Thursday, 1 August 2013

ANN DAATAA SUKHI BHVA!

एक मराठी चोर एका नटाच्या घरी चोरी करायला म्हणून घुसला. नटाने कानोसा घेतला, आणि तो जोरात ओरडला,'कमीने!'
चोर जागेवरूनच ओरडला,'कमीच नेतोय!'

बंगाली चणाडाळ

काल बंगाली पद्धतीची हरबराडाळ बनवली होती. एकदम टेस्टी झाली होती! सोबत साबुदाणा खीर!

साबुदाण्याची खीर

बंगाली चना दाल बनवण्या साठी,१ वाटी  हरबरा डाळ,मिरेदाणा, हिरवी मिरची  तुकडे, लवंग,दालचिनी,आणि मीठ घालून  शिजवून घ्या. नारळाचे छोटे चपटे तुकडे तुपात तळून ठेवा.   करून   मिरची, जिरे,आणि तेजपत्ता घाला.शिजवलेली  डाळ घाला. गरम करून,त्यात तळलेले नारळाचे तुकडे,हिरवी मिरची तुकडे,कोथिंबीर मीठ,घालून सर्व्ह करा.

 मस्त जेवण   झालं!  असं  तृप्त करणारे भोजन झाले कि हमखास ओठांवर शब्द,येतात 'अन्नदाता सुखी भव!'   खर तर, हिंदू संस्कृती  प्रमाणे, भोजन केल्यानंतर थाळीला आणि आपल्या हृदयाला उजव्या हाताने स्पर्श करून, असे आशीर्वाद जरूर द्यावेत. हे असे  मनापासून दिलेले आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पर्यंत पोहोचतात, ज्यांच्या कडून हे अन्न आपल्या पर्यंत पोहोचलय.   हे अन्न शिजवणारे कर्मचारी  किंवा गृहिणी,पर्यायाने घरचा कर्ताधर्ता ,आणि त्यांच्या पर्यंत हे अन्न पोहोच करण्यात ज्यांचा हातभार लागतो ते   शेतकरी,विक्रेते,वाहतूकदार, इतर कर्मचारी, आणि आणखीन बरीच मंडळी,  ज्यांच्या सहभागाने हे अन्न आपल्या पर्यंत पोहोचत. , ह्या सर्वापर्यंत  हे  दिलेले  आशीर्वाद पोहोचतात., आणि शेवटी तो भगवंत, जो आपला खरा  दाता आहे!

आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम बनवले आहेत हेच दिसून  येते.  काही थोड्या  लोकांनी जरी,  आज पासून प्रत्येक भोजना नंतर असं  म्हणायचं ठरवलं, तर ह्या साखळीतील प्रत्येकाला व्यक्तिगत उत्कर्ष आणि सुख समृद्धी लाभेलच,आणि ह्यातूनच विश्वाचं  सुख आणि  कल्याण होईल!

समर्थ  म्हणतात…।
जितुके काही आपणासी ठावे , तितुके हळूहळू सिकवावे।
शहाणे करुनी सोडावे बहुत जन ।

।जय जय रघुवीर समर्थ ।
       

No comments:

Post a Comment