Wednesday, 19 October 2016

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आम्ही शिलेदार!!


बऱ्याच दिवसांच्या खण्डानंतर लिहायला मिळाले.' आंतरजाल ' अहो म्हणजे इंटरनेट सेवेत मध्यंतरी खंड पडला होता, त्यामुळे काही लिहिता  आले नाही. पण मग ते ५ ते ६ दिवस फार मजेत गेले हो! मला आधी वाटलं की अरे बापरे आता काय करायचं? पण म्हणतात ना, necessity is the mother of invention तसंच काहीसं झालं बघा!मोबाईलवरती गेम नाही, गूगल नाही,, टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल अशी  सारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आवाज न करता, स्वस्थ पडून होती! नाही म्हटलं तरी अधून मधून नजर टाकायचे...वेड्या आशेवर की झालं असेल नेट सुरु तर? एक दोन दिवस खूप बेचैन होते, भानुप्रिया आणि घरात सर्वांनीच आनंद व्यक्त केला! माझा गेम खेळण्याचा वेळ वाचला म्हणून! असो.. करू द्या त्यांना टिंगलटवाळी... पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ते उगीच नाही!!! पण मग नंतर नंतर नादच सोडून एन्जॉय करायचं ठरवलं!  मग काय... मनसोक्त गप्पा मारल्या, मैत्रिणीं सोबत मॉल मध्ये भटकंती केली,खाओपियो... मजा करो! पुस्तकं धूळ खात पडली होती, त्यांवरची धूळ झटकून पुस्तकं वाचून काढली! पण seriously, खूप छान वाटलं काही दिवस इंटरनेट शिवाय काढले ते!

ह्याच दरम्यान हेही लक्षात आले की आपण टेक्नॉलॉजीचा वापर करता करता, त्या टेक्नॉलॉजीच्या किती आहारी गेलो आहोत ते... आत्ता आत्ता मोबाईल आले, ह्या दशकात इतर अनेक संदेशाची साधने आली, दूर गेलेली नाती जवळ येऊ लागली... जवळची नाती आणखीन जवळ आणि घट्ट व्हायला लागली! टपाल कार्ड, चिट्ठी, सर्व काही कालबाह्य झालं, आणि वाट पाहणं संपलं! क्षणात एखादा निरोप, संदेश, फोटो,व्हिडीओ, एखादी मनीची व्यथा, आनंद किंवा मधेच विरंगुळा म्हणून एखादा खुसखुशीत विनोद सर्व काही दुसऱ्या पर्यंत पोहोचतं!

 आता प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, आणि आता तर बोलण्यासाठी पैसे पडणार नाहीत अशी सेवा उपलब्ध होत आहे, मग काय? माणसाला आणखीन काय हवे? आपल्याकडे म्हणजे भारतीयांना  तसंही बोलायला आवडतं! म्हणजे माणूस मागतो एक डोळा, देव देतो दोन! तसेच काहीसे झाले आहे! असो,  अशी सेवा देणारे खूप प्रगती करोत, सम्पन्न होवोत, आम्हालाही सम्पन्नता येवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना!

अर्थात अशा व्यत्ययामुळे आर्थिक किंवा इतर काही  नुकसान होते, पण ह्या टेक्नॉलॉजीच्या जाळ्यातून सुटका मात्र नाही... जायचा मार्ग आहे, न परतीचा मार्ग तितकासा सुगम्य नाही. पण कधीतरी, थोडा वेळ, काही तास, काही दिवस ह्या उपकरणां पासून मुक्त राहून बघावं हे मात्र नक्की! खूप मजा येते! मन शांत, स्थिर, प्रसन्न करायचा रामबाण उपाय तर आहेच, पण  थोडा वेळ स्वतःला शोधण्याची,  अंतर्मनाशी संवाद घडण्याची पण सुवर्णसंधी असते!   

Saturday, 8 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते? ३


तिसरी पातळी म्हणजे समाजात मान्यता, प्रतिष्ठा मिळणे. जसजसा मानसन्मान वाढतो तसतसा तो माणूस जास्त प्रतिष्ठित  बनत जातो. ह्या  सर्व पातळ्यांवर जेंव्हा यश मिळवतो, तेंव्हाच पुढच्या पातळीवर त्याची कसोटी लागते. अध्यात्मिक किंवा पारमार्थिक कल्याण करून घेणे ही चौथी  पातळी होय. अशा वेळी मनुष्याची जिज्ञासूवृत्ती जागी होते आणि तो नवनवीन क्षेत्रांची, ज्ञानाची दालने उघडून आपल्या  समाधानासाठी  रस  घेतो तो यशस्वी म्हणता येईल. . अनेक वर्षांच्या सहवासातून जोडलेले ऋणानुबंध  जपायचे,नवीन  जोडायचे, स्वतःसाठी म्हणून  काही गोष्टी करायच्या आणि न वापरलेल्या क्षमतांना पंख देऊन नवीन भरारी घ्यायची . अध्यात्मिक समाधान  म्हणजे कित्येकदा वैराग्य स्वीकारून दूर डोंगरावर निघून जाणे वगैरे समजले जाते. पण हे   पूर्णपणे सत्य नव्हे. आपले आयुष्य यथार्थपणे जगल्यानंतर कुणावर भार होण्यापेक्षा लहानांना किंवा प्रज्ञावंतांना ओळखून त्यांना ह्याच  दुनियेतल्या प्रापंचिक, आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी योग्य  मार्गदर्शन करून स्वतः अलिप्तपणे त्यांची भरारी बघणे आणि   समाधान मिळवणे ही अध्यात्मिक पातळीवरची  यशाची खरी ओळख आहे. असे जो करतो तो यशस्वी होतो. इथेच आपल्या अंतर्मनाचीदेखील ओळख माणसाला होते हे नक्कीच. ह्यातूनच वैराग्यभाव उदयास येतो.

स्वतःशी प्रामाणिक रहाणे, निर्भयतेने  निर्णय घेणे व अमलात आणणे आणि माणुसकीचा झरा सदैव मनात वाहता ठेवणे हे महत्वाचे आहे. ह्या सर्वातूनच एक यशस्वी व्यक्तिमत्व उदयाला येते. संवेदनशील मनाने नवनवीन विकल्प शोधून समाधान मिळविणे हीच स्वतःच्या सुखाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.

प्रत्येक पातळीवर आपल्या वाट्याला येत असलेल्या असंख्य संधींमधून  योग्य मार्गाने, योग्य संधीचा फायदा घेऊन त्या पातळीवरच्या गरजा भागविण्यासाठी क्षमता असली पाहिजे. प्रापंचिक गरजांपासून अध्यात्मिक गरजांपर्यंत सर्व गरजांना योग्य वेळी, योग्य तेवढेच प्राधान्य देऊन भागवल्या, तर कमीत कमी वेळ आणि कमीत कमी श्रम खर्ची पडतील, आणि इतर काही गोष्टी करायला, काही  छंद जोपासायला वेळ मिळेल.

 परंतु,जीवनातल्या कोणत्याही पातळीवर जो भगवंताला विसरत नाही, त्याला कधीच अपयश येणार नाही. परंतु, एरवी कधीच भगवंताचे समरण केले नाही आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी, यातनांमध्ये त्याचे समरण केले तर काय   उपयोग? "सौ चुहे खाकर बिल्ली हजको चली", किंवा "करून सवरून दमले, आणि देवपूजेला लागले"असे होऊ  नये,ह्यासाठी विवेक हवा आणि तारतम्य हवे.

तेंव्हा, ह्या चारही पातळ्यांवर ज्याने समाधान मिळवले व दिले, सुखाची देवाण_घेवाण पण केली त्यालाच एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' म्हणता येईल.

  । समाप्त।   
.

Wednesday, 5 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते?... २




कित्येक वेळा आपण ज्याला यश म्हणत असतो ते इतरांच्या दृष्टीने अपयश असते. जे सत्ताधीश असतात ते सत्ता मिळवतात आपल्या सुखासाठी. परंतु ही सत्ता आल्यानंतर मात्र, ती हातातून कधी निसटून जाईल ह्या विवंचनेत त्यांची सुखशांती केंव्हाच भांग होते आणि मग शिल्लक राहते ती सत्ता टिकवण्यासाठीची अव्याहत आणि कित्येकदा केविलवाणी धडपड. ज्यांच्याकडे अतिजास्त प्रमाणात सम्पत्ती असते त्यांचे  पण अनेकदा असेच होते. ही सम्पत्ती टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी, सतत झटतात, सुखाची व चैनीची साधने निर्माण करतात, पण त्यांचा उपभोग घ्यायला वेळ मात्र मिळत नाही.

अर्थात, सगळायच यशस्वी लोकांच्या बाबतीत असे  होते असे मात्र मुळीच नाही. अनेक मंडळी कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारीचा समतोल राखताना दिसतात. त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आघाडीवर देखील यश सम्पादन करतात. वयाने, अनुभवाने सिद्ध झाल्यानंतर अध्यात्मिक दृष्टींनी देखील पुढील पिढीस मार्गदर्शन करतांना दिसतात.  कारण,अध्यात्मिक दृष्टीने यशस्वी होणे म्हणजे वैराग्य पत्करून निघून जाणे नव्हे, तर निःसंग वृत्तीने, विवेकाने, पुढच्यांना ह्याच जगातील त्यांच्या  प्रापंचिक,व्यावसायिक, सामाजिक, आर्थिक आघाड्या सांभाळण्याची शक्ती प्रदान करणे व अनेक नवीन कार्य सिद्धीस नेणे हे होय. यासाठी कालपरत्वे आलेल्या ज्ञानाने, कौशल्याने आणि वय व अनुभवाने जे ऋणानुबंध जोडलेले असतात त्यांचा वापर करून आपल्या स्वत्वाची नवीन ओळख करून आंतरिक समाधान मिळवता येते.

तेंव्हा, ह्या सर्वांचा उहापोह करतांना हे लक्षात येते की यशस्वी व्यक्तिमत्वाचे काही निकष आहेत आणि व्यक्तिमत्वाची पारख ह्या निकषांच्या आधारावर करावी लागेल. यशस्वी व्यक्तिमत्वासाठी त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्यात घडलेल्या अनेक स्थित्यंतराचा अंदाज घेतल्यास असे दिसते की यशाची परिभाषा, यशाचे मोजमाप हे प्रत्येक वेळेस बदलत असते. मनुष्याच्या अनेक पातळ्यांवर अनेक गरजा असतात.

पहिल्या पातळीवर असतात प्राथमिक गरजा, म्हणजे पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा आणि शारीरिक सुख. हे सर्व पुरेशा प्रमाणात व योग्य मार्गाने मिळाले की मनुष्य सुखी होतो. या सर्वांसाठी लागणारे आर्थिक बळ माणसाला लाभले की तो यशस्वी म्हणायचा.

नंतरची पातळी आहे ती मानसिक भूक. ही मानसिक भूक भागवली तर मनुष्य सुखी होत, यशस्वी होतो. प्रेम, वात्सल्यभाव, मैत्री इत्यादींची इच्छा पूर्ण होणे हे यशस्वी व्यक्तिमत्व घडणीत महत्वाचे आहे.

ह्या दोन्ही   पातळींवरील सुबत्तेमुळे तो आपली स्वतःची एक ओळख बनवतो आणि समाजात स्वतःचे स्थान बनवतो.


Tuesday, 4 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते?1





 आजपासून मी माझ्या ब्लॉगचे टायटल बदलून,'SPICE  N  SLICE OF LIFE ' ठेवले आहे. आयुष्यात रोज येणारे नवनवीन विचार, नवीन प्रेरणा, नवीन संकल्प घेऊन रोज काहीतरी लिहायचं असं ठरवलं आणि नवीन सुरुवात केली आहे.

 २००४ साली बंगलोरला असतांना माझा एक लेख महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक अंकात छापूनही आला होता, आणि त्याला त्या विषयातलं पाहिलं पारितोषिकही मिळालं होतं. तो लेख मला स्वतःला पण फार आवडतो.  आमच्या नाशिकच्या 'गावकरी' वृत्तपत्रात किल्ल्यांवर लिहिला होता तो लेख  पण मला फार आवडतो. तर मला वाटलं म्हणून मी तो लेख पुन्हा ह्या ब्लॉगवर टाकत आहे. क्रमशः असेल..

विषय होता 'यशस्वी  निकष कोणते?

जगातल्या अनेक सुप्रसिद्ध, ख्यातनाम आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक पटींनी ऐश्वर्यसम्पन्न अशा व्यक्तींना पहिले की त्यांच्याबद्दल मनात एक अप्रूप निर्माण होते. त्यांच्याबद्दल लिहिलेल्या ,बोललेल्या, व सांगितल्या जाणाऱ्या  बातमीवर आपण कान टवकारतो, लक्षपूर्वक वाचतो व मनात साठवतो. ह्या अशा गुणसंपन्न, ऐश्वर्यसम्पन्न व्यक्ती एवढ्या यशस्वी कशा व का होतात? त्यांना पावलापावलावर मिळणारे यश, कौतुक पहिले की आपल्याला पण त्यांच्यासारखेच काही कार्य करून यशस्वी होण्याची इच्छा होते. पण शेवटी यशाचे मोजमाप काय? यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते? हे समजून घेणे आवश्यक आहे.

अनेक मोठ्या क्रांतींचे जनक जे क्रांतिवीर, मोठमोठे राजकीय नेते,प्रतिथयश उद्योजक, खेळाडू, सिने नाट्य जगातील दिग्गज कलावंत या सर्वांच्या आयुष्यात त्यांनी जे उत्तुंग यश मिळवलेले दिसते, ते इतर अनेक गोष्टींचे बलिदान देऊनच. परंतु या यशामागे त्या   व्यक्तींनी सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांनी उमेदवारीच्या काळात सोसलेले टक्केटोणपे, त्यांच्या शत्रूंच्या कटकारस्थानांचे किस्से या सर्वांचा आपल्याला अनेक वेळा विसर पडतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती गोष्ट प्राप्त होत नाही आणि असे मनोरथ सिद्ध होत असताना त्या व्यक्तींना कधी प्रापंचिक, सामाजिक तर कधी सांपत्तिक त्याग करावा लागतो. शारिरीक  सुखविलासांवर देखील पाणी सोडावे लागते, तेंव्हा त्यांना हे मोहवून टाकणारे यश मिळते.

 क्रमशः 

Monday, 3 October 2016

नवरात्रोत्सव... नवरंगांचा!!!



