न पीनेका शौक था,न पिलानेका शौक़ था।
हमें तो सिर्फ़ नजरें मिलानेका शौक़ था।
लेकिन नजरें मिला बैठे उन्हींसे,
जिन्हें नजरोंसे पिलानेका शौक़ था।
कधी कधी एखादा पदार्थ करायला जातो, तो बिघडतो! म्हणजे करायला जातो एक पदार्थ,आणि बनतो दुसराच! कधी कधी तो नवा पदार्थ योजलेल्या पदार्था पेक्षा जास्त चांगला झालेला असतो!
कालच मी एका शोवर अळूवड्या प्रमाणेच अंबाडीच्या वड्या केलेल्या पाहिल्या. त्यातच माझ्याकडे अंबाडीची शिजवलेली भाजी फ्रीज मध्ये होती,ज्याची मी फोडणी करून परतून भाजी करणार होते,. त्या रेसिपीत अंबाडीची पानं सांगितली होती. तरी मी ह्या वड्या करून बघितल्या, आणि छान झाल्या की!
पूर्वी मला रव्याचे लाडू नीट येत नव्हते. कधी पाक जास्त घट्ट, कि मग लाडू हातोड्याने तोडायची वेळ! आणि कधी पाक पातळ झाला तर लाडू वळले जात नसत, आणि लाडूचा चुरा वाटीत घेऊन चमच्याने खायची वेळ! पण मग ठरवलं,कि येत नाही म्हणजे काय? आणि होता होता एक दिवशी लाडवाचा पाक exact एकतारी झाला,आणि लाडू मस्त वळले आणि तितक्याच पटकन संपले पण! नंतर मात्र लाडू बिघडले नाहीत! मी ह्या सर्व प्रक्रियेला 'पदार्थाचा आत्मा गवसणे' असंच मानते. प्रत्येक वेळी असा पदार्थाचा आत्मा गवसतोच असं नाही, पण प्रयत्न करीत रहायला हवेत.
खरतर, कुठल्याही कामाचा 'आत्मा' गवसण हेच त्या कामातील आपल्या यशाच गमक असत. पूर्वी उकडीचे मोदक जमत नसत, आणि जेंव्हा त्यां उकड करण्याचा 'आत्मा'गवसला, तेंव्हा उकड चांगली झाली! तोपर्यंत उकडीचे मोदक म्हणजे टेन्शन होते.
थोडक्यात काय, भरमसाठ रेसिपीची पुस्तकं नुसती असून चालत नाही, ती नुसती वाचून भागत नाही, शोज बघून उपयोग नाही, जोपर्यंत आपण त्या रेसिपी मध्ये स्वतःला शोधत नाही, तिला गवसणी घालत नाही, तोवर ती आपल्याला वश नाही.
उद्या पासून श्रावण महिना सुरु होतो आहे. श्रावणाची तयारी करायला हवी, नाही का?

| अंबाडीच्या भाजीच्या वड्या |

No comments:
Post a Comment