पप्पूने एक लडकीसे कहा, 'आय लव्ह यु!'
लडकीने गुस्सेमें उसे एक चांटा मारा और पूछा, 'क्या बोला?'
पप्पूने रोते हुए कहा, 'जब तुमने सुनाही नहीं तो चांटा क्यूँ मारा?'
हा विनोद वाचल्या नंतर मी इतक्या वेळा हसले कि बस! खरचं,प्रेमात पडायचं, मग प्रेमभंग होतो, मग पुन्हा त्याच जोमाने, त्याच उत्साहाने, त्याच उत्कटतेने, प्रेमात पडायचे! (ह्या अजब प्रेमवीरांच्या चिकाटीला आपला प्रेमळ सलाम बर का!) एका गाजलेल्या मराठी गाण्याच्या ओळी आठवल्या…।
'प्रेमात पडतो जो तो येता जाता,
पण सावरतो तुझा होता होता. '
पण ह्या प्रेमा व्यतिरिक्त प्रेमाच्या अनेक छटा असतात नाही का?
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं ,
तुमचं आमचं सर्वांचं सेमच असतं !'
प्रेमाची व्याख्या करणारं ह्याहून अधिक बोलकं वाक्य कोणतं असू शकेल? स्नेहभाव, माणुसकी, भूतदया, मैत्री, आपुलकी, दयाभाव, भक्ती, सेवाभाव हे सर्व ह्या प्रेमाचेच आविष्कार आहेत. आणि अजून बरीच नाती अशी असतात, की त्यांना कोणतेच नाव देता येत नाही, पण तरी ही सर्व नाती प्रेमाचीच असतात!
नातं असतं तिथे प्रेम असेलच असे नाही, पण प्रेम असेल,तिथे नाते आपोआप तयार होते. प्रेम असतं तिथे समर्पण असतं, त्याग असतो, सेवाभाव असतो, विश्वास असतो, एकमेकांबरोबर विचारांची, घेतलेल्या निर्णयांची मोकळी देवाण घेवाण असते. त्यासाठी एकमेकांबरोबर वाद नव्हे, तर संवाद असतो, कारण समोरच्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे, त्याचा उत्कर्ष व्हावा,प्रगती व्हावी अशी प्रामाणिक तळमळ असते.
आपण प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला, संस्थेला, पशूपक्षांना किंवा एखाद्या छंदाला आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो. खरं प्रेम आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन असेल, तर समोरच्यावर विश्वास ठेवून त्याला उंच भरारी मारू दिली पाहिजे, म्हणजे मग तो पुन्हा त्याच विश्वासाने, विसाव्या साठी, प्रेमा साठी तुमच्या पाशी येईलच ! पण त्याला दडपण ठेवलं, हुकुमत गाजवून त्याला ताब्यात ठेवायला बघितलंत, तर मग मात्र तो संधी मिळताच जो भरारी घेईल, तो नेहमीकरिता तुमच्या कडे पाठ फिरवेल, हे नक्की. आपलं प्रेम, हे खळाळून वाहणाऱ्या पाण्या सारखं असायला हवं ….मध्ये खड्डा आला,की पाणी तो खड्डा भरून काढत, आणि पुढे वहात राहत!
प्रेमाने बनवलेली अशीच एक छानशी रेसिपी _ chocolate log…. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, आणि बघताबघता प्लेट सफाचक!
साहित्य: १० ते १५ Marie बिस्किटे, १/२ कप काळी कॉफी , आणि २ _ ३ टेबलस्पून icing sugar मिक्स करून, फेटून घेतलेले १ कप क्रीम, ५० ग्रॅम melted chocolate, १ टीस्पून कोको पावडर
कृती : साखर घालून बिना दुधाची कॉफी करून घ्यावी. १० ते १५ Marie बिस्किटे एकेक करून ह्या कॉफी decoction मध्ये बुडवून प्लेट मध्ये एकावर एक ठेवावीत. सगळी बिस्कीट ठेवून झाली,की,वरच्या भागावर,आणि गोलाकार क्रीम पसरावे. फ्रीज मध्ये ठेवावे. पुन्हा काढून, उलटे करावे,वरच्या बिस्कीटवर क्रीम पसरावे. पुन्हा फ्रीज मध्ये ठेवावे. थोड्या वेळाने त्यावर melted chocolate ओतावे, फ्रीज मध्ये ठेवावे. पुन्हा काढून,दुसऱ्या बाजूवर chocolate ओतावे. थंड करून घ्यावे. आता log काढून, त्याचे तिरके तिरके स्लाईसेस सुरीने कापावेत. डिश मध्ये अरेंज करून, बाजूने कोको पावडर भुरभुरावी, किंवा chocolate melt करून drizzle करून, थंड सर्व्ह करावे. ,हवे असल्यास, किसलेले white किंवा dark chocolate घालावे.

| chocolate log |

No comments:
Post a Comment