' या देवी सर्वभूतेषु,शक्तिरूपेण संस्थिता।
शांतिरूपेण संस्थिता| बुद्धिरूपेण संस्थिता|
श्रद्धारूपेण संस्थिता| मातृरुपेण  संस्थिता||
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै  नमः ||'
 
नवरात्रीची धामधूम  ,तिसरी माळआजची... देवीचा जागर, गोंधळ, विविध रूपांनी नटलेल्या देवीची, आदिमायेची पूजा होते , रास गरबा खेळून रात्र जागवली जाते,  उत्तरेत अनेक  ठिकाणी' जगराता'  म्हणजे  देवीचा गोंधळ, भजन, कीर्तन असा  रात्रभर जागर होतो.  नऊ दिवसांचे, उठता बसतानाचे असे उपवास करून देवीला प्रसन्न केले जाते. देवीच्या अनेक रूपांत कुणाला कुठले रूप आवडते  कुणाला कुठले! प्रत्येकजण आपल्याला  भावलेल्या  रूपाची यथोचित, यथासांग, यथामति पूजन अर्चन करीत असतो.
रास गरबा

ह्या भक्तीच्या उधळणीत खरे रंग भरले जातात ते गरब्याच्या रंगांनी! रात्र रंगते तसा  गरबा फुलतो! ढोलाच्या तालावर टिपऱ्यांचे ठेके धरीत फेर धरून सुंदर नृत्य करणारी मंडळी बघितली की मन प्रसन्न होतं ! मला मुळीच नाचत येत नाही त्यामुळे मी नेहमीच प्रेक्षक! आर्मी मध्ये देखील इतकी  वर्षे काढली, प्रत्येक कामात पुढे पडणारी माझी पाऊले, डान्स फ्लोर वर जायची वेळ झाली की मात्र मागे  पडायची,आजही तेच आहे! पार्टी मध्ये सगळीकडे गप्पा मारीत फिरणार, ,तंबोला खेळणार, गेम्समध्ये हिरीरीने भाग घेणार, बक्षीसही जिंकणार, पण....  डान्सची वेळ झाली की,हळूहळू व्हेन्यूच्या मागच्या भागाकडे सटकणार!  आपल्याला बघू नये असे बसणार!!!! कशालाही न घाबरणारी, कुठल्याही आव्हानाला न डगमगता सामोरी जाणारी मी.... डान्स म्हटला की अगदी 'भिगी बिल्ली' होते! भानुप्रियानी मला डान्स शिकवण्याचे अनेक असफल प्रयत्न केले, आणि मग नाद सोडून दिला! हसू येत माझं मलाच कधी कधी. पण छान, बहारदार नृत्य सादर झालेलं मला  आवडतं! नाचातल्या खाचाखोचा चांगल्या उमगतात, पण नाच मात्र करू शकत नाही! (इतरांच्या तालावर नाचायला तर मला मुळीच येतही नाही, जमतही नाही, आणि पटत तर मुळीच नाही!) मला ताल, सूर, लयीची ओळख आहे, गाणं ,मला  आवडतं! मी स्वतः पण विरंगुळा म्हणून सतत गाणी म्हणत असतेच, पण कोणत्याही भाषेत एखादे सुमधुर गाणे ऐकायला मिळाले, तर मनाला खूप प्रसन्न वाटतं! पण कोणत्याही कलेचा अवमान केलेला मला रुचत नाही. उगीच आपलं करायचं म्हणून.. हे मला रुचत नाही.

मी आता आमच्या घराजवळ जो  नवरात्रीसाठी मांडव टाकलाय, तिथे बघते ना... दोन  मोठे  गोल फेर असतात.. एका फेरातली माणसं  उजवीकडून डावीकडे आणि दुसऱ्या गोलातली डावीकडून उजवीकडे ... , मुलं , माणसं , बायका येतात, अगदी नटून थटून, सुंदर सुंदर कपडे, मेकअप वगैरे वगैरे.... पण, गरबा कसा खेळायचा?  लोकांनी एकमेकांना टिपऱयांवर ठेका द्यायचा, पुढे जायचं, पुढच्याला टिपरीचा ठेका द्यायचा, पुढे जायचं! गाणी एक्दम ढिनच्यॅक लागलेली असतात, पण ही सर्व मंडळी अगदी हळूहळू, स्लो मोशन मध्ये फिरत असतात... म्हणजे ठेका हा शरीराच्या हालचालीत कुठेच नाही! एकदम संथ! इतकं बोअर होतं  की  काय सांगू! असं तासांच्या  चालतं...  मस्त,ठसकेबाज गरबा कुठेच दिसत नाही. म्हणूनच मघाशी म्हटलं तसं , उगीच आपलं खेळायचं म्हणून खेळायचं, झालं. असो, तर  नवरात्रोत्सव,भक्तीने, आनंदाने जल्लोषाने साजरा करूया...  चला!!!     

Friday, 30 September 2016

पितरांचे पुण्यसमरण...चालीरितींच्या आणि रूढींच्या विळख्यात...


 आजकाल माणसं फार असंवेदनशील व्हायला लागली आहेत खरी... आजच पेपरमध्ये बातमी वाचली... तीर्थक्षेत्री पितरांना दिलेल्या नैवेद्याला काकस्पर्श व्हावा ह्यासाठी लोक काय काय करतील ह्याचा नेम नाही! एका ठिकाणी काकस्पर्श व्हावा ह्यासाठी बराच वेळ मंडळी ताटकळत बसली होती. आणि तिथेच थोड्या अंतरावर एका झाडावरून एक अडकलेला कावळा खाली काढला गेला होता, तो जखमी आणि निष्प्राण अवस्थेत होता. तर  हीच मंडळी ते नैवेद्याचे ताट घेऊन तिकडे धावली, कि उपाशी कावळा अन्नाला खाईल तर काकस्पर्श होईल... पण तो कावळा त्या मनःस्थितीतच नव्हता, आणि तेवढी ताकदही त्याच्यात नव्हती. मग मंडळींनी काय शक्कल लढवली बघा हं... कावळ्याची चोच पकडून त्यांनी अन्नाला लावली... काकस्पर्श झाला... मंडळी खुश!

पण कुणी त्या कावळ्याला  पाणी दिले नाही,  त्याची काळजी  केली  नाही, फक्त आपला स्वार्थ बघितला...

ह्याच संदर्भातला दुसरा किस्सा असाच... विचार करायला लावणारा..

आजकाल वृक्ष तोडीमुळे आणि नवीन वृक्ष लागवड न झाल्यामुळे, पक्ष्यांची आणि पर्यायाने कावळ्यांची संख्या कमी  झाली  त्यामुळे काकस्पर्श करून घेण्यासाठी लोकांना अक्षरशः अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे काही लोकांनी   तोडगा असा काढला काढला की, कावळ्या ऐवजी गाईलाच नैवेद्य दिला!

मग असं वाटतं  की आधीच्या बेरहम लोकांपेक्षा ही मंडळी बरीच म्हणायला हवी! निदान कुणाच्या मुखी अन्न लागले तरी...

तर परंपरांचा अवास्तव अट्टाहास सोडून द्यायला  हवा ,नवीन विचार हवेत, नवीन कल्पनेतून देखील पितृदान   करता येते हे बघितले पाहिजे. साधनांच्या पूर्ती मध्ये न अडकता' साध्य'   साधले पाहिजे!

आपल्याला पूर्वजांची आठवण राहिली पाहिजे ह्यासाठी हा संस्कार आहे तर मग काही क्षण स्वस्थ बसून आपल्या आईवडिलांची, इतरेजनांची आठवण काढा, चांगल्या गोष्टी आठवा, त्यांचे जगणे   कसे तुमच्या आयुष्यात सुख देऊन गेले हे त्यांच्या पाशी व्यक्त करा, आणि मग बघा, इतर कोणत्याच  साधनांची आवश्यकता पडणार नाही... आणि ह्या दिवशी कोणतेही सोपस्कार न करता, पितरांच्या शांतीसाठी दान करावे म्हणजे सर्व काही साध्य होते.. दान म्हणाल, तर दान हे प्रेमळ अंतःकरणाने, पितरांच्या मायेची, त्यांच्या ऋणाची आठवण ठेवून व्हावे आणि मुख्य म्हणजे दान हे सत्पात्री व्हावे ह्याची दक्षता घेतली, तर दान हे पुण्यकारक ठरते.  

Tuesday, 20 September 2016

डाएट आणि मी?????




आजकाल डाएटचे इतके फॅड झाले आहे, आणि इतके स्तोम माजवले जाते, की काही विचारू नका! रकानेच्या रकाने भरून लिहिलं जातं, तेवढंच ते वाचलं जातं, पण प्रत्यक्ष कृती? काहीच नाही... हसू नका , हे सत्य आहे.अनेक   जातात पण किती पाळले जातात ते त्या मंडळींनीच माहित!

पण एक मुद्दा मात्र मला नेहमी पटतो, तो हा की आपल्या पूर्वजांनी जे अन्न खाल्ले, तेच आपल्याला पण पोषक नक्कीच आहे. साधं, सकस, पौष्टिक आणि चौरस आहार हाच  शरीराला, मनाला, बुद्धीला, आत्म्याला, आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण  जीवनाला तृप्तता देतो.

पण जीभ हा अवयव असा आहे की ज्यामुळे ह्या भूतलावर खवैय्ये कालही  होते,आजही आहेत, आणि येणाऱ्या काळात पण असणार! मी पण त्यातलीच एक खवैय्या! माझ्या मनात सतत खाण्यापिण्याचे विचार, नवीन रेसिपी, असे  फिरत असतात. म्हणजे हे नका समजू की मला दुसरे काही उद्योग नाहीत.. पण खवैय्येगिरी करणं हे माझं  अत्यंत आवडीचं काम आहे. मी कुठेही काही खाल्लं, आणि तो पदार्थ नवीन असो वा जुना, पारंपरिक किंवा इतर प्रांतातला, मला तो नेहमी भुरळ पडतो, आणि त्याचे विश्लेषण करते, जमल्यास रेसिपी विचारून घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करते जो कधी जमतो कधी फस्तो ... तरी पण माझ्या ज्ञानात भर नक्कीच पडते!

माझं सांगू का काय होतं ? मी घरी जेंव्हा एखादा पदार्थ करते, आणि तो  उत्तम होतो, तेंव्हा मी खुश होते! पण फसला तर मी कधी कधी डिप्रेस होते, नाही असे नाही, पण मग चुकीचे  विश्लेषण आणि पुन्हा कधीतरी तो प्रयत्न करायचा, तेंव्हा हमखास यश मिळते! खास करून केक बनवते तेंव्हा असे होते की केक जर उत्तम, म्हणजे स्पॉंजी, आणि सुंदरसा बेक होऊन बाहेर आला, त्याचे  मनासारखे काप झाले, तर मी त्याकडे समाधानाने बघते, आणि केक डब्यात भरून ठेवते! मला मग तो खायची इच्छाच होत नाही! तो दुसऱ्यांना  खिलवण्यात जाम मजा येते, खरं सांगते! अजबच आहे ना असे होणे? पण माझे असेच होते खरे... हेच केक बिघडला, तर पुढे बरेच दिवस तो माझ्या समोर फिरत राहतो, डिवचत राहतो.. मग पुन्हा विश्लेषण, पुन्हा प्रयत्न.... पण त्या आधी बिघडलेल्या केक मधून नवीन काहीतरी पुडिंग तयार करते! मग हीच नवीन डिश माझ्या रेसिपी बुक मध्ये घाईघाईने लिहून ठेवली जाते. मग एखादे दिवशी, चांगल्या जमलेल्या केकचे हेच पुडिंग बनवून खातो आम्ही दोघी! भानू आणि मी!

 

भुकेचे संकेत आणि आपला आहार





मंडळी, बऱ्याच दिवसांपासून मी कोणतीच रेसिपी टाकली नाही   .... माझ्या ब्लॉगचे नाव फूड इज लाईफ असे आहे, पण  आता कसे आहे पहा, आपण जसे अन्न घेतो   तसे आपण वागतो, बोलतो,जगतो असे म्हणतात. आता आयुष्याच्या  ह्या टप्प्यावर येऊन मी थोडे निर्बंध आपणच घातले  आहेत. म्हणजे गोडावर, साखरेवर, मिठावर नियंत्रण ,तसेच मैदा,चीझ,बटर, ह्यासारख्या वस्तूंवर तर संपूर्ण बंदी!(म्हणजे शक्यतोवर बरं का...हसू नका... )  एन्जॉय केलं  इतके दिवस आता बास!!  आणि असे अनेक संकेत  आपले शरीर  आपल्याला वेळोवेळी देतच असते, फक्त आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ,किंवा आपल्याला समजतच नाहीत ते इशारे... आणि  एखाद्या बेसावध क्षणी एखादा आजार आपल्याला पकडतोच... मग  ते इशारे, ते संकेत लक्षात  येतात,आणि  संबंध कळतो, पण मग उशीर झालेला  असतो ना...मग  धावाधाव,पळापळ, डॉकटर, औषधं  वगैरे,वगैरे... तब्येत ठीक झाली की पुन्हा तेच ..  येरे माझ्या मागल्या...  असो.

तर कालच मी वरील सर्व नियम धाब्यावर बसवून पास्ता बनवलाच...,

पास्ता उकडून ठेवला.भांड्याला तेलाचा हात लावला म्हणजे पास्ता चिकटत नाही. उकडताना पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल आणि मीठ टाकले, पास्ता उकडून गाळणीतून गाळून  पाण्याखाली मोकळा करून घेतला. ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उकडलेल्या भाज्या   घालून फ्राय केले. नंतर पास्ता घालून नीट मिक्स केले.
एका बाऊल मध्ये thai  green curry paste, टोमॅटो सॉस, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, क्रीम, दूध, कोथिंबीर घालून, पाणी घालून पेस्ट तयार केली, ती घातली. मिक्स केले. शेवटी  कॉर्नफ्लोर पाण्यात मिक्स करून ते घालून नीट करायचे, वरून चीझ किसून घालायचे, आणि   गरम गरम सर्व्ह करायचे... म्हणजे मी ते लगेच मट्ट केले!

टीप: पास्ताच्या आकारा प्रमाणे भाज्या कापाव्यात, म्हणजे डिश  छान दिसते.. म्हणजे लांब पास्ता असेल तर भाज्यांचे लांब तुकडे करायचे, आणि शॉर्ट पोस्ट असेल तर भाज्यांचे चौकोनी तुकडे करायचे..

हे सगळं असलं तरी आपल्या वयानुसार, प्रकृतीनुसार, हवामानानुसार, ऋतूनुसार,जेवणाच्या वेळेनुसार आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराचे संकेत ऐकून खावे, म्हणजे मग त्रास होत नाही, हे मात्र खरं!   
 

Sunday, 18 September 2016

पूर्वजांचे समरण करू यात....



 पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांना आठवावे, त्यांच्यासाठी काही गोडधोड नैवेद्य अर्पण करावा, त्यांना तृप्त करावे. ह्यामुळे त्यांचे आशीर्वाद द्विगुणित होऊन आपल्या पाठीशी राहतात. त्यांचे ऋण  मानावे, त्यांनी एकोप्याने, आनंदाने, एकमताने त्यांच्या लोकी राहावे, आणि आपल्याला इहलोकी समृद्धी, प्रगती, आणि यश द्यावे म्हणून त्यांच्याकडे मागणे मागावे. तसा  हा फक्त एक संस्कार असला  तरी  त्यात फार मोठा अर्थ आहे, तो समजून   घेतला तर मग ह्या संस्काराचं  महत्व कळतं.

खरं तर आपण आपल्या आई वडिलांचे, पूर्वजांचेच काही काही गुणधर्म आत्मसात करून जन्माला येत असतो. मग त्यात गुण, अवगुण, सर्वकाही आले. पण आपण एक करू शकतो, की ह्या सर्व गोष्टींचे अवलोकन करून, आपल्यातले दुर्गुण थोडे कमी, किंवा नष्ट करून, थोडे सद् गुण अंगीकारण्याचा प्रयत्न तर करूच शकतो. त्यातून आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी  नवीन,चांगले देऊ शकतो.

