एका व्यापाऱ्याला डॉक्टरांनी सांगितले' प्लास्टिक सर्जरी करावी लागेल, ७०,००० रुपये खर्च येईल.'
व्यापारी म्हणाला, डॉक्टर, प्लास्टिक मी आणतो, तुम्ही फक्त मजुरी सांगा!'
हल्ली म्हटलं जातं,की चंगळवाद वाढला आहे. पण त्याची कारणं बघितली पाहिजेत. ८० च्या दशकापर्यंत आपला देश फारसा प्रगतीशील देश मानला जात नव्हता. पण ९० च्या दशकात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, आणि हळू हळू इतर देशातील वस्तू, सेवा आपल्या देशात येण्यास सुरुवात झाली. तेंव्हा सुरुवातीला थोडा विरोध झाला. पण ,त्या वस्तूंची, सेवांची आकर्षकपणे केलेली जाहिरातबाजी, त्यांच्या गुणवत्तेची दिलेली खात्री आणि त्यांच्या वापरामुळे आपली होणारी वैयक्तिक,आर्थिक,सामाजिक,आणि देशाची प्रगती ह्यांची सुरेख गुंफण घालणारी दिलखेचक मार्केटिंग, ह्यामुळे आता अनेक विदेशी सेवा, माल, ह्यांची मागणी वाढली आणि म्हणून हे सर्व आपल्याकडे सहज उपलब्ध झाले आहेत.
एकीकडे सरकारी यंत्रणेतील अटी शिथील करीत, आणि अडथळे दूर करीत, हळू हळू दुसरीकडे customer base बनवत बनवत, अनेक विदेशी दुकानदारांनी आपले बस्तान आपल्या देशात बसवले , आणि ह्या जागतिकीकरणाचे पडसाद आपल्या जनतेवर पडायला लागले. हळू हळू चंगळवादाकडून भोगवादा कडे आपला प्रवास सुरु झाला आहे म्हणायला हरकत नाही! चंगळवाद आणि भोगवाद ह्यात सूक्ष्म फरक आहे, तो ओळखता पाहिजे. आपल्या आवाक्यात असलेल्या वस्तूंचा,सेवांचा, मजेत,आनंदात,पण शिस्तीत घेतलेला आस्वाद म्हणजे चंगळ. परंतु, आपल्या शक्ती पलीकडे, आसक्तीच्या आहारी जाऊन केलेली चंगळ म्हणजे भोगवाद. आणि आसक्तीच्या सीमारेषा ओलांडून,कुणाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करून ,सक्तीने घेतलेला हा भोग पराकोटीला गेला, की मग अराजक सुरु होते, ज्याच्या पाऊलखुणा दिसायला
केंव्हाच सुरुवात झालेली आहे.
सर्व क्षेत्रात जागतिक दर्जाची सेवा पुरवण्याचा चंग बांधलेल्या, आणि त्यातून मिळणाऱ्या प्रचंड फायद्यावर लक्ष केंद्रित केलेल्या देशांकडून, खाद्य पदार्थां पासून अवकाशयाना पर्यंत सर्व वस्तू, दळणवळणाच्या नवीन साधनां पासून संरक्षण क्षेत्रातल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रां पर्यंत सर्व काही मिळणे सोप्पे आणि कमी गुंतागुंतीचे झाले आहे.
त्यामुळेच की काय,पैसा अमाप झाला आहे,आणि म्हणून, कुठेही जा, काहीही खा, काहीही विकत घ्या, असा विचार बळावतो आहे. 'किती झाले?'असे विचारायचे,आणि लगेच payment करायचे! ते पण hard cash ची जरूर नाही, प्लास्टिक मनी आहे ना! मग काय? दे दना दन खर्च करायचा!
८०च्या दशकापर्यंत कर्ज घेणं कमीपणाचं मानलं जातं होतं!पण नंतरच्या काळात हप्ता भरून वस्तू विकत घेण्याची मुभा मिळायला लागली, आणि कर्जाबाबतचा लोकांचा दृष्टीकोनच बदलला! वस्तूंची विक्री वाढली, उद्योगधंदे वाढीला लागले. कर्ज हा शब्द तर आता परमावालीचा झाला आहे. आवाक्यात नसलेली वस्तू हप्त्यावर मिळते आहे? घेवून टाका! ह्यालाच भोगवाद वाढला आहे असे म्हणते.
असो, सर्व काही E M I पदार्थ वर मिळायला लागले आहे, चांगली गोष्ट आहे. (फक्त कुटुंबातील सदस्य, मुलं, आई,वडील,बायको तेवढे E M I वर उपलब्ध नाहीत तेवढे बरे!)
बाहेरच्या देशातल्या वस्तूंचे आकर्षण प्रचंड वाढले आहे. हल्ली अनेक पेस्ट,मसाले,मिक्सेस,दुग्धजन्य पदार्थ, मांसाहरी पदार्थ, वेगवेगळ्या स्वरूपात,पाकीटबंद, सीलबंद पद्धतीने मिळत आहेत, त्यामुळे स्वयंपाक करणे अत्यंत सोप्पे झाले आहे . शिवाय वेगवेगळे cuisines try करता येतात.
आता पास्ताच घ्या ना! दूध उकळून,त्यात चीज किसून घालायचं, घट्ट झालं म्हणजे सॉस तयार ! मीठ,मिरेपूड, herbs, paprika, पास्ता सॉस, आणि उकडलेला पास्ता घालायचा. वरून parsley, घालून बेक करा, किंवा नुसते खा!
हव तर ह्याच उकडलेल्या पास्ता मध्ये उकडलेल्या मिक्स भाज्या,आणि white sauce घालून बेक करून खा. थाय स्वीट चिल्ली सॉस घालून सर्व्ह करा. आणखीन लज्जत वाढते!
white sauce मध्ये मीठ,मिरेपूड, उकडलेल्या मिक्स भाज्या, , tomato sauce घालून रशियन सलाड तयार करावे. गार्लिक ब्रेड बरोबर सर्व्ह करावे. ही डिश आर्मी सर्कल्स मध्ये रशियन सलाड ह्या नावाने खूप फेमस आहे .
आपण देखील ह्या मुबलकतेचा, सोयीसुविधांचा भरपूर लाभ घेतला पाहिजे, नाही का ?

No comments:
Post a Comment