What is a race? A real race is when you try to finish off the panipuri in your plate ,before the panipuri boy puts the next one into your plate!
हा जोक होता, पण वस्तूस्थिती काही ह्याहून वेगळी नाही, ह्यावर अनेक मंडळी सहमत होतील. मी हा जोक ऐकला, खूप हसू आलं, आणि म्हटल सगळ्यांना सांगावा. आणि कसं आहे,पाणीपुरी टेस्टी असेल तर,हि रेस पण टेस्टी होते, नाही?
५_६मित्र मैत्रिणी एकत्र कोंडाळ करून पाणीपुरी खात असतात तेंव्हा,अगदी चांगले मित्र सुद्धा, पुढची पुरी आपल्या प्लेट मध्ये पडावी म्हणून, एकमेकांचे शत्रू बनू शकतात,नाही? just joking yaar!
मला तर ६ पुऱ्या केंव्हा गट्टम केल्या ते समजतच नाही, आणि वर शंका येते कि भैयानी एखादी पुरी कमी तर नाही दिली? इतक्या पटकन ६ कशा संपतील? आणि वेड्या आशेने भैया कडे बघावं, तर तो लगेच दुसरीकडे पुरी देण्यात बिझी झालेला असतो! (ह्याला कसं समजत आपल्या ६ पुरी पूर्ण झाल्या ते?) असो, बिचारी मी!
बऱ्याच जणांना असं वाटत असावं, नाही?
जालमुरी पण असाच चमचमीत पदार्थ आहे. 'जाल' म्हणजे तिखट आणि 'मुरी' म्हणजे मुरमुरे
चुरमुरे,जाड शेव,तळलेली चणाडाळ, भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे,बारीक चिरलेले कांदा,टोमेटो,काकडी, चिंच चटणी,आलं, हिरवी मिरची,मीठ, चाट मसाला,गरम मसाला,कोथिंबीर, तुकडे,लिंबू रस, आणि थोडे मोहरीचे तेल.हे सर्व साहित्य एकत्र करून, कोन, किंवा बटाटा बास्केट मध्ये द्यावे.
महाराष्ट्रात चौपाटी पोहे प्रकार फार आवडतो.अतिशय चटपटीत, रुचकर आणि पावसाळ्यात एकीकडे पाउस बघत खायला मस्त डीश!
जाड पोहे तळून घ्यावेत. त्यात फरसाण,शेव,तळलेले शेंगदाणे,टोमेटो,कांदा, वाफवलेले कडधान्य, कोथिंबीर,चिंच चटणी,हिरवी चटणी,,लाल चटणी, मीठ घालून,आणि लिंबू रस पिळून लगेच सर्व्ह करावेत.
आज पावसाने थोडी विश्रांती घेतली,आणि ऊन पडलेलं बघून आनंद वाटत आहे! पण अजून पावसाळा संपलेला नाही, त्यामुळे बऱ्याच खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा राहिला आहे!

No comments:
Post a Comment