अनेक वेळा आपण काही काही अंधश्रद्धा बाळगून असतो. पण आता आपल्याला माहित झालंय की ह्या अंधश्रद्धा आहेत, तर मग त्याच पुढे मुलांना पाळायला न सांगता, त्यांना इथेच मोडून टाकू यात, खरं ना?   खूप फरक पडतो...' मांजर आडवं गेलं तर...' ह्या शीर्षकाचं  पुस्तक नुकतंच वाचण्यात आलंआणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.   तसं मी पण बऱ्याच गोष्टी नाही पाळत... शनिवारी नखं  कापू नयेत, शनिवारी तेल आणू नये वगैरे वगैरे... आणि एवढे कोण लक्षात ठेवतो हो? असं करीत  बसलो,तर आयुष्य ह्यातच निघून जाईल, आणि मनातल्या गोष्टी मनातच राहून जातील.

तेंव्हा माणुसकी आणि नीतिधर्माला अनुसरून आपले काम करावे, आणि निश्चिन्त मनाने, मोकळेपणे जगावे, जगू द्यावे!

Sunday, 4 September 2016

स्वतःला शोधा...

हरितालिका पूजा
 मंडळी, हरितालिका पूजन झाले, आता  गणेश स्थापना झाली, दहा दिवस नुसती धूम!!! गणपती, मग गौरी...आनंदाचा, खवैयेगिरी करण्याचा सण! कारण बाप्पाच मुळी खवैया! मग भक्त मागे कसे  राहतील? पूजा, आरास, देखावे, मित्र मैत्रिणी,  नातेवाईक,आप्तेष्ट सर्वांसोबत दहा दिवस आनंदाने घालवायचे, बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा, त्याला भावपूर्ण निरोप द्यायचा आणि पुन्हा त्याच्या आगमनाची वाट पाहायची!

ह्या दिवसात वातावरण मंगलमय असते, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद तर आपण मागतोय, पण त्या उद्दिष्टाच्या पूर्तीकडे जाणारी वाट आपणच शोधायची, मार्गक्रमण आपणच करायचे असते. तो आपले प्रयत्न, निष्ठा, सातत्य, सचोटी, आणि मुख्य म्हणजे आपण आपल्याला हवे असलेले इप्सित साध्य करण्यासाठी स्वतःशीच  किती वचनबद्ध आहोत ते  बघत असतो. आणि त्यावर यशाची मात्रा अवलंबून असते.

हे साध्य ठरवण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला ओळखावे लागते. आपल्या जमेची बाजू, आपल्या कमतरता, आपल्याला उपलब्ध असलेली साधनसामग्री, आणि अशा अनेक तरतुदींची पूर्तता करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम, आणि मुख्य म्हणजे इतरांची मिळणारी साथ ह्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर,  योग्य वेळी, योग्य रितीने योग्य दिशेने पाऊल उचलावे.

कधी कधी एवढे सगळे करूनही यश मिळत नाही... मग निराशा येते... पण हार नाही मानायची. पुन्हा आढावा घ्यायचा आणि काही वेगळे करून मार्गक्रमण करायचे. असे असूनही यश मिळत नाही, तेंव्हा विचार करावा की आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहोत का? तसे असेल तर आणखीन वेगळ्या विचाराने,  वेगळ्या  दिशेने पुन्हा प्रयत्न करावेत. कुठे ना कुठे तरी आपल्याला आपण' सापडतोच! जशी  मला ह्या लिखाणात मी गवसले तसेच तुम्हाला पण तुमच्यातला 'मी' गवसू शकते... 

Thursday, 1 September 2016

HOW MANY PEOPLE ARE YOU LIVING WITH?...talk by Osho

This is an article published in the Times of India, which is a talk given by Osho.It is deep, profound knowledge told in simple words, a guideline to find yourself, your identity, and an answer to the perinnial question everybody asks ,as to  how to find my inner voice, MY VOICE! After reading it carefully, I think atleast I have found an answer to my query. I have done this in my life... I am an individual with my own identity, and cannot just live life following somebody's guidance or instructions for ever! I should be able to do whatever I want to do, albeit with some restrictions, which is a rule that applies to each and every person. So, we should be able to listen to our own mind, think, and make decisions for ourself, not completely disregarding the advice of our wellwishers..our near and dear ones!

HOW MANY PEOPLE ARE YOU LIVING WITH? 

Everybody is born as one single individual, but by the time he is mature enough to participate in life, he has become a crowd. This is almost the case with everybody. Become aware of it.

If you just sit silently and listen to your mind, you will find so many voices. You will be surprised;you can recognize those voices very well. Some voice is from your grandfather, another is from your grandmother., your father, mother, priest, teachers, neighbours, friends and enemies too.All these voices are jumbled up in a crowd within you. And if you want to find your own voice, it is almost impossible, the crowd is too thick.

Infact, you may have forgotten your own voice long before. You were never given freedom enough to voice your opinions. You were always taught OBEDIENCE..to say 'yes'to everything that your elders were saying to you. You were taught that you have to follow whatever your teachers or priests are saying or doing. Nobody ever told you to search for your own voice -Have you got a voice of your own or not?

So, your voice has remained very subdued, asnd other voices are very loud, commanding, because they were orders and you had followed them_despite yourself. Naturally, only one voice is missing in you, only one person is missing in you and that is YOU. Otherwise, there is a whole crowd. And that crowd is constantly driving you mad, because one voice says, "Do this", another says, "Never do that"! "Dont listen to that voice!" And you are torn apart.

This whole crowd has to be withdrawn. It has to be told, "Now please leave me alone!"Those who went away to the mountains or secluded forests, were really not going away from society; thery were trying to find a place where they can disperse their crowd inside. And those who have made a place within you are obviously reluctant to leave.

But if you want to become an individual in your own right, get rid of this continuous conflict and mess within you; then you have to say goodbye to them_even when they belong to your respected father, mother anyone else dear to you. It does not matter; One thing is certain; they are not your voices. They are the voices of people who have lived in their time, and they had no idea what the future was going lto be. They have loaded their children with their own experience; and their experience is not going to match with the unknown future.

Their child is going to face new storms, new situations, and he needs a totally new conscicousness to respond. Only then is his respsonse going to be fruitful; only then can he have a life that is not just a long drawn-out despair, but a dance from moment to moment, which goes on becoming more and more deep to the last breath.

So, dont create any fight with the crowd. Let them fight amongst themselves.  Meanwhile, you must  try to find YOURSELF. The man who is HIMSELF... , unburdened of the past, Original, strong as a lion and innocent as a child...he can reach  the stars, or even beyond; His future is golden.

'पोया सन मोठा, नही आनंदले तोटा'




खानदेशात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला जातो. तिथे बैल देव म्हणून त्यांना 'नंदी' म्हणतात. नंदीची पूजा करून त्यांच्याविषयीचा कृतज्ञतापूर्वक असा श्रद्धाभाव व्यक्त केला जातो. या दैवताचे ऋण मान्य केले जाते.

काही अहिराणी भाषेतील ओव्या आहेत, त्या आताच एका लेखात वाचल्या...खूप सुंदर आणि पोळ्याचे नेमके दर्शन घडवणाऱ्या आहेत ह्या ओव्या...

'फूटनं  तांबडं तांबडं, ऊन पडनं पिवय पिवय
आज पोया भागना , नंदीस्ले घाल आंघोय' ,... नंदीला पहाटे  अंघोळ घालायची


'धवया पिवया वाघ डकारे गल्लीत
भाऊ तुन्ह धवय धन, गोठानं घरात
भाऊ धवय धन तुन्ह, असामानना तारा,
या दैवतेस्नी नही, लागू दिन्हा ऊनवारा'... नंदीच्या ढवळ्या पिवळ्या रंगावरून नावं पडलेले हे नंदी गल्लीत मात्र वाघासारखे असतात. बहीण  म्हणते भाऊराया, तुझ्या गोठ्यातले हे' धवल धन'  असेच आसमंतातला तारा राहो, ह्या दैवताला कधीही ऊन, वारा, पाऊस न लागो, म्हणजे त्याची तब्येत उत्तम राहो!

'मन्हा धवया पवया, शमी शिंगडे पितयनी
संगे रेशमन दोर, बाशिंग मोरखी आरसानी'..... पोळ्याच्या दिवशी गावाच्या वेशीवर नारळाचे तोरण, आणि नोटांचे तोरण बांधतात. 'पोयना बाजार' भरतो, त्यात बैलांना सजवायची वस्तू मिळतात.. रंग, भिंगाच्या कलाकृती, भरतकाम केलेल्या झूल, नथी, दोर, गोंडे, घुंगुरमाळा, घाट्या , शाम्या अशा वस्तू असतात. त्याचे हे मायमाउलीने केलेले वर्णन!

ह्या दिवशी बैलांची शर्यत पण होते, ज्यात गावच्या पाटलांच्या बैलांचा मान मोठा असतो. पाटलांनी मारुती समोर नारळ वाढवला की 'पोळा फुटला' असे म्हणतात आणि मग मिरवणुकीला सुरुवात होते. पाटलांची बैल पहिले दरवाज्याचे तोरण भेदून पुढे जाणार! 'दरवाजानं तोडतस' असे अहिराणी भाषेत माउली म्हणते''


'सनमान सन, शिजे पोयानं पुरनं,
भाऊना नंदी, फ़ंदी तोडी उना, दरवाजानं तोरन'... पाटलाची लेक कौतुकाने सांगते की हा मानाचा सण, त्यासाठी शिजवले पुरण ...  माझ्या भावाचा नंदी भेदिलं तोरण!


पाटलाच्या बैलांचे कोण कौतुक !.. लेक म्हणते..
. 'आयबा पोलीसपाटील, दोधान्ना मौजना,
आठ हजारनी जोडी, साज तिले सोनाचांदीना'...बाप पोलीसपाटील, घरात दूध, अन्नाची काही मोजदाद नाही! आठ हजाराची जोडी त्याला सोन्याचांदीचे दागिने!

बागलाणातील खापरावर शिजवलेल्या सुवासिक खान्देशी पुरणपोळी बैलांना खायला देतात, अंगण सजलेले, बैल सजलेले, गृहलक्ष्मी सजलेली ... अप्रतिम ;अशा ह्या देखण्या सोहळ्याचे वर्णन करतांना माउली म्हणते...
'जोडी उभी आंगन मा, आंगन त्यास्लेच वडे,
लावू कपायी तांदूय, आरतीमा तेज पडे'.... अंगणात उभ्या बैलजोडीला कपाळाला तांदूळ लावते तेंव्हा आरतीचे तेजच वाढते!

गावात जतिभेद न बाळगता बैलांना प्रत्येक घरात ओवाळले जाते, पुरणपोळी दिली जाते. अहिराणी संस्कृतीने ही एकात्मता आजही सांभाळली आहे.  मुक्या प्राण्यांसाठी उदात्तता आणि उत्कटता दिसते ती अशी'''
'आज पोयाना सन, खाऊ पोटाले काहीमाही
धवया पवया देव मन्हा, तुम्हले देस  पुरणपोयी'

बैलजोडीवर पुत्रवत माया करणारी माउली पुढे म्हणते..
. 'वाज वाज रे मांग भाऊ, नाचू दे रे धवया पवया,
तुन्हा डफडाना जोडले, खुय खुय करे घुंघुरमाया'... ढवळ्या पवळ्याला डफ तुतारीचंता तालावर नाचू दे, तेंव्हा त्यांच्या गळ्यातल्या घुंघुरमाळा खूळ खूळ आवाज करतील, ते कानाला किती गोड वाटते!

आणि शेवटी...
'पोया पोया करू, पोया कुणबीना आसरा
नंदिले ववायाले, सन नही ना दुसरा
देशी देवराया धनसम्पत्ती थोडी थोडी
पायनामा हरी, अंगनी नंदीस्नी जोडी'.... कुणबी लोकांचा खरा आधार असलेल्या ह्या नंदीला ओवाळायचे , आणि देवाकडे मागणे मागायचे, की देवा, धनसम्पत्ती थोडी थोडी दे, पण अंगणी  माझ्या बैलजोडी नांदू  दे!
 

Wednesday, 31 August 2016

बैलपोळा...बळीराजाच्या बैलजोडीचा मानाचा दिवस!

बैल पोळा

बैल पोळा च्या सणाचे महत्व शहरातल्या मंडळींना फारसे कळणार नाही, कारण तिथे शेतकरी नाही. मलाही काही वर्षां पूर्वी पर्यंत ह्या सणाचे खरे रूप कळले नव्हते. पण इथे अवतीभवती अशी वस्ती आहे की जे शेतकरी वर्गाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतात प्राणी भरपूर! बैल, गाई, म्हशी, डुकरं, कोंबड्या, कुत्री मांजरी, कधी कधी गाढव, घोडे देखील! ह्या मंडळींच्या घरी बैलपोळा सण साजरा होतांना दिसतो आणि त्याचे महत्व पण कळते.

कधी कधी आपण पालक म्हणून मुलांना एक्दम म्हणून जातो बघा , 'बैल आहेस नुसता' म्हणजे थोडक्यात मठ्ठ, उनाड, बिनकामाचा, बेअक्कल वगैरे वगैरे... पण ज्याने बैल आणि त्याचे योगदान जवळून बघितले किंवा माहित करून घेतले तर तो मात्र असे म्हणणार नाही. म्हणजे मुळात आपल्या मुलाला बैल किंवा कोणताही अपशब्द वापरणे म्हणजे त्याच्या ह्या गुणांची अंशतः जबाबदारी आपलीच असल्याचे मान्य  करण्यासारखे आहे ना? हे  कळलं तर मग कधीही आपण अपशब्द बोलणार नाही  हे नक्की!

तर सांगायचं मुद्दा हा की बैल हा फार मेहनती,  न डगमगता तासांच्या तास कष्ट करणारा प्राणी आहे. कधी आजारी पडला तर शेतकऱ्याच्या जीवाची दैना होते, जीव थोडा थोडा होतो,काम थांबून जाते, पण जेंव्हा बैल  तंदुरुस्त असतो तेंव्हा शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत असतो! ह्याच्यावर सर्व शेतीची कामे अवलंबून असतात. त्यामुळेच तो शेतकऱ्याचा मित्र असतो.लाडाने  ढवळ्या पवळ्या, सरजू बिरजू काळू  बाळू, शिरप्या हणम्या आणि आणखीन अशाच छान नावांनी संबोधल्या जाणाऱ्या अशा बहुमोल मित्राचे आभार मानायचा दिवस म्हणजे बैलपोळा!

मग ह्या मित्रासाठी काय करतात? सकाळी बैलाच्या जोडीची पूजा  करतात,त्यांना  ओवाळतात,  पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्याला  आराम असतो  ह्या  दिवशी...त्याचा मनाचा दिवस असतो तो! मग संध्याकाळी त्याला छान सजवून मिरवणूक काढतात...रंगबिरंगी  झूल, गळ्यात रंगीत माळा, शिंगांना रंगरंगोटी करून पायात घुंगरू, रंगीत धाग्याचे तोडे, आणि कपाळी  कुंकवाचा टिळा अशी ही बैलांची जोडी ढोल ताशांच्या गजरात गावात फिरून येते, आणि विश्रांतीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने, हा शेतकऱ्याचा मित्र कामाला लागतो!





