हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला!
आज श्रावणाचा पहिला दिवस ! श्रावणाचा निसर्ग जितका रम्य,लोभस,रंगबिरंगी छटांनी नटलेला, तितकेच श्रावणातील सणउत्सव हि रंगबिरंगी छटांनी भरलेले! पावसाचा लपंडाव चालू असतो,त्यातच सणांच्या तयारीची लगबग चालू असते. सणवार, व्रतवैकल्य,,थोडी मजा,थोडी नाचगाणी, कडक उपास, आणि नंतर भरपूर खाण्याचा आनंद!
शिवाय भाजीपालाम भरपूर,फळफळावळ मुबलक, मग सणाच्या निमित्ताने, उत्सवाच्या निमित्ताने काय काय कर असे होऊन जाते.आनंदाने,हर्षाने भरलेला हा महिना! म्हणतात ना,'श्रावण मासी हर्ष मानसी!'
श्रावणी सोमवारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार शिवभक्तांना पर्वणीच! श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक केला जातो. महिलां साठी सोमवारचे फार महत्व असते.सकाळी शंकराची मनोभावे पूजा करायची, अभिषेक करायचा, बेलपत्री व्हायची, आरती करायची,आणि मुख्य म्हणजे प्रत्येक सोमवारी वेगळ्या धान्याची शिवामूठ व्हायची. तांदूळ,जवस,मूग,तीळ, ह्यापैकी एक. संध्याकाळी आरती करून,सोमवारची कथा ऐकायची,आणि उपवास सोडायचा .
उपवासाला सारखी सारखी खिचडी,भगर खाऊन कंटाळा येतो. वेळेस उपवासाची मिसळ कशी वाटते?
उपवासाची मिसळ:
तूप गरम करून, त्यात जिर, हिरवी मिरची ठेचा घालून, नंतर बटाट्याचे हातानी केलेले छोटे छोटे तुकडे घालून परतावेत. (बटाटा mash करू नये, आणि फोडीही करू नयेत.) घालून नंतर त्यात तिखट,मीठ,जिरेपूड,घालून रस्सा तयार करावा. नंतर डिश मध्ये बटाट्याचा चिवडा,तळलेले दाणे ,घालून, रस्सा ओतावा. वरून कोथिंबीर, चिप्स चे तुकडे,काजू,, बेदाणे,मनुके,हिरवी मिरचीचा ठेचा, आणि लिंबाचा रस घालून द्यावे.सोबत राजगिरा भाकरी, काकडीची कोशिंबीर,दह्यातली भाजलेली हिरवी मिरची आणि दाण्याचे लाडू द्यावेत.
श्रावणात बऱ्याच वेळा सात्विक अन्न खाल्ल जात, त्यामुळे आपली प्रकृती पण सात्विक राहते,कोणतीही विकृती जवळ येत नाही, त्यामुळे मन प्रसन्न आणि धार्मिक विचारांनी भरलेले राहते.
सण , उत्सव,मजा आत्ता तर कुठे सुरुवात आहे!




No comments:
Post a Comment