीज झाल्या सारखं वाटतं!
म्हणतात ना,'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!'
CADBURY CHOCOLATE लहानां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं, हो ना? मग घरीच केलं तर?
५० ग्रॅम कोको पावडर, १०० ग्रॅम मिल्क पावडर, १०० ग्रॅम साखर, ३० ग्रॅम बटर, ३० मिली दूध pan मध्ये स्लो हीट वर शिजत ठेवावे.थोड्या वेळाने, हाय फ्लेम करून ढवळत राहावे. घट्ट होत आले, की प्लास्टिक मोल्ड मध्ये सेट करून, किंवा tray मध्ये सेट करून तुकडे करून, foil wrap किंवा कलर्ड पेपर मध्ये wrap करून द्यावे.
मी हे चॉकलेट माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला केलं होतं. माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, त्यांच्या कडून मी ही शिकले होते. बऱ्याच वेळा हे चॉकलेट केलं जातं, आणि आता तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना पण आवडतं!

No comments:
Post a Comment