       

Friday, 26 August 2016

GOD-CONSCIOUSNESS- Way to Eternal bliss!!

I came across an article which I had pasted onto my book's back page. A very interesting article on how to learn to take a back seat, in short lessen your ego and LET GO of things, emotions, hatred, possessions, negative energies which abound in our body, mind, heart, soul and our aura. These negative emotions place unnecessary burdens on our souls and if we do not let them go and harbour all kinds of egos within us for longer than they ought to be within us,and with no respite from such feelings, ther is more hatred, bad blood and yet more hatred. We are slowly killing ourselves and our souls will not rest in peace anytime soon. Its written by  Sadhu Vishwamurtidas.


LEARNING TO TAKE A BACK SEAT 

Some people are compulsive exhibitionists. You can find them almost everywhere, they would do anything to get noticed. At a weddding, they want to be the bride and at a funeral, the corpse.

Julius Caesar, who was an incorrigible egotist, was kidnapped when he was a child. He was held for a ransom of 11,000 gold pieces. Horrified, he exhorted his captors to raise the ransom amount to 2,50,000 gold pieces so as to preserve his prestige!

William Shakespeare said; "Praises are my wages." Agreed American writer Mark Twain. "I can live an entire week on compliments alone." More recently, musician Elton John said; 'Even if I had only a single finger left, I would play the piano to be loved.'

There are very few people who don't like to be the centre of attraction. They are the ones who are able to derive their nourishment from within. They are the true giants of humanity; the others are insignificant.

It is said that a famous boxer once refused to tie his seat-belt aboard a plane. "Superman doesn't need a belt." Tying his belt for him, the airhostess replied,"Superman doesn't need a plane either."

The truly great are those who know their weaknesses and aren't afraid to admit them. They accept their limitations and blend with the  crowd because they know that when it comes to the basics, everyone is the same.

Whether rich or poor, American, Afghan or Indian, we all have the same emotions deep within us- to protect the family, educate children, provide for healthcare, to be free to walk the streets in safety, to have time for oneself, to contribute to the good of the world and to leave one's mark, however small, on history. And the last is something all human beings do-for better or for worse. Even an ant does not go through this world without affecting its outcome in some way.

 From the worldly perspective, humility can be imbibed by realising that the population of the planet is six billion. If there was only one person on earth, he would have all the rights of law, legislation, amendment and ownership.

Today, six billion people share equal rights - that is just one six billionth rights per person! Yet, unable to come to terms with this reality, some people behave as though they are the owners of the planet.

They are unable to take a back seat in any subject. They demand to be consulted before any decisions are made. They demand to be glorified and welcomed at every meeting. To sustain their narcissitic belifs, some can go to the extend of humiliating others under any banner or disguise, whether it be religion, country or justice or anything else.

God-consciousness is the permanent cure for ego-mania. Ego usually translates into 'he-go' or 'she-go' With God-consiousness, it transforms into 'I-go'. Explains Lord Swaminarayan: "When one realises the infinite greatness and glory of God, where is there any room for self-pride?"







S

Thursday, 25 August 2016

गोविंदा आला रे आला!!!


 आज गोपाळकाला, आणि दही हंडी फोडण्याची धावपळ! कृष्णाला आवडणारा गोपाळकाला बनवायला   सोप्पा, रुचकर आणि पौष्टिक देखील! गोपालकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत रानात गाई चरायला न्यायचा, मग एकत्र बसून खायचे.  तर प्रत्येक गोपालाची जशी परिस्थिती, तशी न्याहारी त्याच्या शिदोरीत असायची. पण मग उच्च नीच, गरीब श्रीमंत, असे कोणतेही भेद राहिले तर इतर गोपाळांना वाईट वाटते. म्हणून मग हा भेदभाव दूर करण्यासाठी सर्वांची शिदोरी एकत्र करून मग सगळे गोपाळ त्या काल्याचा आस्वाद घ्यायचे! तो कला किती चविष्ट लागत असेल ह्याचा  अंदाज हा गोपाळकाला  खाल्ल्यानंतरच येईल!

 गोपींच्या घर जाऊन, मटकी फोडून दही, लोणी, दूध खायचं, बाळगोपाळांना  वाटायचं हा कृष्णाचा आवडता छंद! गोपींना द्वारकेबाहेर दूध, दही, लोणी विकायला कृष्णाची  बंदी होती . मग वाटेत  त्यांची मटकी फोडून बालगोपाळ  सर्व काही खाऊन घेत असतं! पण ह्यामागचा मोठा हेतू लक्षात  घेण्यासारखा आहे. आपल्या मुलाबाळांना,  किंवा आपल्या शहरातल्या लोकांना पुरेसे दूध,दही न देता  बाहेरच्यांना विकायचे हे कृष्णाला मान्यच नव्हते. म्हणून हा खटाटोप! मॅनेजमेंटचा हा फ़ंडा आजही लागू होतो, नाही का? स्वतःच्या जिल्ह्याचे पाणी कमी करून दुसऱ्या जिल्ह्याला द्यायचे, किंवा आणखीन पुढे जाऊन   सांगायचे तर आपल्या देशात पिकणारी उत्तम दर्जाची फळफळावळ, भाजीपाला हे परदेशात पाठवायचे, आणि इथे निकृष्ट दर्जाचे विकायला ठेवायचे.

इथे एक चातुर्मासातली गोष्ट आठवते आहे... एका राज्याचा राजा मोठा शिवभक्त होता. एकदा त्याच्या मनात आले, की महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. पण हे कसं  व्हावं? प्रधानाने सुचविले की नगरातील प्रत्येक   घरातून सर्वच्या सर्व दूध ह्या गाभाऱ्यात  ओतले जावे . झालं...  सगळ्या लोकांनी दूध आणायला सुरुवात केली . सर्व दूध ओतलं , पण गाभारा काही भरेना. शेवटी एक म्हातारी  आली,छोट्या तांब्यात दूध भरून आणले होते ते तिने गाभाऱ्यात भरले, आणि काय चमत्कार! गाभारा दुधाने तुडुंब भरला की!

राजाला आश्चर्य वाटलं!  विचारलंच की हा चमत्कार कसा झाला. म्हातारी म्हणाली... अरे राजा तुझा आदेश झाला आणि सगळ्या लोकांनी घरातल्या मुलाबाळांच्या, लहान मोठ्यांच्या, म्हाताऱ्या कोताऱ्याच्या तोंडचे दूध  गाभाऱ्यात  आणून ओतले,  त्या सर्वांची, गाई वासरांची हाय तुला  लागली,आणि असे करणे हे देवाला आवडले   नाही...  

मी काय केले? घरचं  काम आटोपलं, मुलाबाळांना खाऊ पिऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा दिला ,त्यांना तृप्त केलं. मग मी हातात  फुलं,अक्षता,बेल आणि खुलभर दूध घेऊन इकडे आले, आणि  गाभाऱ्यात दूध ओतल्या बरोबर गाभारा भरला! बाकी काही नाही.

आजकाल दहीहंडी हे एक राजकारणाचे, व्यापाराचे, अहमिकेचे, वर्चस्व सिधद करण्याचे, थोडक्यात मसल पॉवर दाखवायचे मोठे व्यासपीठच बनले आहे.. श्रीकृष्णाने दही हंडी रचून दूध लोणी खाऊन मुलांसाठी एक खेळ म्हणून त्याचा वापरकेला . एक चेष्टा मस्करी करण्याचे साधन . त्यात कुणाचेही नुकसान नाही, अवहेलना नाही, वर्चस्व सिधद करण्याची अहमिका नाही...होता फक्त विरंगुळा आणि बालिश चेष्टा! आता तर दही हंडीचे प्रकरण थेट कोर्टातच गेले आहे...काय म्हणावे ह्याला? होतं काय, झालं काय? कुणी विचार करतोय का?

 माणसांचे मनोरे रचून  दही हंडीवर केलेला कब्जा ह्यातून श्रीकृष्णानी कदाचित असे दाखवले असावे की मनुष्याने नवविधा भक्तीतून, अष्टांग योगसाधनेतून पुढे जात, साता जन्माच्या  पलीकडे जाणारी वाट धारावी. ह्यासाठी षडरिपू  म्हणजे काम,क्रोध,लोभ, मद , मोह ,मत्सर ह्या सहा दुर्गुणांवर मात  करीत,पंचेंद्रियांना वंश करीत, चौफेर उधळलेले मनाचे दोर  आवळून ,सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांच्या पलीकडे  जाऊन, ज्ञान आणि वैराग्य ह्या दोहोंची कास धरीत आत्मज्ञान  मिळवावे,आणि शेवटी अहंकार रुपी हंडी फोडून, त्यातील लोणीरूपी परमात्म्याशी एकरूप होऊन सायोज्यमुक्ती मिळवावी.

तर समाजाने ह्या दही हंडीच्या ओंगळ, बीभत्स आणि प्रसंगी घातक,जिवघेणा किंवा त्याहूनही क्लेशलकारक असे अपंगत्व आणि लाचारी ओढवून आणणाऱ्या स्वरूपाचे पुनरावलोकन करून, पुन्हा  ह्या खेळाला  आनंदाचे रूप बहाल करावे. ह्या सर्वांसाठी मिळणाऱ्या निधीचा समाजोपयोगी कार्यात उपयोग करावा हा निर्धार केला तर काहीच अशक्य नाही.

असो. आता थोडे अवांतर . म्हणजे आज श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून पंचामृताचे घारगे केले   होते.
पंचामृताचे घारगे
 त्यासाठी : १/२ वाटी दूध, २ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून  मध, १ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून  साखर सर्व एकत्र करून,त्यात थोडी वेलची पावडर घालावी. त्यात बसेल एवढी कणीक घालून घट्टसर भिजवावे.  हळदीच्या किंवा केळीच्या पानावर पातळसर  थापून,दुसरे त्यावर दुमडून तव्यावर शेकावे. नंतर पान  काढून तूप घालून खरपूस भाजून घ्यावे. साजूक तूप आणि लोणच्यासोबत गरम गरम वाढावे..

Wednesday, 24 August 2016

कृष्णजन्माष्टमी... बालपण नव्याने अनुभवण्याची एक संधी!!




आज कृष्णजन्माष्टमी! कृष्णाचा जन्मदिवस! बर्थडे!
 आपली गम्मत हो! आजकाल सगळं इंग्लिश मध्ये सांगावं लागतं, नाहीतर पूर्ण समजत नाही! असो, तर आज रात्री अनेक  ठिकाणी कृष्णजन्म साजरा केला जातो. कृष्णाचा पाळणा सजवून, त्याला झोका द्यायचा, श्रीकृष्णाचा  जन्म झाल्याचा आनंदोत्सव साजरा करायचा. आज कृष्णाला  लोण्याचा नैवेद्य  दाखवायचा,दिवसभर उपवास करायचा, रात्री भजनकीर्तन करीत रात्र  जगवायची, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा.

हे सर्व झाले, पण मुख्य श्रीकृष्णाची लीला  साध्या सोप्या शब्दात  कळली  पाहिजे. श्रीकृष्णाची अनेक रूपे आहेत... नटखट बालक, सुमधुर बासरी वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध करणारा   कलाकार ,गीतेतून तत्वज्ञान आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ, रणभूमीवर अर्जुनाचे सारथ्य करणारा, त्याला गीता आणि त्यातला अभिप्रेत असलेला   कर्मयोग योग्य तऱ्हेने सम्पन्न करायला प्रवृत्त करणारा रणधुरंधर, नीतिशास्त्राला अनुसरून , आणि  बहुतेक वेळा मनुष्य स्वभावानुसार डावपेच खेळत बाजी तर मारणारच , पण त्यासोबत समोरच्या व्यक्तीला आपला असीम भक्त ही  बनवणारच पण त्याला  त्याच्या पापांपासून मुक्त करून मोक्ष   प्राप्त करून   देणारा  चतुर, चाणाक्ष राजकारणी, कुशल  व्यूहरचनाकार, नीतिज्ञ, बालगोपाळांचा, गोपींचा, आणि विशेष करून राधेचा हा सखा... ही  आणि आणखी  बरीच काही रूपे! ज्याला तो जसा दिसतो,त्याला तो त्या स्वरूपात भावतो!

अतुल्य शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता, निःस्पृहता, स्थितप्रज्ञ, तपस्वी,  अलौकिक वक्ता, आणि कर्मसिद्धान्त सांगणारा तरीही अलिप्त राहणारा असा हा श्रीकृष्ण... आत्ताच वृत्तपत्रात वाचलेले लेख आणि त्यातील लेखकांनी नमूद केलेले श्रीकृष्णाचे गुण...जे त्यांना भावले ते त्यांनी लिहिले!

सुदाम्याचे पोहे  आणि बालगोपाळांनी आणलेला खाऊ एकत्र करून गोपाळकाला खाऊन समानतेचे धडे देणारा, कालियामर्दन करून दुष्ट प्रवृत्तींना आळा  घालणारा, अहंकार आणि लालसा हे दुर्गुण आहेत त्यांना लांब ठेवा असा संदेश देणारा, सत्यवचनी असा हा कृष्ण!

उत्तम व्यवस्थापन कौशल्य श्रीकृष्णाचा आणखीन एक गुण! योग्य निर्णय घेणे आणि त्यांची  अंमलबजावणी करणे हे शिकण्यासारखे आहे.

मला विशेष आवडलेला भाव म्हणजे श्रीकृष्णाचा लढाऊबाणा! ह्याच लेखात पुढे वीरचक्र विजेते कर्नल. साळुंखे लिहितात की, वेगवेगळ्या व्यूहरचना करून शत्रूंचा नाश केलेल्या ह्या लढवय्याच्या अनेक रणनीती भारतीय सैन्याने देखील अंगिकारल्या आहेत, ज्यायोगे अनेक वेळा शत्रूला नामोहरम केले आहे.अवघ्या ५८ भारतीय  सैनिकांनी दोन हजाराहून अधिक संख्येने आलेल्या शत्रूला नामोहरम केले होते. अर्थात असे अनेक किस्से आहेत भारतीय सैन्याचे.. पण मग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील पुढे जायचे ह्या श्रीकृष्णाच्या सिद्धान्तावरच तर सैन्याला प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच  हा परिणाम असतो! 'आगे बढो' हाच मंत्र  भारतीय सैनिकांनी  जपला आहे असे देखील साळुंखे आपल्या लेखात म्हणतात.

पण श्रीकृष्ण म्हटला की क्षणात डोळ्यासमोर छबी उभी राहते   ती गोपाळकृष्णाची... लोणी खाणारा नटखट छोटा कृष्ण! हीच छबी जास्त लोकप्रिय आहे. आणि असावी पण. कारण इतर अनेक गुणांसोबतच जीवनात थोडे बाल्य हवे, नाहीतर मग आपल्या जगण्यातली   निरागसता, हसू, आणि गोडवा निघून जाईल...राहील ते निरस, कंटाळवाणे आयुष्य.. उगीच जगायचं म्हणून जगायचं   झाल ... म्हणूनच कदाचित प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात लंगड्या बाळकृष्णाचा टाक किंवा मूर्ती असते... घरात लहान   मुलांच्या रूपाने बालपणाचे चैतन्य आणि नखळ आनंद सदैव राहो हीच त्यामागची भावना असावी!

 

Friday, 19 August 2016

उत्तम शिष्य... आणि एकलव्य सुद्धा!

 
गुरु शिष्य संवाद

गुरु कसा असावा हे कळलं, पण गुरु उत्तम हवा तर मग आपणदेखील शिष्य  म्हणून उत्तमच असायला हवे , नाही का? मग उत्तम गुरु आपला उत्तम शिष्य कसा ओळखणार? किंबहुना आपण ज्या गुरुकडे विद्या ग्रहण करणार आहोत, त्यांचे शिष्य जसे असावेत तसे आपण आहोत का? ह्याचा विचार व्हायला हवा.

शिष्याचे ध्येय निश्चित  पाहिजे.  ध्येयपूर्ती साठी उचित  बुद्धिमत्ता, त्या अभ्यासाची रुची, कुशाग्र ग्रहणशक्ती आणि त्यासोबतच कष्ट, चिकाटी आणि मेहनत घेणे पण तितकेच जरुरी आहे. आणि हे सर्व असले तरी आपल्या गुरूंवर अनन्य भक्ती आणि सम्पूर्ण  श्रद्धा हवी, म्हणजे मग विद्या संपादनात आणखी गती येते गुरूंवर पूर्ण विश्वास असला म्हणजे मग शिष्याचा स्नेह आणि प्रेम पाहून गुरु समाधान पावतो हे नक्कीच. आपला शिष्य हा आपल्या पुढे प्रगती करतो आहे, आपल्या पेक्षा जास्त चांगले काम करतो आहे ह्यासारखे समाधान गुरूंना  दुसरे नाही. गुरु शिकवायला तयार असतात, पण शिष्य जर शिकायला तयार नसेल तर मग अशा शिष्याचा काय उपयोग?

अर्थात, गुरूंनी नाकारल्या नंतरही, केवळ ' हाच गुरु हवा' म्हणून, त्यांची प्रतिमा समोर ठेवून विद्या संपादन करणारा एकलव्य घडलाच  की! पण मग त्याची अपार निष्ठा कामी आली हे सत्य आहे. असे अनेक एकलव्य  असतात, पण गुरूंचे महत्व अनन्यसाधारण आहे हे नक्की.


आजकाल शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्याला इलाज नाही, कारण वाढती लोकसंख्या,घटणारी साधनसंपत्ती, भ्रष्टाचार,अनाचार, आणि उत्तम विचारांची, चांगल्या माणसांची, दर्जेदार मूल्यांची पायमल्ली! तरीसुद्धा ज्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची असते, तो अनेकानेक संकटांना सामोरे जात यश सम्पादन करतोच! आजच्याच olympics  चे उदाहरण घ्या ना... निकृष्ट दर्जाची साधन सामग्री, चांगल्या मार्गदर्शकांचा अभाव, आणि असे चांगले मार्गदर्शक असूनही राजकारणाचे बळी, खेळाडू निवडीतील राजकारण, कमकुवत नियमावली, कमकुवत राज्य व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव...आपल्या खळाडूंच्या निकृष्ट दर्जाच्या परफॉर्मन्सला कारणीभूत आहेत आणि तरी सुद्धा ह्या सर्वांवर मात करून काही खेळाडू निव्वळ आपल्या जिद्दीवर पदक मिळवून आणतात! अशी जिद्द असेल तर काय असाध्य आहे, बोला?  अशा शिष्यांना, अशा गुरूंना, आणि अशा एकलव्यांना माझे प्रणाम!  




Thursday, 18 August 2016

गुरुविण मुक्ती नाही!






 'गुरुविरहित असो नये ।नीच यातीचा गुरु करो नये। '


 गुरु शिवाय ज्ञान  नाही...   ज्ञाना शिवाय  भक्ती नाही, भक्तीशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याशिवाय  मुक्ती नाही. तर सायोज्य मुक्ती कडे नेणारा, वाट दाखवणारा सद्गुरूच असतो.  आयुष्यात गुरु अनेक असतात. आई वडील, शिक्षक, आपल्या कार्यक्षेत्रातील आपले सिनियर्स, असे इतर अनेक लोक ज्यांच्या कडून  आपण कोणतीही जीवनोपयोगी कला शिकतो  ते सर्व लोक आपले त्या क्षेत्रातले गुरु असतात. आणि आपण निःसंकोचपणे   त्यांचे योगदान मान्य  केले पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण हे ऋण मनातच नाही. संकोच  असेल किंवा  ते गुरु आहेत ह्याबाबत अज्ञान असेल, किंवा हे मान्यच नाही करायचे असे असेल तर मग हे आपल्या गुरूला  सांगायचे राहूनच  जाते. पण असे होऊ देऊ नये. कधीतरी गुरूला नमन करून त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान मान्य  करावे, त्याला वंदन करावे. म्हणून गुरु पौर्णिमेला गुरूंना वंदन करण्याची प्रथा आहे.

मी तर अनेक वेळा लहान मुलांकडून देखील काही शिकले  आहे. कधी कधी  येणारा एखादा प्रसंग  देखील आपल्याला काहीतरी शिकवून जातो ,  तर तो प्रसंग  देखील आपला गुरु बरं!  एखादा सिनेमा, नाटक, एखादे दृश्य, एखादी जीवाचा ठाव घेणारी घटना, अशा अनेक गोष्टीं मधून काही ना काही शिकायला मिळतं! तर कधी कधी एखाद्या आपत्तीमध्ये आपल्याला एक संधी चालून येते.. ती आपत्ती म्हणजे देखील गुरूच की!

तर गुरु कसा ओळखावा?  शास्त्रात लिहिल्या प्रमाणे, ज्यात्या शास्त्रातला गुरु हा सर्व ज्ञान सम्पन्न असावा, त्याच्यात  अहंकार,असूया,मानसिक विकृती, क्रोध नसावा, तो दृढवृत्तीचा  आणि निरपेक्ष असावा, स्वतः कर्तृत्ववान असला तरी गर्व नसावा. आणि  योग्य शिष्य ओळखण्याची अपार  क्षमता गुरुमध्ये हवी. तरच एक उत्तम गुरु एक उत्तम शिष्य घडवू शकतो.  उत्तम शास्त्र जरी  निवडले,तरी उत्तम गुरु नाही मिळाला तर उत्तम फलप्राप्ती म्हणजे ज्ञानर्जन होत नाही आणि मग जीवनात उत्तम प्रगती होणे नाही. समर्थांनी म्हटल्या प्रमाणे, नीच यातीतील म्हणजे नीच कुळातला, किंवा अयोग्य माणूस  गुरु करू नये.

आपल्याला ज्ञान आणि मनःशांती देणाऱ्या गुरूंना त्रिवार वंदन!      



Wednesday, 17 August 2016

राखी आणि रक्षा बंधन


'मेरे भैय्या, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन
तेरे बदले मैं जमानेकी कोई चीज न लूं ।'

 मंडळी, उद्या राखी पौर्णिमा! म्हणजे सर्व बहिणींना आपल्या भावांची आठवण होणार! नाही म्हणजे आठवण व्हायला विसरतात थोडीच बहिणी आपल्या भावांना? पण ह्या दिवसाची विशेष आठवण असते हो बहिणीला! नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा दोन गोष्टी ह्या दिवशी.

श्रावण महिन्यात मध्यावर  येणारी नारळी पौर्णिमा... ह्या दिवशीचे शास्त्रीय महत्व म्हणजे   ह्या दिवशी   जलतत्वाची पूजा करायची.. म्हणजे सृष्टीत ओलावा,स्नेह टिकून रहवा म्हणून जलाची पूजा. शिवाय ह्या दिवसात समुद्र खवळलेला असतो, म्हणून त्याला नारळ वाहून,त्याचे पूजन करून त्याला शांत करणे हा देखील यामागचा हेतू होय. कोळी  लोकांचा हा महत्वाचा सण कारण त्यांचे जीवनच मुळी ह्या समुद्रावर आणि त्याच्या लहरींवर(पाण्याच्या आणि समुद्राच्या स्वभावाच्या दोन्ही) अवलंबून !नारळ रसधातू वाढवतो, तहान भागवतो, वात आणि पित्त दोषांचे शमन करतो.  म्हणून त्याचे ह्या पावसाळ्यातले महत्व. जेवणात, नैवेद्यात नारळाचा पुरेपूर वापर ह्या चातुर्मासात होतांना दिसतो तो ह्या कारणानेच.आणि नारळाचे पीक होतेच मुळी 'आनूप देशात' म्हणजे भरपूर पाणी असलेल्या देशात! नारळीभात केला जातो राखी पौर्णिमेला ते ह्याच साठी.

तर राखी ही  मूलतः नाजूक, रेशीम धाग्याची असायची, कारण रेशीम हे घट्ट विणीचे, म्हणून बहीण भावातील नाजूक नात्यात स्नेह देखील घट्ट राहावा ही भावना.

हे झाले राखी बांधणे. परंतु त्यामागची रक्षणाची भावना देखील योग्य रीतीने समजून घेतली पाहिजे. संरक्षण  म्हणजे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक संरक्षण, विचारांचे कोंदण करून दिलेले संरक्षण  हे देखील महत्वाचे आहे. हा सण  कुटुंबातल्या सर्व सदस्यां मधील  स्नेह टिकवून ठेवण्याची जणू आपल्याला आठवण करून देतो. एकमेकांचे रक्षण करू, एकमेकांना अडीअडचणीत साथ  करू, वाट चुकली असेल त्याला समजुतीने योग्य वाटेवर आणू, असे वचनच जणू ही राखी आपल्याकडून मागते!

सर्व कुटुंबाला, आणि पर्यायाने समाजाला स्नेहाच्या बंधनात बांधू शकते   ही राखी!

 सध्या पावसाळा आहे, भाज्या अनेक आहेत, तेंव्हा ह्या भाज्या वापरून एक डिश करूयात! आजकाल डाएट चा जमाना आहे तर करूयात डाएट पोहे....
डाएट पोहे:

१ वाटी जाडे पोहे ५ मिनिटांसाठी भिजवून ठेवावेत. सिमला मिरची,गाजर,कोबी, फ्लॉवर,अशा मिक्स भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. एका बाऊल मध्ये भाज्या, पोहे,  मीठ, साखर, कोथिंबीर, चाट मसाला, भाजलेले किंवा तळलेले  दाणे, फुटण्याचे डाळे, आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करावेत डाएट पोहे.    

 

Sunday, 14 August 2016

मनावर ब्रेक... उत्तम ब्रेक!!!!!



उद्या स्वातंत्र्य दिन! म्हणजे  दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हि बाब कमी लोकांच्या लक्षात राहते. बहुतेक मंडळींना तो सुट्टीचा दिवस, मजेचा दिवस असेच वाटते, अर्थात ह्याला आपणच सगळे जबाबदार आहोत. कारण विचार करतांनाच मुळी सुट्टीचा केला जातो,मग स्वातंत्र्य दिन कोण लक्षात ठेवतो?तो पण देशाचा? आपण आपले स्वतःचे  स्वातंत्र्य बघायचे...  शाळेच्या, कामाच्या ठिकाणच्या,घरकामाच्या  किंवा इतर जबाबदारींतुन एक दिवसाची सुटका, मस्त निवांत भटकायचं, मजा करायची बस! !आणि ज्यांना धवजारोहण  वगैरे सारख्या कार्यक्रमांना हजेरी लावणे अनिवार्य असते, त्यातली बहुतेक मंडळी तो कार्यक्रम आटोपायचीच वाट पाहत त्या कार्यक्रमात सहभागी होतांना दिसतात. त्यांची देहबोली, मोबाइलवरची संभाषण, इतरांसोबतची बोलणी हेच सर्व सुचवत असतात... म्हणजे आटपा  बरं काय असेल ते, आम्हाला महत्वाची कामं आहेत. पण असे ते उघडपणे नाही दाखवू शकत ना... तीच तर भानगड आहे. तिथे मग अगदी देशप्रेम, देशसेवेचा बांधलेला चंग वगैरे दिसला पाहिजे! आतून, मनातून नुसती घालमेल चाललेली असते जीवाची... अरे नाही यार, flag  hoisting ला जायला लागणार आहे ना रे... ही  आणि तत्सम संभाषणं बऱ्याच  तरुण मंडळीं मध्ये ऐकू येतात. काय म्हणावं ह्या विचारसरणीला? कृतघ्न्ता आणि असंवेदनशीलता.  आता प्रत्येक  वेळी सिनेमा बघायच्या आधी राष्ट्रगीत लावतात, म्हणून लाजेस्तव का होईना, आपल्या देशाचे सो कॉल्ड सुजाण नागरिक हातातला बर्गर,पॉपकॉर्न, कॉफ़ी खाली ठेवून उभे राहता,  चला, हेही नसे थोडके! अच्छे दिन फिर आयेंगे, हमें पूरी उम्मीद है! तर पुढच्या वेळी सुट्टीचा विचार न करता, आपण ज्या देशाचे नागरिक आहोत,ज्या देशात आपण वाढलो,मोठे झालो, नोकरी करतो,व्यवसाय करतो, म्हणजेच अर्थार्जन करून आपले कुटुंब चालवतो त्या देशात आपल्याला असलेले अनेक प्रकारचे स्वातंत्र्य कसे उत्तम आहे ह्याबाबत कृतज्ञता व्यक्त  करून त्या ध्वजाला मानवंदना द्या,  द्या, म्हणजे बघा आपल्याला हुरूप येईल तो ह्या देशासाठी काही करण्याचा...पर्यायाने आपली प्रगती करण्याचा!

 जरुरी नाही आपण जवान बनून सीमेवर बंदूक घेऊन जाऊ तरच देशप्रेम... .आपण अनेक गोष्टी करू शकतो, ज्यामुळे आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो... घर तर स्वच्छ ठेवतो, पण परिसरही स्वच्छ ठेवुयात... आपल्याला दिलेले काम, जबाबदारी चोखपणे पार पाडू, लाचलुचपतीला आळा घालू, त्यासाठी सुरुवात आपल्यापासूनच करू... केलं तर आपण आपलं काम चोखपणे करू शकतो. त्यासाठी आहे त्या पर्यायां मध्ये,आहे त्या उत्पन्ना मध्ये कल्पकतेने आपल्या गरज पुऱ्या करता आल्या पाहिजेत! आणि गरजा  पुऱ्या होत नसतील तर आणखीन काम करा,कष्ट करा आणि पैसे कमवा, पण शेवटी तेच, काम चोखपणेच करावे लागेल. पायरेटेड गोष्टींना किंवा आपल्या शत्रू देशांमधून अवैध मार्गाने आलेल्या,  कमी किमतीच्या आणि कमी दर्जाच्या वस्तूंना प्राधान्य देऊ नका. आपल्या लोकांनी बनवलेले दिवाळीतले आकाशकंदील विकत घ्या, त्यावर हिंदू संस्कृतीची छाप असते, जी दिवाळीसाठी आवश्यक आहे. आपल्या देशाची संस्कृती दर्शवणाऱ्या राख्या विकत घ्या आणि भावांच्या हातांवर बांधा, हेच तर छोट्या छोट्या गोष्टीतले देशप्रेम, आणखीन  देशप्रेम देशप्रेम म्हणजे काय असते? आपल्या देशात उद्योग व्यवसाय सुरु करा, त्यांना चालवून अनेक हातांना काम द्या, इथल्या बुद्धिमत्तेचा वापर इथेच होऊ द्या, म्हणजे brain drain पण थांबेल. आजूबाजूला बघुयात,,,अनेक गोष्टी दिसतील जिथे आपली आवश्यकता आहे..तिथे उणिवा भरून काढूयात..आपल्या देशाच्या प्रतिमेला,प्रतिष्ठेला साजेसे कार्य करूया...   देशआपोआपच प्रगती करेल!

कुणाच्या दुःखद प्रसंगी त्याला भेटायला जाणारे पण बघा,,, नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं की तिथे जमा झालेले बरेच लोक हे त्यांची हजेरी दाखवण्यासाठी तिथे येतात. कारण मग त्यावरच  त्यांची बाहेर इभ्रत ठरणार असते ना! 'अहो तुम्ही दिसला नाहीत त्या दिवशी?' असे खोचकपणे विचारणारे भेटतात ना! वर आणिक 'आम्ही सगळे होतो, फक्त तुम्हीच नव्हतात!' असे म्हणून आपला पाणउतारा करायला तत्पर! काय म्हणायचं ह्याला?

ह्याला उत्तर एकच असंवेदनशीलता. कुणाला त्याच्या दुःखाच्या क्षणी भेटायला जा पण तिथे, त्याच्या कडच्या परिस्थितीचे थोडे भान ठेवा. त्या प्रसंगात स्वतःला ठेवा, मन तिथे ठेवा, आणि आपली तिथली भेट आवश्यकतेपेक्षा जास्त लांबवू  नका,वेळ होताच तिथून निघून जा. त्याच्याशी फक्त  धीर देण्यापुरते बोलावे. फार लांबण लावू नये,गेलेल्या व्यक्तीच्या आजारपणा विषयी, घरच्या गोष्टीं विषयी, किंवा तत्सम निरर्थक बोलू नये, ते उचित नाही . किंवा इतर लोक भेटतात त्यांच्याशी आपल्या कामाबाबत, व्यवसायाबद्दल बोल्ट बसू नये. एवढे तारतम्य बाळगावे. अशा प्रसंगी लोक फार आंबटशौकीनपण दाखवतात. त्या कुटुंबाबद्दल अनेक माहिती काढायला बघतात आणि छोट्या छोट्या गोष्टीं मध्ये नको इतका रस घेतात, कशासाठी? तुझ्या घरात कुणी डोकावलं तर तुला चालेल का? नाही ना? मग दुसऱ्याच्या घरात डोकावायला हक्क तुला कुणी दिला? बरं ही माहिती स्वतःजवळ ठेवतील तर मग काय हवं? आणखीन चार लोकांना हे सगळं मीठ मसाला लावून सांगायचं, सवंग चर्चा करायची तरच त्यांच्या जीवाला चैन पडेल.

रोज अनेक गोष्टीं मध्ये ही असंवेदनशीलता बघायला मिळते...आलेला पाहून दारातून बाहेर पडला, की त्याच्या समोरच दरवाजा लावून घेणे..उद्धटपणा दिसतो ह्यातून. तुला नसेल आवडलं त्याच येणं, कारण काहीही  असो, असे होऊ नये, करू नये. बसमध्ये रेखीव जागांवर इतर मंडळी बसतात, आणि त्या जागेचे हक्क असणारे आले तरी जागा देत नाहीत. उद्धटपणा ! माज..  दुसरं काय ? बाबा नेहमी म्हणतात... अरे बायका मुलांना म्हाताऱ्या कोताऱ्या जीवांना  अरेरावी केलीस तर त्यात काय मर्दानगी? तुझ्या बरोबरीच्या माणसाशी टक्कर दे, आणि जिंकून दाखव. मग तू बहाद्दर मर्दगडी खरा!

sense  and sensibilities... थोडा sense ठेवू यात, आणि थोड्या sensibilities वाढवू यात.

तर सांगायची गोष्ट ही की विचारांचा फोकस योग्य ठेवा, योग्य कार्य आपोआपच घडेल.. जे काम असेल त्यात मनानी रहा, म्हणजे मग कार्य नीट पार पडेलच, पण आपल्याला समाधान देखील मिळेल.. बसेसवर  लिहिलेलं असतं ना... मनावर ब्रेक उत्तम ब्रेक? थोडा प्रयत्न आपण सगळेच करूयात! मनावर ब्रेक ठेवण्याचा!

Friday, 12 August 2016

समर्थांचा प्रयत्नवाद... प्रचितीविण बोलो नाही!

'अचूक येत्न करवेना ।म्हणौन  केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना काहीकेल्या ।।'

समर्थांच्या ह्या वाक्यात प्रयत्नवादा बाबत सर्वांसाठी मोठी शिकवण आहे.  आपण कित्येक वेळा म्हणतो कि मी इतके प्रयत्न केले  पण मला एखाद्या कामात यश येतच नाही. आणि बघितलं तर आपण ,प्रयत्न तर करीत असतो,पण पाहिजे तसे यश लाभत नसते. तर समर्थांचे  मार्गदर्शन असे कि, यश येत नाही ह्याचा अर्थ  कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्की.

 तर आपण काय म्हणत असतो? माझं नशीबच खोटं आहे . किंवा दुसऱ्या कुणावर तरी आपल्या अपयशाचे खापर फोडतो, आणि आपल्या कमतरतेची भावना दाबून टाकायचा प्रयत्न   करतो.  नाही तर मग 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी ' असे म्हणत प्रयत्नच सोडून देतो. समर्थ म्हणतात दुसऱ्यांचा  दोष काढण्यात किंवा त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो, आपलेच  सामर्थ्य कमी पडते हे लक्षात घ्यावं आणि   मग हेच सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न करावेत, यश  मिळाल्या शिवाय राहणार नाही.

पण पुढे  सावधगिरी पण अशी सांगतात की,योग्य वेळी,योग्य संधी मिळताच ती ओळखून,योग्य दिशेने योग्य प्रमाणात प्रयत्न करावे लागतात, तेंव्हा यश हमखास मिळते ह्याबद्दल मनात यःकिंचितही  शंका बाळगू नका! एवढ्यावर समर्थ थांबले नाहीत तर, पुढे म्हणतात की ज्ञानाचा,अंतःप्रेरणेचा किंवा  अनुभवाचा जर वेळेवर उपयोग नाही केला तर मग हि विद्या, अंतःप्रेरणा  आणि अनुभव कुचकामी ठरतो.

अचूक प्रयत्न केले नाहीत तर काहीच साध्य होणार नाही. आणि यशाच्या मार्गावर क्रमण करतांना आपण डोळसपणे विचार केला नाही तर आपल्या उणिवा,चुका, आपल्याला कधीच दिसणार नाहीत. तेंव्हा स्वतःला  नियमितपणे तपासत राहावे, उणीव भरून काढण्याचे पर्यंत करावेत,चुका सुधारून घेण्याचा प्रयत्न करावा... तेंव्हा जे साध्य करायचे असेल ते स्पष्टपणे ठरले,की त्यासाठी योग्य प्रयत्न केले,तर काहीच कमी पडणार नाही!

 मी असे म्हणेन की मी पण  आयुष्यात ह्या प्रयत्न वादाचा उपयोग केला आणि बऱ्याच पेचांतून, संकटांतून सहीसलामत बाहेर पडले आहे आणि माझा स्वभाव पण असा आहे की मी सहजी हार मानीत नाहीच. १०० टक्क्यां पेक्षा जास्त प्रयत्न करू तेंव्हा कुठे थोडे  यश मिळते असा माझा अनुभव आहे.

 त्यामुळे समर्थ म्हणतात  त्याप्रमाणे,'आधी केले मग सांगितले'  

Wednesday, 10 August 2016

साखरपुडा, मेंदी,हळद,सप्तपदी,रिसेप्शन,आणि.... पाठवणी!


आजच्या पोस्ट साठी टायटल आधी सुचलं आणि मग लिहायला आयडिया मिळाली! होत असं कधी कधी! एक इन्स्पिरेशन हवं असतं , बस.. ते मिळालं  कि गाडी  चालून पडते आपोआप! त्याचं झालं असं की आज  भानुप्रिया आणि रविशंकर बंगलोरला परत जाणार होते, त्यामुळे आम्ही  मंडळी पहाटेच घरी   परत आलो आणि पुन्हा पुढच्या  कार्यक्रमाच्या तयारीला लागलो! आज भानुप्रियाची  पाठवणी करायची होती!  मला  ती  जाहिरात आठवली,ज्यात ती मुलगी   म्हणते की... सगाई ,मेहेंदी, हल्दी ,फेरे,  रिसेप्शन और बिदाई!पांच फ़ंक्शन्स की तैयारी?  मला हे आठवलं एकदम आणि मी हे टायटल घेतलं! हे माझं आजचं इन्स्पिरेशन! आहे कि नाही मी   हुशार? हं... पण आता घरात  मात्र डायलॉग साठी आणि   इमोशनल व्हयला वेळच  नव्हता! (सिनेमातल्या सारखा!)...  येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा पोहे करायचे  होते, दोघांचे औक्षण, स्वागत   करायचे होते  नुसती गडबड गडबड !  आई,प्रमोदिनी  लागल्या त्याच तयारीला. घर आवरण्या पासून तयारी होती! अर्थात आम्ही हुशार ना? आम्ही हे  बऱ्यापैकी करूनच  निघालो होतो!असो

सगळी मंडळी आली आणि एकच  गडबड उडाली! सगळी तयारी जय्यत असतांना देखील माझ्या हातांना हलका कंप....  खूप टेन्शन होतं. मग रविशंकर आणि भानुप्रियाला दूध पाण्याने पाय धुवून , ओवाळून, गंध, हळदी कुंकू लावलं,दोघां वरून भाकरतुकडा ओवाळून टाकला, आणि प्रेमाने सर्वांचं घरात स्वागत केलं!

पुन्हा तेच! गडबड गडबड! सर्वांचे  चहापाणी झाले.सर्वांना  पोहे दिले, खूप गप्पा मारल्या! सगळ्यांना पोहे फार आवडले, आमचा पाहुणचार गोड  मानून घेतला! ह्या सर्वात तनयाचा फार मोठा सहभाग होता बरं का! एकदम जोश आणि उत्साहाने काम करीत होती! तसा तिने आणखीन एका गोष्टीत पुढाकार घेतला होता बरं का....लग्नात  जिजाजींचे जुते चोरून त्याबदल्यात भरघोस रक्कम वसूल करून सर्व भावंडांनी घेतली होती!!

मग बाबांनी दोघांच्या कडून पुन्हा थोडे देवपूजन करून घेतले. ग्रहमखाच्या दिवशीची आणि आजची पूजेच्या  समारोपाची जबाबदारी भानुच्या आजोबांनी घेतली होती, त्यातून ते मोकळे  झाले ,कृतकृत्य झाले! आई,प्रमोदिनी, अश्विनी, प्राची, सचिन,नितीन,सर्वांच्या बहुमोल मदती मुळे  एवढे मोठे कार्य पूर्णत्वास गेले! आणि मुलांनी ह्या कार्याला आनंदाची झालर लावली! ह्या सर्वांना जरी फुल ना फुलाची पाकळी भेट दिली असली, तरी ती आपली  एक औपचारिकताच!!! असो.

एकमेकांचा निरोप घेत, रविशंकर आणि भानुप्रियाला भरघोस आशीर्वाद देऊन  सर्व मंडळी पुन्हा हॉटेलकडे रवाना झाली! खूप जड  वाटतं होतं ...
 
 सामानाची व्यवस्था लावून सर्वजण गाडीत बसले, आणि वऱ्हाडाने  मुंबई कडे प्रस्थान ठेवले! तिथून बंगलोरला! रेणू सचिन पुढे ऑस्ट्रलिया साठी रवाना होणार होते. मृणाल विक्रम सकाळीच दिल्ली साठी रवाना झाले होते. सर्वांना बाय बाय केला, आणि घरी आलो... मला काहीच सुचत नव्हतं , पण शरीर थकून गेलं होतं! विश्रांतीची नितांत आवश्यकता होती, म्हणून थोडी   पडले,आणि चांगले पाच सहा तासां पर्यंत गाढ झोपले  !एवढी झोपले   कळलंच नाही!

बाप्पाच्या, कुलदेवतेच्या, सर्वदेवांच्या आणि आई वडिलांच्या कृपाशिर्वादाने लग्नकार्य सिध्द्वतापूर्ण, निर्विघ्नपणे  पार पडले, आणि आम्ही दोघे  कृतकृत्य झालो!  भरून पावलो! देवांपाशी दिवा लावला,नमस्कार केला आणि हात जोडून त्याचे आभार  मानले! शुभं  भावतू!!!

       

रिसेप्शनची रोषणाई... पाहुण्यांची सरबराई !

लक्ष्मीपूजनाचे वेळी रविशंकरनी ताटातील  तांदुळावर 'भानुप्रिया' हे नाव अंगठीने लिहिले आणि भानुप्रिया रविशंकर अकोलेकर झाली! officially!सर्वांच्या ओट्या भरून, एकमेकांना भेटवस्तू देऊन, सर्वांच्या यथोचित आदर करून सर्वजण संध्याकाळच्या रिसेप्शनच्या  तयारीला लागले.

सुंदर रिच अशी  शिफॉनची साडी, हलका फुलका मेकअप,आणि हसऱ्या चेहऱ्याने भानुप्रिया नटून थटून हॉटेलच्या गार्डन   एरियात आली, आणि तिच्या पाठोपाठ एकदम सूटबूट घालून,ऐटबाजपणे रविशंकरनी पण एन्ट्री घेतली! तो एक जो त्यांचा फोटो आहे... तो फोटो   मला विशेष  आवडतो!

दोघांना  तिथे सजवलेल्या स्टेजवर घेऊन गेलो, आणि बसवलं. आता हळूहळू पाहुण्यांचे आगमन व्हायला लागले होते. सर्व मंडळी  हॉटेल मधील तो रिसेप्शन एरिया पाहून  जाम खुश होत होती ! तिथली सजावट,रोषणाई, बैठकीची उत्तम व्यवस्था पाहून आनंद होत होता. नव्या जोडप्याला आशीर्वाद द्यायला हळूहळू लोकं स्टेजकडे निघत होती . मग पुन्हा फोटोंची चढाओढ! साहजिकच आहे म्हणा! सर्वांनाच  नवरानवरी बरोबर फोटो   काढायला आवडतं!

आलेल्या पाहुण्यां बरोबर थोडे बोलत बोलत, एकीकडे सर्वांना जेवणाचा आग्रह करत माझा वेळ मजेत चालला होता. धावपळ होती पण आनंदही होता!

तीनएक तासांच्या नंतर  ह्या सोहळ्याचे समापन झाले. सर्व पाहुणे निरोपिले, आणि मग घरच्या मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेतला, कौतुक केले! व्याही मंडळी पण खुश दिसत होती. मला चांगले आठवते, मी जेंव्हा गप्पांच्या ओघात भानुच्या तिकडच्या घरात तुम्ही सर्व मंडळी तिची काळजी घ्यालच, त्यामुळे मला अजिबात  चिंता नाही असे  म्हटले, तेंव्हा सचिननी मोठ्या प्रेमाने माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवून मला सांगितलं,' तुम्ही अजिबात काळजी करू नका! आम्ही सर्व आहोत ना!' बास....तो स्पर्श अतिशय बोलका होता ... मी एकदम टेन्शनफ्री झाले, आणि आनंदित झाले! व्याह्यांनी पण संपूर्ण लग्नसोहळा उत्तम पार पडल्या बद्दल, आणि त्यांच्या आलेल्या पाहुण्यांची उत्तम व्यवस्था असल्या बद्दल समाधान व्यक्त केले, आणि कुणाला काहीही कमी पडले नाही, सर्व छानच झाले असे सांगितले, तेंव्हा जो काही आनंद झाला, आणि ओठावर शब्द आले... ह्याच साठी केला होता अट्टाहास!

नाशिकमधील उत्तम हॉटेल! हॉटेल व्यवस्थापना बाबत  समाधानी होतो! रहाण्याची उत्तम व्यवस्था, खाण्यापिण्याची उत्तम सोय, अदबशीर सेवा, सर्व  विधीं साठी करून दिलेली परिपूर्ण तयारी आणि तत्पर सहाय्य , सकाळची आणि संध्याकाळची सजावट, स्वादिष्ट जेवण, आणि लग्नाचा हा सोहळा उत्तम  पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य ...  आम्हाला फार समाधान वाटले!

 संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान व्यक्त करीत विश्रांती साठी सर्व मंडळी परतली... मला मात्र झोप येणार नव्हती.. आनंदाने, समाधानाने, का कशाने...कोणतीच भावना ओळखू येत नव्हती..


  

Tuesday, 9 August 2016

सुंदर क्षणांची मालिका.... आमच्या भानुप्रियाच्या लग्नाचा दिवस!


आणि लग्नाच्या दिवशी, तर अनेक सुंदर सुंदर क्षणांची मालिकाच लागली होती! ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने विवाह विधी पार पडला. सुटसुटीत, आटोपशीर,अत्यंत पद्धतशीर असा लग्न विधी. आणि मुख्य म्हणजे श्लोकांचे अर्थ सांगितले जातात, वधु वरांना अत्यंत शांत आणि सुगम्य भाषेत विधी समजावून त्यांच्या कडून करून घेतले जातात  घाई नाही, गडबड नाही, सगळं कस नेटकं आणि छान!

संकल्प, देवता पूजन, पुण्याह वाचन, कन्यादान,अक्षता रोपण ,मंगलसूत्र बंधन, पाणिग्रहण, विवाह होम, प्रधान होम, लाजाहोम, अग्नीला प्रदक्षिणा,अश्मारोहण, सप्तपदी, वधू वरांना आशीर्वाद म्हणून सर्व  ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या मस्तकावर  पवित्र जलाचा केलेला अभिषेक,आणि शेवटी मंगलाष्टकांनी होणारी सांगता! किंवा मी म्हणते तसं एका मंगल  पर्वाची सुरुवात! असा  हा दीड  दोन तासांचा सुमंगल  सोहळा!

लग्न विधींना  सुरुवात झाली तेंव्हा मी खूप आनंदात होते.  पण कन्यादान करतांना मात्र गंभीर  व्हायला झालं. मनात अनेक  भावना तरंगून जात होत्या. सिनेमात दाखवतात तसं मन फ्लॅशबॅक मध्ये सर्व  काही बघून  आलं...भानूचं बालपण,  मोठी होतानाचे तिचे मोरपंखी दिवस,नोकरीचे दिवस,आणि आता लग्न!

सर्व विधी मी डोळे भरून पहात होते. माझ्याकडच्या मंडळीं कडून छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करण्याची लगबग करत होते, एकीकडे थोडे व्याही मंडळीं कडे लक्ष देत होते. असं सर्व चाललं होतं! त्या धावपळीत देखील मजा होती.

 होमहवन झालं  आणि ऋषिकेशला भाऊ म्हणून कानपिळीचा मान मिळाला! हा एक गमतीशीर पण  धार्मिक विधी नसूनही परंपरेनं चालत आलेला फार महत्वाचा विधी आहे. भाऊ कान पिळून सांगून देतो, आमच्या बहिणीला त्रास द्याल तर मी तुमचे कान असे उपटीन बरं का!

 मंगल अभिषेक झाला, सर्वांनी तोंड भरूनआशीर्वाद दिले, आणि मंगलाष्टकांना दोन्ही मामा उत्साहाने,आनंदाने अंतरपाट धरून उभे राहिले ! सचिन आणि नितीनची ह्या बाबतची एक गम्मत आहे! गेल्या दोन तीन वर्षांपासून ते सारखे भानुप्रियाला म्हणायचे की लग्न लौकर कर म्हणजे आम्हाला आमचे  ठेवणीतले सूट घालता येतील! जेंव्हा ते दोघे अंतरपाट धरून उभे राहिले मला एकदम  तो किस्सा आठवला आणि हसू आलं! त्यांना आता संध्याकाळी सूट घालायला मिळणार तर!

तर मंगलाष्टकांना सुरुवात झाली, वधूला त्या मंगलमय ओळींमधून दिलेला संदेश ऐकला आणि ऐकता ऐकता माझं मन एकदम  एकाग्र झालं.  आत्ता पर्यंत लग्नाच्या घाईगडबडीत असलेल्या माझ्या  मनात मोठी उलघाल झाली, आणि डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहायला सुरुवात झाली, ते प्रत्येक अष्टकांना वाढतच चालले होते !सर्व बांध फुटले आणि निःसंकोच रडू येत होते! पण आतून आनंदही  होत होता! पण मग ही वेळच अशी असते! भानूची आजी, मावशी  मामी, मैत्रिणी तर रडत होत्याच, पण त्या क्षणी तिच्या आजोबांनाही अश्रू आवरले नाहीत. आजी आजोबा तर फारच सद्गतीत झाले होते! माझ्या आई  बाबांना असे भावविवश होतांना फारच  थोड्या प्रसंगी पहिले आहे. पण ह्यावेळी मात्र त्यांच्या सर्वात लाडक्या आणि त्यांना फार अभिमान असलेल्या नातीच्या  लग्नातला हा सर्वात हळवा  क्षण होता!  पूर्वीच्या काळी आई लग्नाच्या ह्या मंगलाष्टकां प्रसंगी तुळशीला पाणी घालायची, त्या प्रथे मागे हे अश्रुंचे बांध आवरता यावेत आणि ते अश्रू कुणालाही दिसू नयेत हीच भावना असावी. आज तर हे लिहितांना देखील मला रडू येईल की  काय असे वाटत असतांनाच थोडे रडायला आलेच. सर्व आयांचे असेच होते! पण आम्ही ठरलो प्रगत विचारांच्या महिला! माझी वाहिनी पण म्हणाली काही नाही हेमाताई,तुम्ही इथेच थांबायच मंगलाष्टकांना आणि सर्व विधी पाहायचा. तुम्ही नाही पाहणार तर मग कोण पाहणार?अगदी बरोबर! कारण मग तो सोहळा मी miss केला असता आणि म्हणून तिथेच राहिले झालं!

आता विवाह विधींची समाप्ती झाली आणि फोटोंची लगबग सुरु झाली! लग्नात वधूवरांपेक्षा नातेवाइकांनाच  जास्त घाई  असते फोटोची  ! खूप हसू येतं! अर्थात त्यांचा स्नेह आणि मुलांवरच प्रेमच ह्याला कारण!असो . त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला, भानुप्रिया आणि  रविशंकरसाठी खास सुशोभित केलेल्या चांदीच्या ताटां भोवती सुंदरशी फुलांची मखर  सजवली होती, आणि सर्व  मंडळींना ते दोघे आग्रह करून आले आणि जेवायला बसले. दोघांनी छानसे उखाणे घेत एकमेकांना घास भरवले! खूप मजा आली! आता ते दोघे पण थोडे थोडे रिलॅक्स झाले होते. सकाळचं  नाही म्हटलं तरी  थोडं  दडपण होतंच. आणि हो, भानुप्रिया आणि रविशंकर दोघांनी संध्याकाळी पण छान उखाणे घेतले !खूप मजा आली. आजकाल मुलींना उखाणे येतही नाहीत, आणि लाजतात का attitude दाखवतात माहित नाही, पण जावयांनी वरचढ उखाणे घेतले आणि सर्व काही मजेत झालं!


आता संध्याकाळच्या रिसेप्शच्या तयारीला लागायचं होतं! त्यातच थोडे सर्व पाहुण्यांना भेटले, गप्पा झाल्या, बरं वाटलं! आणि पुन्हा लगबग, मेकअप,साड्या..... सुरु!



 
  

Sunday, 7 August 2016

आता लगीन घाई झाली हो!!!

 तर लग्नाची गोष्ट पुढे.....
८ एप्रिल रोजी आमच्या घरी ग्राहमखाचं पूजन झालं, देवांना लग्नासाठी शुभाशिर्वाद देण्याचं आमंत्रण दिलं आणि दारी  लग्नाचा मंडप पडला! व्याही आले, सोबतच घरातील सर्व मंडळी आली आणि पूजेत सहभागी होऊन, प्रसादाचे भोजन करून गेले.  त्या दिवशी सर्वांची थोडी जुजबी तोंड ओळख झाली. रेणू सचिन आणि मृणाल विक्रम मुलां सोबत आले होते. रेणू सचिन आणि मुले तर ऑस्ट्रलिया होऊन आले होते त्यांच्या भावाच्या लग्नाला. खूप ;छान वाटलं त्या दिवशी. सर्वांनी हौसेने   बांगड्या भरल्या,मेंदी लावून घेतली, खूप धमाल आली! पण विशेष म्हणजे मला काहीच दडपण नाही आलं! कारण आपण कुणाला आपल्याहून वेगळं समजलं, की त्याच्या सरबराईचे दडपण  येते. पण एकदा ही सर्व मंडळी आपलीच आहेत, एक्सटेंडेड फॅमिली आहेत असे मानले की मग आपल्या घरचेच होतात ते.

मग ९ तारखेला सकाळी  हळदीच्या  आणि लग्नाच्या बारीक सारीक जमवाजमवीला , तयारीला वेग आला . आई  बाबा ,प्रमोदिनी, अश्विनी   घरी होते. मग संध्याकाळी...
'पिवळ्या पिवळ्या हळदीने ... खुलवा गोऱ्या रंगला!'
हळद लावा अंगाला बाई हळद लावा अंगाला"
असे  म्हणत,कौतुकाने,मायेने आणि डोळ्यांच्या ओल्या कडा पुसत  भानुप्रियाला हळद लावून, सुवासिक तेल आणि उटणं लावून न्हाऊ माखू घातली, आणि नवरी पिवळी पिवळी झाली, लग्नाला सज्ज झाली!   मनात अनेक गाणी तरळून गेली!
"नवराई माझी लाडाची लाडाची ग..
अप्सरा जणू इंद्राची इंद्राची ग!" आणि अशी अनेक!

आता लेक  लाडकी ह्या घरची होणार होती सून त्या घरची! अनेक वर्षां पासून  संस्कारांची, विचारांची, आनंदाची, आणि जीवन जगण्याबाबतच्या कले  विषयी जे काही मला सांगता आलं ती विचारांची शिदोरी तिला सोबत दिली होती ह्या विश्वासाने कि ह्यातील थोडे थोडे लागेल तसे ती  आपल्या आयुष्यात वापरेल, आणि आयुष्य समृद्ध करेल,स्वतःचे आणि घरातील सर्वांचे.

रात्र गप्पा मारण्यात घालवली आणि पहाटे उठून, आवरून, देवांना नमस्कार करून, लग्नासाठी वऱ्हाड  गाडीत बसलं, शुभ संकेताचा नारळ फोडला, आणि हॉटेल कडे प्रस्थान ठेवलं!      


Saturday, 6 August 2016

मैत्री .... भावना आणि अविष्कार

HAPPY FRIENDSHIP DAY !!!

आज जागतिक  मैत्री दिवस! आजच्या दिवशी सर्व   मंडळी आपापल्या मित्र मंडळींना   शुभेच्छा देण्यासाठी सरसावले असतील. कुणी मोबाईल  वरून,कुणी प्रत्यक्ष भेटून.  कुणी सहलीला  भेटतील, कुणी घरीच एन्जॉय करतील, माणसं तितक्या ओकेशन सेलिब्रेट करायच्या कल्पना!  थोडक्यात काय तर  कोणताही आनंद व्यक्त करण्यासाठी मैत्री   हवीच ना ? पण  माझ्या मते मैत्री साठी हा डे   कशाला हवा? मित्र तर आपले नेहमीच असतात, आपण नेहमीच एकमेकांशी संपर्कात  असतो. मग रोजच मैत्रीचा दिवस आहे की! पण काय  आहे ना, आजकाल हे  फॅड  ना  डे सेलीब्रेट करायचं! तर असो.
पण  मैत्री म्हटलं की लोकांच्या मनात येतात ते स्त्री आणि पुरुष असे मित्र मैत्रिणी किंवा आपल्या  नातेवाईकांच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक! पण असं  काही नसतं,  असं आपलं मला वाटतं.मैत्री कुणाशीही जमू शकते.

मैत्री म्हणजे नक्की कोणत्या भावना असतात? किंवा कोणत्या भावना असल्या म्हणजे मैत्री आहे असे समजते? मैत्री मध्ये एकमेकांच्यात  बाबतीत तुलना ,असूया, द्वेष, राग,लोभ, मोह, मत्सर  थोडक्यात" षडरिपू "नसावेत. (काम, क्रोध,लोभ,,मद, मोह आणि मत्सर हे   सहा  नकारात्मक भाव आहेत,ज्यांच्या अयोग्य  वापराने माणसाची अधोगती निश्चितअसते ).

हे भाव  सकारात्मक पण आहेत बरं का  बघा हं.. योग्य प्रमाणात राग यावा, योग्य प्रमाणात लोभ हवा पण दुसऱ्याच्या हक्काच्या वस्तूंवर नाही, थोडा मद म्हणजे अहंकार हवा,कारण  त्याने आपण सुखावतो आणि पुढे प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. मोह तर प्रत्येकालाच असतो   कशाचातरी , पण लोभ दुसऱ्याच्या   अधिकारातल्या वस्तूंचा नसावा.. पण  मत्सर मात्र कधीच करू  नये

तर मग मैत्री  मध्ये असावं काय? मैत्रीमध्ये असावा निखळ प्रेमाचा गंध! मैत्री म्हणजे विश्वास, आधार,मदतीसाठी सदैव असलेली तत्परता.
मैत्री मध्ये असावी निर्व्याज्य प्रेमाची देवाण घेवाण, असं प्रेम, जे काही मागत नाही पण देण्यास तत्पर असतं आणि जे   काही  मिळालं तर  त्याचा प्रेमानं, विना तक्रार स्वीकार करणारं!

माझी तर अगदी लहान मुलांशी देखील मैत्री जुळते ! वयस्कर लोकांशी देखील मी बोलू शकते. teenagers आणि मोठी माणसं  मला कुणीही चालतं बोलायला, मैत्री करायला.. मैत्री होण्या साठी किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी  लागतो मनाचा  सच्चेपणा, दिलखुलासपण. आपली पायरी न ओलांडता, आपली विषयांची मर्यादा न सोडता मोकळेपणाने एकमेकांशी अनेक विषयांवर, अनेक मुद्द्यांवर, बोलता यायला हवं . एकमेकांचा योग्य आदर ठेवून, एकमेकांच्या  खाजगी  आयुष्यात अती खोलात जाऊन चौकशी  करण्याचे टाळून गप्पा मारता यायला हव्यात किंवा संवाद साधता यायला हवा.

मी माझ्या भाच्चे मंडळींशी पण एक मित्रा सारखी वागते. मैत्री होण्यासाठी त्यांच्या आवडीच्या विषयांवर   बोलते ते त्यांना भावतं. मग त्यासाठी आपल्याला पण त्यांच्या विश्वातील   चालू घडामोडी, त्यांच्या विश्वातल्या नवीन गोष्टी,त्यांच्या वयाच्या समस्या, इतर अडीअडचणी ह्याबाबत   आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. त्यांच्याशी सूत जमवता आलं पाहिजे. मग ते पण आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात विश्वासानं, आणि मैत्रीचं नातं जुळतं, थोडक्यात up to date रहावं लागतं . वयस्कर माणसांचं पण तसंच आहे त्यांच्या आवडीचा विषय घेतला कि ते खूप बोलतात. मग त्यांना आपण सारखं  त्यांच्याशी बोलावं असं  वाटतं  आणि मैत्री होते.

आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तर माझे आई आणि वडील हे देखील मित्रां प्रमाणेच आहेत! एकमेकांना एकमेकांच्या मनातले पूर्णपणे समजते काही न सांगताच! किती तरी वेळा फोनवरच्या" हॅलो"तून देखील समोरच्याचा मूड, तिथली आजूबाजूची परिस्थिती, ओळखता येते. समोरची व्यक्ती आनंदात आहे, कि काही टेन्शन मध्ये आहे, का दुःखात आहेत की अतिशय  सुखात आहे हे समजतं  ! पण त्या साठी हवी तदात्म्यता एकमेकांशी!  संवाद! हे म्हटलं तर सहज शक्य आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. पण अशक्य मात्र नाही बरं का!

जिथे विचारांची मोकळीक नाही,अहंकार  आहे   आणि तिथे मैत्री  होऊ शकत नाही .. पण एकदा का सूर जुळले, मग ती  मैत्रीची  वीण एकदम घट्ट बसते,आयुष्यभरासाठी सुद्धा!                  

Friday, 5 August 2016

लग्नाच्या तयारीची धामधूम!


 आता आम्ही तिघे जोमाने कामाला लागलो. कामांची यादी करून रोजच्या रोज बाजाराकडे पाऊले वळायला लागली. आता लग्न म्हटलं की साड्या आणि दागिने आलेच! त्यात  लाडक्या लेकीचं लग्न! आणि साड्या दागिने म्हणजे मुलीच्याच नाही तर समस्त स्त्रीवर्गाचा जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय! आणि पुरुषही काही मागे नाहीत कारण त्यांना हा एक चेष्टेचा आणि मस्करीच्या विषय असतो!

लग्नात घालवायचा आणि सोबत पॅक करायच्या कपड्यांचे, वस्तूंचे व्यवस्थित नियोजन केले होते  त्याप्रमाणेच खरेदी होणार होती. लग्नात घालायच्या साड्या बाबत आमचे ठोकताळे नक्की होते. नाशिक मधल्या नामवंत पेढीं मधून दागिने आणि सर्वोत्तम दुकानांतून साड्या खरेदी झाली

जशी मजा अंगठ्या खरेदी करतांना आली, तशीच मजा साड्या खरेदी आणि दागिने घेतांना  आली! साडी बघायची, ट्राय करायची, ह्यात वेगळीच मजा होती.बनारसी शालू, पैठणी नऊवारी, रिसेप्शन साठी छानशी जॉर्जेट,किंवा शिफॉन असे ठोकताळे  होते . त्यामुळे कुठे कंफ्युजन  नाही, गोंधळ नाही. एकदम झटपट आणि मनासारखी खरेदी होत होती. अरे हो, साडी वरून आठवलं ... आम्ही अंगठी खरेदीला गेलो तेंव्हा कपडे पण घेतले होते. तेंव्हा मला रविशंकरनी एक सुंदर साडी घेऊन दिली! तशी मी खूप  साड्या  वापरते,पण हि साडी  अमूल्य आहे! जावयाचा  महिमा दुसरं काय? आणि आपलं कुणीतरी केलेलं कौतुक!! ते फार महत्वाचं असतं! मी पण त्यांचे नेहमीच कौतुक करते. आणि मुलासारखे कौतुक करावेसे वाटते. आता तर तिच्या पेक्षा त्यांचेच कौतुक जास्त करते मी!

मग दागिने खरेदी!नामवंत सोनारां कडून दागिने खरेदी झाली कारण लग्नाचे दागिने म्हणजे सगळं कसं  व्यवस्थित व्हायला हवं ना ...  शुधदता, चोखपणा , योग्य  वजन, किंमत आणि मुख्य म्हणजे सोनाराच्या नाव लौकिक हे सगळं बघावं लागतं. मग जुन्या पेढीच्या  सराफां कडून मंगळसूत्र,हार, बांगड्या असे पारंपरिक दागिने खरेदी केले, आणि काही डेलीयूज साठी ट्रेंडी ज्वेलर्स कडून नवीन घडणीचे नाजूक दागिने घेतले. दागिने  बघतांना तर  डोळ्यांचे पारणे फिटत होते. वेगवेगळे  अलंकार,त्यांची नावे, घडणावळ, डिझाइन्स, पॅटर्न्स..  बाप रे! हौस हौस म्हणजे किती करायची?. पण साड्या काय आणि दागिने काय, आम्हाला पसंतीला अजिबात वेळ लागत नव्हता... कारण आम्ही  दोघी चोखंदळ आणि कोणतीही पसंती पटकन करण्याचा फार जुना अनुभव आहे ना!!(हे आपलं स्वतःच स्वतःचं कौतुक करून घेणं झालं बरं  का!!) उगीचच आपलं!! असो,  हे सर्व क्षण हृदयात साठवून  ठेवले आहेत , कारण फक्त ते क्षणच माझे आहेत.

पूर्वी जाहिरातींतून,चित्रांतून, गोष्टींतून, गाण्यांतून लग्नाबद्दल ऐकायचे, वाचायचे, बघायचे तेंव्हा ते सगळं मनात साठवून ठेवायचे. लग्नात करायचे सर्व विधी मी मनात नोंदवून ठेवल्या सारखेच होते.आणि त्याला अंशतः जबाबदार आहे माझ्या स्वतःच्या लग्नाचा व्हिडीओ बरं का!(गम्मत नाही खरंच  आहे ते!!) आणि मग  तयारी पुढे सरकली! आणि बघता बघता ८ तारीख आली की!दारात मांडव पडला आणि लग्न घडी जवळ येऊन ठेपली!




  

शुभ मंगल सावधान!!!!


 दीड वर्षा पूर्वी १० एप्रिल २०१५ ला भानुप्रियाचे लग्न झाले, आणि एक वर्ष खूप मजेत आणि अर्थात पटकन गेले. एप्रिल मध्ये लग्न झाले, आणि त्यानंतर प्रत्येक सण वार साजरे करण्यात, मुलीचे आणि जावयांचे कौतुक करण्यात वर्ष झटपट गेले. कळले देखील नाही, आणि वर्षसण सुद्धा साजरा केला!  लग्नाच्या आठवणी अजून कालच लग्न झाल्या सारख्या आहेत. पुन्हा पुन्हा आठवावेत असे क्षण! आणि एकीकडे थोडं भावनाविवश व्हायला होतं पण सगळं व्यवस्थित पार पडलं ह्याचे समाधान आहे.

लग्न इतक्या झटपट ठरलं कि काय सांगू? चांगलंच आठवतंय मला कि ८ मार्च २०१६ ला मुलाकडच्यांचा फोन आला आणि लगेच बंगलोरला यायचे असा बेत झाला .आम्ही  गेलो, एकमेकांची प्राथमिक  पसंती झाली. आणि  आम्ही घरी नाशिकला परत येई  पर्यंत त्यांनी नाशिकला  येणार म्हणून कळवले देखील! मग काय? नुसती घाई झाली! आणि १३ तारखेला रविशंकर आणि त्यांचे वडील  आले,घर पाहिलं, पुन्हा एकवार भेटणं बोलणं झालं, आणि साखरपुडाच करायचा ठरलं! इतक्या झटपट!! तर मग घरची मंडळी जमली, भानूचे आजी आजोबा, काकू अशा महत्वाच्या लोकां समक्ष १४ तारखेला  साखरपुडा झाला!





 ।।  शुभम भवतु।।

 साखरपुड्यासाठी अंगठी खरेदी त्याच दिवशी संध्याकाळी झाली. आम्ही तिघे गेलो होतो अंगठी खरेदीला. खूप मजा आली. मला तर काही वेगळंच वाटतं होतं. म्हणजे भानूचं लग्न ठरलं? किती छान भावना होती ती!

 नवीन नवीन लग्न ठरलेली मुलगा आणि मुलगी एकत्र बघायला फार मजा वाटते! आपल्याला पण एकदम तरुण झाल्या सारखं वाटतं! खरंच ! मंत्रमुग्ध वातावरण होतं तेंव्हा! ते दोघे तर भारावलेले होतेच, माझी पण मनाची अवस्था वेगळीच होती!  थोडी हुरहूर, काळजी, आणि डोळ्या समोर एक्दम लग्न दिसायला लागलं ! म्हणजे घाई गडबड, तयारी, आमंत्रणं , लग्नाची तयारी, कपडे, दागिने, हॉल, काही विचारू नका!

पण  सगळ्यात सुंदर भावना होती ती म्हणजे जेंव्हा रविशंकरनी मला आई म्हणून संबोधलं तेंव्हा! मनात एक वेगळीच आनंदाची, ममतेची लहर तरंगून गेली ! कारण अभिषेकच्या  तोंडून मला आई हाक ऐकायला मिळाली नव्हतं. भानूची 'आई' हि हाक कानी होती. त्यामुळे त्या दिवशी मनाच्या एका खोल कप्प्यातली इच्छा पूर्ण झाली ! मला खूप आनंद झाला! आनंदाने डोळ्यात आलेले अश्रू मी हिमतीने मागे ढकलले आणि येणाऱ्या नवीन वाटचालीसाठी  सज्ज झाले!

घरी परत आलो, पुरणपोळीचा बेत होता. सगळ्यांची जेवणं झाली, ते दोघे हॉटेल वर परत गेले आणि मग थोडी उसंत मिळाली!  घडलं ते पूर्णपणे पुन्हा मनाशी उजळणी केली आणि मग...... आम्ही तिघे  एकदम  सरसावलो  आणि  लग्नाच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे झोप येणारच नव्हती! आनंदामुळे!

आणि लग्नाची तारीख ठरली १० एप्रिल! म्हणजे बरोबर ३ आठवडे होते फक्त! तर मग घेतलं पेन आणि डायरी आणि दुसऱ्या दिवशी पासूनचे नियोजन सुरु झाले!





Thursday, 4 August 2016

मध्यांतरा नंतर........


'समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।"        ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
 

 आज बरोबर दोन वर्षांनी पुन्हा ब्लॉग लिहायला घेतला आहे.  मध्यंतरी काही तब्येतीच्या तक्रारीं मुळे ब्लॉग लिहायला जमले नाही.आयुष्याच्या मध्यावर काही तब्येतीच्या तक्रारी झाल्या आणि त्यांचा धीराने, नेटाने आणि मुख्य म्हणजे योग्य औषधोपचाराने सामना करून त्या त्रासाला  पळवून लावण्यात यश आले. पण ह्या २ वर्षाच्या अवघड आणि नाजूक वळणावर मला अनेकांची साथ मिळाली... माझी मैत्रीण, माझ्या बहिणी, माझे आई वडील, आणि आणखी  बरेच जण. सर्वांनी हिम्मत दिली, बळ दिलं, साथ सोबत दिली. पण ह्या सर्वां बरोबर किंबहुना ह्या सर्वां पेक्षा जास्त साथ सोबत आणि खंबीर मदत मिळाली भानुप्रियाची !तिच्या मदती शिवाय आणि तिने दिलेल्या मानसिक बळा शिवाय हा प्रवास सुकर झाला नसता हे नक्की. जशी मी तिला हिमतीने लहानाची मोठी केली, कष्ट घेतले, कधी रागावून, कधी समजावून, कधी खेळीमेळीने तिला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला, तिला हिमतीने जगायला   शिकवले तसेच काहीसे ह्या वेळी झाले, फक्त आता मी तिची मुलगी झाले होते! त्यामुळे तेच सगळे खेळ तिने मला लागू केले आणि मला आजारातून बाहेर पडायला मदत केली. नोकरी पण करीत  होती,पुन्हा घरातील काम पण बघत होती, कधी छान पदार्थ करून घालीत होती! तिच्या मैत्रिणीची अवंतिकाची पण खूप छान सोबत झाली ह्या दरम्यान मला. दोघी मिळून माझ्या कडे लक्ष द्यायच्या. डिप्रेशन मधून बाहेर यायला डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन होतेच. शिवाय रेकी,ऍक्यूप्रेशर योगोपचार  ह्या सर्वांच्या माध्यमातून  असलेल्या पॉसिटीव्ह एनर्जी मुळे मी बरी झाले. पण सर्वात करता करविता तो परमेश्वर, त्याचे आभार किती मानावेत?

पण मी नेहमीच त्या परमेश्वरावर  विश्वास ठेवीत आले आहे. अनेक बाँक्या प्रसंगांतून त्यानेच सहीसलामत सोडवलं आहे, अनेक कसोटीच्या क्षणी तोच मला उचलून घेतो आणि स्वतः अडचणीतून चालून माझी सुटका करतो असे मला नेहमी प्रत्यंतर येते.
समर्थांनी म्हटले आहे त्याप्रमाणे...
" जाणजाणो  देह रक्षी ।
आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी  ।
पदार्थ मात्रास परीक्षी
   जाणपणे ।।"
तो सतत आपली परीक्षा घेत असतो. कधी सोप्पा पेपर पाठवतो , कधी अवघड प्रश्नावली देतो. कधी प्रश्नातच उत्तर दडवून आपली विचारांची योग्यता आणि परिपक्वता जोखतो. परंतु आपल्या  जाणतेपणी अजाणतेपणी तो आत्माच आपले  रक्षण करतो.तो अंतरात्मा साक्षी असतो आपल्या सर्व भावनांचा आणि म्हणूनच आपली परीक्षा  घेतो. आणि ह्या परीक्षेत यशस्वी  झालो तर आपण आपले माणूसपण सिधद करू शकतो. तेंव्हा कुठलाही पेपर असो, घाबरायचे  नाही,डगमगायचे नाही,आपला अभ्यास १०० टक्के करायचा, आपले १०० टक्के प्रयत्न करायचे आणि  जे फळ मिळाले ते पुण्य समजायचे, आणि आभार मानायचे त्याचे!असो